By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 03:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आपल्या हिंदुसंस्कृतीत कुणी कुणाची आई आहे, तर कुणी कुणाचा भाऊ किंवा बहीण आहे. आपल्याकडे पती, पत्नी,मामा, काका, काकी, मावशी अशी अनेक नाती आहेत. मित्रांनो, ही नाती नसती, तर आपण आदर्श जीवनजगू शकलो असतो का ? ही नातीच आम्हाला आदर्श जीवन जगण्याचा पाठ शिकवतात; परंतुपाश्चात्त्यांच्या अनुकरणाच्या विकृतीने ही सर्व नाती दुरावतील कि काय, याचीच चिंता वाटते. आजकालआपण पहातो की, कुणाला कुणाविषयी प्रेम आणि आपुलकीच उरली नाही.
हिंदु संस्कृतीतील रक्षाबंधन सणामुळे ‘बहीण – भावा’च्या नात्याचे संवर्धन होणे : मित्रांनो,रक्षाबंधन हा सण ‘बहीण-भावा’च्या नात्याचे संवर्धन करतो. बहीण आणि भाऊ यांच्यातील नात्यालासुद्धाफार महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. यातून त्यांच्यामधील प्रेम वृद्धींगत होते. राखीबांधणार्या बहिणीचे रक्षण करण्याचे दायित्व भावाचे असते.
रक्षाबंधनाने या नात्याचे पवित्र बंधनात रूपांतर होणे : जेव्हा एखादी मुलगी अथवा स्त्रीएखाद्या मुलाला किंवा पुरुषाला राखी बांधते, त्या क्षणाला ती त्याची बहीण होते. आपले सण किती महानआहेत ना ! एका रक्षाबंधनाने नात्याचे पवित्र बंधनात रूपांतर होते.
आपल्या सणांचे महत्त्व न जाणल्याचे दुष्परिणाम : आज आपले दुदैव असे की, ज्या दिवसांनामहत्त्व नाही, ते आपण आंधळ्यासारखे साजरे करत आहोत. आजच्या मुलांना रक्षाबंधनाचे महत्त्व ठाऊकनसल्याने ते पाश्चात्त्यांचे ‘फ्रेंडशिप डे’, ‘रोज डे’, ‘व्हॅलेंटाईन डे’ असले निरर्थक आणि अर्थहीन ‘डे’(दिवस) साजरे करतात. मित्रांनो मला सांगा, या ‘डे’ साजरे करण्यातून कोणती पवित्र नाती समाजातनिर्माण होतात ? समाजाला यातून कोणता लाभ होतो ? उलटपक्षी हानीच होते.मित्रांनो, मग आपण हे ‘डे’ का साजरे करायचे ? तुम्ही नाही ना हे साजरे करणार ? रक्षाबंधनाच्यादिवशी आपण निश्चय करूया, ‘आम्ही पाश्चात्त्यांचे निरर्थक ‘डे’ साजरे करणार नाही !’
रक्षाबंधन म्हणजे दिवसेंदिवस स्त्रियांवर वाढणारे अत्याचार रोखण्याचा निश्चय करण्याचादिवस ! : मित्रांनो, आपण प्रत्येक दिवशी वर्तमानपत्रात स्त्रियांवरील अत्याचारांच्या बातम्या वाचतो.समाजातील ही विकृती आपल्याला नष्ट करायची असेल, तर प्रत्येक पुरुषाने ‘या राष्ट्रातील प्रत्येक स्त्रीमाझी बहीण आहे आणि तिचे रक्षण करणे, हे माझे परम कर्तव्य आहे’, असा निश्चय केला पाहिजे.त्यामुळे यापुढे समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार नक्कीच थांबतील. हेच खरे रक्षाबंधन ठरेल !
खास करुन आपल्या मुलांना याबाबत माहिती दया कारण ही माहिती त्यांना होणे आवश्....
अधिक वाचा