By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 28, 2019 01:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
हिंदू धर्मात नवरात्रीचं खूप महत्त्व आहे. या सणात पूजा-पाठ दरम्यान पारंपरिक परिधान घालणे आवडतात. तसेच पूजा करताना देवी आईच्या स्वरूपानुसार कपड्यांचे रंग निवडल्यास शुभ फल प्राप्ती होते असे समजले गेले आहे. रंग आणि आमच्या देवी-देवता, सण यांच्याशी विशेष संबंध आहे. प्रत्येक देवी किंवा दैवातला एखादा रंग प्रिय असतो. अशात या दिवसांमध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करणे शुभ ठरेल जाणून घ्या:
1. शैलपुत्री (Shailputri)
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री ची पूजा केली जाते. या दिवशी पिवळा रंग परिधान करणे शुभ मानले गेले आहे. नवरात्रीची सुरुवात पिवळे वस्त्र परिधान करून करावी.
2. ब्रह्मचारिणी (Brahmacharini)
नवरात्रीच्या दुसर्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या दिवशी हिरवा रंग परिधान करणे शुभ ठरेल. हिरव्या रंगाचा कोणातही शेड घालणे योग्य ठरेल.
3. चंद्रघंटा
(Chandraghanta)
नवरात्रीच्या तिसर्या दिवशी फिकट तपकिरी रंग परिधान करणे योग्य ठरेल.
4. कूष्माण्डा (kushmanda)
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंगाचे कपडे परिधान करावे.
5. स्कंदमाता (Skandmata)
भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी देवी स्कंदमातेची पूजा पांढरे वस्त्र परिधान करून करावी.
6. कात्यायनी (katyayani)
सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते आणि या देवीचा आवडता रंग आहे लाल. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे.
7. कालरात्री (kalratri)
नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी निळा रंग परिधान करणे योग्य ठरेल.
8. महागौरी (Mahagauri)
महागौरी देवीची पूजा करताना गुलाबी रंग घालणे शुभ ठरेल. अष्टमीची पूजा करताना आणि कन्या भोज करताना या रंगाचे वस्त्र परिधान करावे.
9. सिद्धिदात्री (Siddhidatri)
नवरात्रीच्या शेवटल्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते आणि या देवीला जांभळा रंग आवडतो.
नवरात्रीत घटस्थापना करून नऊ दिवस मनोभावे देवीची आराधना केली जाते. नवरात्री....
अधिक वाचा