ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नारायण राणेंच्या 'नो होल्ड्स बार्ड' पुस्तकाच्या प्रकाशनाला शरद पवार उपस्थित राहणार

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 29, 2019 11:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नारायण राणेंच्या 'नो होल्ड्स बार्ड' पुस्तकाच्या प्रकाशनाला शरद पवार उपस्थित राहणार

शहर : मुंबई

स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या 'नो होल्ड्स बार्ड' या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे कळते. विशेष म्हणजे  या इंग्रजी  पुस्तकाच्या मराठी आवृतीला शरद पवार यांची प्रस्तावना आहे. मात्र या प्रकाशन सोहळ्यासाठी ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप होकार दिलेला नाही. हा प्रकाशन सोहळा मुंबईत 16 ऑगस्ट ला होणार आहे.

या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 4 ऑगस्ट ला करण्याचे निश्चित झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखल त्यासाठी उपस्थित राहणार होते. परंतु त्यांनी अद्याप कोणतीही वेळ दिलेली नाही. त्यामुळे कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलल्याचे बोलले जाते. या आत्मचरित्राची सुरुवातच 'जर्नी टू नारायणराव' अशी आहे. एकूण 12 प्रकरणांमधून गौप्यस्फोट, दावे आणि आठवणींना उजाळा देण्यात आल्याचे कळते.

 

मागे

93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  उस्मानाबाद ला
93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  उस्मानाबाद ला

93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2020 मध्ये उस्मानाबाद येथे होण....

अधिक वाचा

पुढे  

 श्रावणात राशीनुसार करू शकता शिव पूजा
श्रावणात राशीनुसार करू शकता शिव पूजा

महादेवाचा प्रिय महिना श्रावण शुक्रवार 2 ऑगस्टपासून 30 ऑगस्टपर्यंत राहील. या ....

Read more