By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2020 11:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
भाद्रपद महिन्याचा शुक्ल पक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मातील परंपरेमध्ये पितृपक्षाला खूप महत्व आहे. या काळात लोकं आपल्या पितरांचं स्मरण करतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध घालतात. त्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्य करत नाहीत. पितृ पक्षात एकूण 16 श्राद्ध होतात. यंदा पौर्णिमा श्राद्ध आज, 2 सप्टेंबर तर सर्वपितृ अमावस्या श्राद्ध 17 सप्टेंबर रोजी आहे.या श्राद्धांच्या भोजनात आपल्या पूर्वजांना आवडत्या गोष्टींचं भोजन केलं जातं, यामुळं पितर खुश होतात, अशी समजूत आहे. पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. श्राद्धविधीत अन्य गोत्रातील अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. पितृ पंधरवड्यात पितर म्हणजेच मृत पूर्वज घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, अशीही समजूत आहे.या काळात महाराष्ट्रात महाळ घातले जातात. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावे पूजा घातली जाते. तसेच एका व्यक्तिला पितर समजून त्याला भोजन दिले जाते.
पितृ पक्षात श्राद्धाच्या तारखा
1 श्राद्ध: (पौर्णिमा श्राद्ध): 1 सप्टेंबर 2020
2 श्राद्ध: 2 सप्टेंबर 2020
3 श्राद्ध: 3 सप्टेंबर 2020
4 श्राद्ध: 4 सप्टेंबर 2020
5श्राद्ध: 5 सप्टेंबर 2020
6 श्राद्ध: 6 सप्टेंबर 2020
7 श्राद्ध: 7 सप्टेंबर 2020
8 श्राद्ध: 8 सप्टेंबर 2020
9 श्राद्ध: 9 सप्टेंबर 2020
10 श्राद्ध: 10 सप्टेंबर 2020
11 श्राद्ध: 11 सप्टेंबर 2020
12 श्राद्ध: 12 सप्टेंबर 2020
13 श्राद्ध: 13 सप्टेंबर 2020
14 श्राद्ध: 14 सप्टेंबर 2020
15 श्राद्ध: 15 सप्टेंबर 2020
16 श्राद्ध: 16 सप्टेंबर 2020
17 श्राद्ध: 17 सप्टेंबर (सर्वपितृ अमावस्या) 2020
यंदा 17 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावास्येला या पितृपक्षाचा अखेरचा दिवस असेल. 17 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावास्येला मोठ्या प्रमाणात श्राद्धविधी होतात.
गणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन झाल्यावर सर्व वाट बघत असतात गौरींच्या आगमनाच....
अधिक वाचा