By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 16, 2019 05:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आंबेडकरी चळवळीतील नेते आणि जेष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे विक्रोळी येथील त्याच्या निवासस्थानी निधन झाले. ते बंडखोर लेखक म्हणून प्रसिद्ध होते. 'दलित पॅंथर' या सामाजिक संस्थेचे ते संस्थापक होते. त्याआधी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या राजा ढाले गटाचे ही ते प्रमुख होते.
आंबेडकरी चळवळ पुढे नेणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणार्या विचारवंतनमद्धे राजा ढाले यांची गणना होते. 'दलित पॅथर' ची स्थापना त्यांनी नामदेव ढासळ आणि अरुण कृष्णाजी कांबळे यांच्या मदतीने केली होती.
विक्रोळी येथे बुधवारी दुपारी 12 वाजता त्यांच्या निवासस्थांनातून त्यांची अंत्ययात्रा सुरू होइल आणि दादर चैत्यभूमी या ठिकाणी त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे.
"राजा ढाले याच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार , मार्गदर्शक , दलित पॅथऱचा महानायक हरवला आहे", अशी भावपूर्ण श्रद्धांजली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अर्पण केली.
आषाढी एकादशी निमित माननीय सास्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी प्रतीपंढर....
अधिक वाचा