ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

श्राद्ध कसे करावे

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2019 04:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

श्राद्ध कसे करावे

शहर : मुंबई

श्राद्धाची वेळ 'कुपत' काळ आहे म्हणजेच दिवसाच्या मध्यान्ह काळी (दुपारी 12-30च्या आसपास) श्राद्ध केले गेले पाहिजे. याचे आमंत्रण आदल्या दिवशी पुरोहिताच्या घरी जाऊन आदराने द्यावे. ब्राह्मणांची संख्या एक, तीन, पाच अशी विषम असावी. प्रथम त्यांना हात, पाय धुवायला पाणी द्यावे. नंतर आचमन करून त्यांना आसनावर बसवून प्रेमाने वाढावे. वाढतांना शांत असावे, रागावू नये. मनात श्रद्धा, विश्वास हवा. जेवणानंतर मुख-शुद्धी तसेच दक्षिणा, वस्त्र, रत्न, पात्र या सारखे आपल्या ऐपतीप्रमाणे (यथाशक्ती- दान करावे. ब्राह्मण आमंत्रितांच्या जेवणानंतर गरीब, तसेच अनाथांनाही संतुष्ट करावे. यामुळे ते यमपुरी (स्वर्गात) जाऊन मृतात्मांची मदत करतात. अनाथाला दिलेले अन्नदान अक्षय होते, असे वराहपुराणात लिहिले आहे. महत्वपूर्ण अशा श्राद्धकर्मात खालील गोष्टी महत्वाच्या तसेच पवित्र पुण्यकारक मानल्या गेल्या आहेत, त्या पितरांना अतिशय प्रिय आहेत.

1. काळे तीळ 2. कुतप (मुहूर्त) 3. जानवे 4. चांदी 5. पांढरी फुले 6. दक्षिण दिशा.

काळ्या तिळाने युक्त पाण्याने पिंडाची पूजा त्यावर सिंचन करावे. हे शक्य नसल्यास तिळाने तर्पण करावे (पृथ्वीवर पितरांना पाणी देणे.) पितर असे म्हणतात, की माझ्या कुळात कोणी असा बुद्धीमान माणूस जन्म घेईल जो पैशाच्या मोहाला बळी पडता आमच्यासाठी पिंडदान करेल. पैसा असताना आमच्यासाठी रत्न, वस्त्र तसेच सर्व योग्य वस्तूंचे दान करेल किंवा अन्न, वस्त्र यासारखे दान श्राद्धकाळात श्रद्धापूर्वक करेल शांत चित्ताने ब्राह्मणाला यथाशक्ती जेवायला घालेल किंवा अन्नदान करण्यास अमसर्थ असताना फळ, कंदमुळे भाज्या, दक्षिणा देईल हेही करण्यास असमर्थ असताना हात जोडून एक मूठभर काळे तीळ देईल किंवा आमच्यासाठी पृथ्वीवर श्रद्धापूर्व सात-आठ तिळांनी युक्त पाण्याचे तर्पण वर करून दुपारी आदराने भक्तीपूर्वक या मंत्राचे उच्चारण करेल.

नमेऽस्ति वित्तं धनं

चान्यच्छाध्दस्य योग्यं स्वपितृन्नतोडसि।

तृप्यन्तु भक्त्या पितरो मयैतो

भुजौ ततो वर्त्मीन भारुतस्य।।

अर्थ -: माझ्याजवळ श्राद्धासाठी लागणारे साहित्य नाही म्हणून मी माझ्या पितरांना नमस्कार करतो. ते माझ्या भक्तीने तृप्ती मिळवतील. मी आपले हात आकाशाकडे केले आहेत. या प्रकाराने श्राद्ध केल्यास पितर संतुष्ट होऊन कर्त्याला संपूर्ण संमुखी जीवनाचा आशीर्वाद देतात.

फळ का मिळत नाही :-

श्राद्धाचे दान योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीस दिल्यास, पारंपरिक पद्धत पाळल्यास, योग्य दक्षिणा दिल्यास श्राद्ध फळ मिळत नाही. जे श्राद्ध श्रद्धेने केले नाही, त्यावर दुष्ट प्राण्याची नजर पडली तर ते फळ असुरग्रहण करतात असे म्हटले जाते.याच प्रकारच्या श्राद्धाचा अधिकारी वामनाने बळीराजाला बनवले. तसेच राम जेव्हा सीतेसह रावणाचा संहार करून परत आले त्यावेळी सीतेने सांगितले की, त्रिजटा आपली भक्ती करते. तेव्हा रामाने त्या राक्षसीला वर दिला की, ज्या श्राद्ध करणार्या व्यक्तीच्या घरात चांगली सामग्री, योग्य विद्या पात्र नाही, सर्व योग्य असतानाही श्राद्ध करत नसेल जो दक्षिणा देत नाही त्यांचे फळ मी तुला देतो. याचप्रमाणे शंकराने वासुकी नागाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन वर दिला 'नागराज, ज्या माणसाने श्राद्ध करण्यापूर्वी देवाचे नाव घेतले नाही, योग्य दक्षिणा दिली नाही, देवाब्राह्मणांच्या साक्षीचे उच्चारलेल्या गोष्टी पाळल्या नाहीत. श्राद्ध विधी केला नाही अशा श्राद्ध यज्ञाचे फळ मी तुला देतो'.

ब्राह्मणाला काही दिले जात असेल तर त्यावेळी कोणाला मनाई करू नये. दान देणार्याला थांबवणार्यास गुरुहत्येचे पातक लागते. एवढेच नाही तर अशा व्यक्तीकडून दिलेला पदार्थ देव, अग्नी पतरही ग्रहण करत नाहीत. श्राद्धाचे दान अपात्र, नास्तिक, गुरुद्रोहीला देण्यापेक्षा पाण्यात सोडावे.

श्राद्धाचे पदार्थ :- कुत्रा, कोंबडा, डुक्कर आणि अपवित्र व्यक्तींच्या नजरेपासून वाचवावे

 

मागे

श्राद्ध कोणी व का करावे?
श्राद्ध कोणी व का करावे?

. सगळ्या जाती, धर्म, संप्रदाय व वर्णाच्या लोकांनी करावे. 2. संतान प्राप्ती व प....

अधिक वाचा

पुढे  

केळीच्या पानावर वाढू नये श्राद्धाचे भोजन
केळीच्या पानावर वाढू नये श्राद्धाचे भोजन

श्राद्धात शुद्धतेचं खूप लक्ष दिलं जातं. भोजन कोणत्या धातूच्या भांड्यांतून ....

Read more