ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रत्येक माणसाने शक्य होईल तेथे तेथे वाचन करावे- मिलिंद गुणाजी

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 18, 2019 05:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रत्येक माणसाने शक्य होईल तेथे तेथे वाचन करावे- मिलिंद गुणाजी

शहर : मुंबई

"प्रत्येक माणसाने शक्य होईल तेथे तेथे वाचत राहिले पाहिजे". असे अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी नॅशनल लायब्ररी, बांद्रा येथे वाचंनालयाच्या  फिरते ग्रंथालय उपक्रमाचे उद्घाटन करताना म्हटले. "मी आज जे काही आहे ते प्रचंड वाचंनामुळेच आहे. तुम्हीही वाचल पाहिजे" अस ही ते पुढे म्हणाले.

102 वर्षाची प्रदीर्घ व उज्जवल परंपरा असलेल्या नॅशनल लायब्ररी , बांद्रा येथे वाचकांना घरपोच पुस्तके वाचता यावीत आणि वाचनाची सवय वाढावी यासाठी वाचंनालयाने  नवीन फिरते वाचनालय सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संस्थेच्या आवारात शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय अँड. आशीष शेलार आणि सुप्रसिद्ध अभिनेते 'भटकंती' कार मिलिंद गुणाजी याच्या हस्ते पार पडला.

या फिरत्या वाचनालयात विविध विषयाची व मराठी सह इंग्लिश व इतर भाषेचीही  पुस्तके वाचकांना उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी अत्यंत नाममात्र शुल्क भरून वाचकांना यात सहभागी होता येईल असेही संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे. नॅशनल लायब्ररी कडून व्याख्यानमाला, कवि समेलंन, महिला दिवस, वाचन प्रेरणा, दिन दिवाळी पहाट असे विविध उपक्रम राबवले जातात .

यावेळी कार्यक्रमाला लेखक अनिल कालेलकर, ग्रंथालय संचालक सुभाष राठोड, शालिनी इंगोळे,संजय बनसोड , जिल्हा ग्रंथालय अधिकारी, मुंबई उपनगर ,बाल साहित्यिक ज्योती कपिले , वृषाली शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

मागे

व्हराडी कादंबरीकार पुरुषोतम बोरकर कालवश
व्हराडी कादंबरीकार पुरुषोतम बोरकर कालवश

सुप्रसिद्ध व्हराडी कादंबरीकार पुरुषोतम बोरकर यांचे काल रात्री 8 च्या सुमार....

अधिक वाचा

पुढे  

93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  उस्मानाबाद ला
93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  उस्मानाबाद ला

93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2020 मध्ये उस्मानाबाद येथे होण....

Read more