By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2019 01:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे काही नवीन नाही गतवर्षी यवतमाळ येथे नयनतारा सहगल यांच्यावरुन गोंधळ आणि वाद उदभवला होता. आता ह्यावर्षी अध्यक्ष निवडीवरुन वाद उद्भवला आहे. 2 दिवसापूर्वीच फादर दिब्रिटो यांची निवड झाली होती. मात्र निवड झाल्यानंतर आता फादर यांच्या विरोधी गटाने मंडळाच्या कार्यकारणीला धमकविण्याचे प्रकार सुरू की केले आहेत.
या अगोदर निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्ष निवडले जात असत. मात्र गेल्या वर्षी पासून अध्यक्ष निवडीसाठी ठराव केले जात आहेत. ह्यावर्षी वसई राहणारे साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड केली गेली होती. हे साहित्य समेलन उस्मानाबाद येथे होणार असून ह्या वर्षी 93 वे वर्ष आहे.
उस्मानाबाद येथे होणाऱ्या नियोजित ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड केल्याबद्दल साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धमक्यांचे फोन येत असल्याचे सूत्रांकडून कळत आहे.
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनाही धमकीचे फोन आले असल्याचे कळते. याप्रकरणी बोलताना ठाले पाटील म्हणाले, “आम्हाला धमक्यांचे फोन येत आहेत ही खरी बाब आहे. फादर दिब्रिटो यांच्या निवडीला विरोध करणारे मला स्वतःला 20 ते 25 फोन येऊन गेले आहेत. तर आणखी काही अनोळखी मिस्ड कॉलही आले आहेत. यामध्ये जास्तीत जास्त फोन हे ठाणे, कल्याण, मुंबई येथून आले आहेत. आम्ही तुमचा दुर्योधन करु, तुम्हाला पाहून घेऊ अशा प्रकारे धमक्या फोनमधून देण्यात आल्या आहेत. मात्र, अशा धमक्यांना न घाबरता आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत.” असे ठाले पाटील यांनी सांगितले
फादर दिब्रिटो यांची निवड करण्याचा निर्णय एकट्या दुकट्याने घेतलेला नाही तो एकमताने झाला आहे. दिब्रिटो यांच्या निवडीनंतर मराठीतील सर्व माध्यमांसह मान्यवरांनी याचे स्वागत केले आहे. विकास आमटेंनीही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिब्रिटो यांचे पत्र लिहून अभिनंदन केले आहे. या पार्श्वभूमीवर आम्हाला येत असलेल्या फोनकडे आम्ही पाहतो. माझ्यासह पुण्यातील साहित्य महामंडळाचे पदाधिकारी प्रा. मिलिंद जोशी यांनाही अशा प्रकारे धमक्यांचे फोन आले आहेत
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन अध्यक्ष निवडीची बैठक पार पडली. महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ या साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांसह संलग्न संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
भाद्रपद मास कृष्ण पक्षाच्या श्राद्ध पक्ष व्यतिरिक्त चैत्र कृष्ण प्रतिपदे....
अधिक वाचा