ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माहीम सार्वजनिक वाचनालयात कालिदास दिन साजरा

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 06, 2019 01:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

माहीम सार्वजनिक वाचनालयात कालिदास दिन साजरा

शहर : मुंबई

माहीम सार्वजनिक वाचनालयात कालिदासदिनाचे औचित्य साधून 'पाऊस कविता वाचन' ह्या कार्यक्रमाचे  पावसाच्या आगमनातच आयोजन केले गेले. डॉक्टर लीना दोशी यांनी महाकवी कालिदास व 'मेघदूत' ह्या काव्याविषयी ची माहिती उपस्थितांना दिली. कालिदासांनी  यक्षाला त्याच्या पत्नीसाठी संदेश पोचवण्यासाठी मेघाचा जो आधार घेतला त्याचे वर्णन उपस्थितामध्ये दाद मिळवून गेली.

रविंद्र बोरकर यांनी कवी अशोक बागवे यांची 'ढगांवर ढग ' ही कविता सादर केली. भरत अंबीये, राज चिंचनकर , गौतमी परुळेकर, उमा जोशी, अनिता सावंत , शैला वैद्य व अनेकांनी पावसावरच्या कविताना उजाळा दिला. उपस्थितांचे कवितावाचन व बाहेर संततधार पडत असणार्‍या पावसामुळे कार्यक्रमाची ऊंची ही वेगळ्या शिखरावर  पोहचली होती. अवधूत परळकरानी कवी नलेश पाटलांच्या कवितेतील निवडक पावसावरच्या ओळी वाचून दाखवल्या.कार्यक्रमाची सांगता देवदास नाडकर्णी यांनी इंदिरा संत यांच्या 'ऐक जरा ना' ह्या कवितेनी केली.

मागे

रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा
रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा

रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. शिवराज्याभिषेक सोहळया....

अधिक वाचा

पुढे  

90 वर्षांनंतर उस्मानाबादकरांना अखिल भारतीय साहित्य समेलन आयोजन करण्याची संधी
90 वर्षांनंतर उस्मानाबादकरांना अखिल भारतीय साहित्य समेलन आयोजन करण्याची संधी

93 व्या अखिल भारतीय साहित्य समेलनासाठी या वर्षी  नाशिक, बुलढाणा, लातूर आणि उ....

Read more