ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लक्ष्मी पूजनात नक्की असाव्या या 8 शुभ वस्तू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2019 12:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लक्ष्मी पूजनात नक्की असाव्या या 8 शुभ वस्तू

शहर : मुंबई

दिवाळीच्या शुभ प्रसंगी महालक्ष्मी पूजनाचे विधान आहे. या दिवशी घर आणि देवघर सजवण्यासाठी मंगळ वस्तू वापरल्या जातात. जाणून घ्या गृह सुंदरता, समृद्धी आणि दिवाळी पूजनात कोणते 8 शुभ प्रतीक आहेत ते:

दिवा

दिवाळी पूजनात दिव्याचे अत्यंत महत्त्व आहे. लक्ष्मी पूजनात केवळ मातीच्या दिव्यांचे महत्त्व आहे. पाच तत्त्व माती, आकाश, जल, अग्नी आणि वायू. म्हणून प्रत्येक विधीत पंचतत्त्वांची उपस्थिती अनिवार्य आहे. काही लोकं पारंपरिक दिवे लावता मेणबत्ती किंवा इलेक्ट्रिक दिवे लावतात, असे करणे योग्य नाही.

रांगोळी

सण- उत्सव आणि अनेक मांगलिक प्रसंगी रांगोळी काढल्याने घर-अंगण सुंदर दिसतं आणि याने घरात सकारात्मकता राहते. अशी सजावट समृद्धीचे दार उघडते.

कवड्या

पिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीच्या प्रतीक मानल्या गेल्या आहेत. दिवाळीच्या दिवशी चांदी आणि तांब्याचे शिक्के यासह कवड्या पूजन देखील महत्त्वाचे आहे. पूजनानंतर एक-एक पिवळी कवडी वेगवेगळ्या लाल कपड्यात गुंडाळून घरातील तिजोरी किंवा खिशात ठेवल्याने धन समृद्धी वाढते.

तांब्याचा शिक्का

तांब्यात सात्त्विक लहरी उत्पन्न करण्याची क्षमता इतर धातूंपेक्षा अधिक असते. कलशामध्ये असणार्या लहरी वातावरण प्रवेश करतात. कलशामध्ये तांब्याचा शिक्का टाकल्याने घरात शांती आणि समृद्धीचे दार उघडतील.

मंगल कलश

जमिनीवर कुंकाने अष्टदल कमळ आकृती बनवून त्यावर कलश ठेवलेला असतो. पाण्याने भरलेल्या कांस्य, तांबा, रजत किंवा स्वर्ण कलशात आंब्याचे पान टाकून त्यावर नारळ ठेवलेलं असतं. कलशावर कुंकू, स्वस्तिक चिन्ह आणि त्यावर लाल दोरा बांधलेला असतो.

श्रीयंत्र

धन आणि वैभवाचे प्रतीक आहे लक्ष्मी श्रीयंत्र. हे अत्यंत प्रसिद्ध प्राचीन यंत्र आहे. श्रीयंत्र धनागमासाठी आवश्यक आहे. श्रीयंत्र यश आणि धनाची देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी शक्तिशाली यंत्र आहे. दिवाळीच्या दिवशी श्रीयंत्र पूजा करणे शुभ असतं.

फुल

कमळ आणि झेंडूचे फुलं : कमळ आणि झेंडूचे फुलं शांती, समृद्धी आणि मुक्ती चे प्रतीक मानले गेले आहे. पूजा व्यतिरिक्त घराच्या सजावटीसाठी झेंडूचे फुलं आवश्यक आहे. घराची सुंदरता, शांती आणि समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे.

नैवेद्य

लक्ष्मीला नैवद्यात फळं, मिष्टान्न, मेवे आणि पेठे या व्यतिरिक्त लाह्या, बत्ताशे, चिरंजी, शंकरपाळे, करंजी इतर फराळाचा नैवेद्य लावावा. हे गोड पदार्थ आमच्या जीवनात गोडवा घोळतात.

मागे

धनतेरस: 13 दिवे लावा आणि पूजा करताना हे लक्षात ठेवा
धनतेरस: 13 दिवे लावा आणि पूजा करताना हे लक्षात ठेवा

आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे काय कारण आहे..निश्चितच आर्थिक अडचणी द....

अधिक वाचा

पुढे  

येथे केवळ स्वस्तिक काढा आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करा
येथे केवळ स्वस्तिक काढा आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करा

शास्त्रात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहे. स....

Read more