ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गणपतीची स्थापना केल्यावर गणपती रुसू नये म्हणून…

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 31, 2019 11:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

गणपतीची स्थापना केल्यावर गणपती रुसू नये म्हणून…

शहर : मुंबई

गणपतीची स्थापना केल्यावर त्यांची काळजी घेतली पाहिजे. म्हणून गणपती बसल्यावर ह्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे -:

गणपतीला एकदा अर्पित केलेले फूल पुन्हा पूजेत वापरू नये. कुजलेले, खाली पडलेले किंवा सुगंध घेतलेले फुलं कधीच वापरू नये. केवळ महादेवाच्या पिंडीला अर्पित केलेले बेलपत्र पुन्हा धुऊन वाहू शकतात.

आपण सजावटीसाठी खरी फुले वापरत असल्यास दररोज फुलं बदलणे आवश्यक आहे.

गणपतीच्या जवळपास घाण नसावी.

दररोज गणपतीची मूर्ती स्वच्छ करण्यासाठी कपड्याऐवजी ब्रश वापरणे अधिक सोयीस्कर जाईल. याने डोळे, नाक, बोटं, पगडी इतर जागेची व्यवस्थित स्वच्छता होऊ शकेल.

गणेश पूजनात निषिद्ध फुलं पत्र- जसे केवडा, तुळशी, साराहीन फुलं गणपतीला मुळीच अर्पित करू नये.

गणपतीची आवड दूर्वा, शमी पत्र शमी पुष्प, बेलाचे पान, मंदार पुष्प, आर्क पुष्प, कमळ पुष्प.

घरात कोणताही पदार्थ बनल्यावर आधी गणपतीला नैवेद्य दाखवावा.

घरात गणपती विराजमान असल्यास त्यांना घरात एकटे सोडून जाऊ नये.

 

या दरम्यान हिंसा, वाद, संभोग, क्रोध, खोटे बोलणे, निंदा अश्या वाईट सवयींपासून दूर राहावे.

 

मागे

हरतालिकेची कहाणी
हरतालिकेची कहाणी

एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं,....

अधिक वाचा

पुढे  

 गौराई आली अंगणी
गौराई आली अंगणी

श्रावण महिना संपतासंपताच वेध लागतात ते भाद्रपदात येणार्‍या गौरी गणपतीचे! ....

Read more