By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 18, 2019 11:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बुलढाणा
सुप्रसिद्ध व्हराडी कादंबरीकार पुरुषोतम बोरकर यांचे काल रात्री 8 च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 63 वर्षाचे होते. गेल्या वर्षीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. 'मेड इन इंडिया' ही त्यांची ग्रामीण भागाचे चित्रण असलेली कादंबरी बरीच गाजली.
आमदार निवासातील सव्यपरिस्थितीवर त्यांनी 'आमदार निवास 1756' ही कादंबरी लिहिली. तर राष्ट्रीय कार्यक्रम कसा साजरा करण्यात येतो याचे त्यांनी '15 ऑगस्ट भागिले 26 जानेवारी' या कादंबरीतून मांडले आहे. त्यांनी 15 ते 20 गझला, 10 ते 15 चरित्रात्मक पुस्तकांचेही लेखन केले. त्यांनी आपल्या साहित्यात व्हराडी भाषा शैलीचा बाज कायम राखला. त्यांनी काही काळ अकोला मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीही केली. त्यानतर एका वृतपत्रात अनेक वर्ष विनोदी सदर ही चालवले. बोरकर यांच्या पार्थिवावर सुताळा येथे आज सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
आंबेडकरी चळवळीतील नेते आणि जेष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे विक्रोळी येथील त....
अधिक वाचा