ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सर्वपितृ मोक्ष अमावस्या 2020: श्राद्ध करण्याची वेळ आणि पद्धत जाणून घ्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2020 01:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सर्वपितृ मोक्ष अमावस्या 2020: श्राद्ध करण्याची वेळ आणि पद्धत जाणून घ्या

शहर : मुंबई

सर्वपितृमोक्ष अमावस्या ही पितरांना निरोप देण्याची शेवटची तिथी असते. 15 दिवस पितरं आपल्या घरात वास्तव्यास असतात आणि आपण त्यांची सेवा करतो मग येते वेळ त्यांना निरोप देण्याची. म्हणून याला 'पितृविसर्जनी अमावस्या, 'महालय समापन' किंवा महालय विसर्जन देखील म्हणतात.

जर एखाद्याला श्राद्ध तिथीमध्ये श्राद्ध करणे जमले नसल्यास किंवा श्राद्धाची तिथी माहित नसल्यास सर्वपितृ मोक्ष अमावस्येला श्राद्ध करू शकतात.

सर्वपितृमोक्ष अवस किंवा अमावस्या त्या सर्व पितरांसाठी देखील असते ज्यांना आपण ओळखत नाही. म्हणून सर्व ओळखीचे आणि अनोखळी पितरांचे श्राद्ध या दिवशी आवर्जून करावे. असे विश्वास आहे की या दिवशी सर्व पितरं आपल्या दारी येतात.

श्राद्ध करण्याची वेळ

सर्वपितृ मोक्ष अमावस्या :
16
सप्टेंबर 2020 रोजी 19:58:17 पासून सुरु होऊन 17 सप्टेंबर 2020 रोजी 16:31:32 वाजता संपणार.

कुपत, रोहिणी आणि मध्यान्ह काळात (दुपारच्या वेळी) श्राद्ध करतात : विद्वान ज्योतिषी मानतात की श्राद्धाच्या 16 दिवसात कुपत, रोहिणी किंवा मध्याह्न काळातच श्राद्ध केले पाहिजे. हा कुपतकाळ दिवसाचा आठवा मुहूर्त काळ असतो. तारखेनुसार हा मुहूर्त दररोज वेगवेगळा असतो. कुपतकाळात दिलेल्या देणगीचे अक्षय फळ मिळतात.

या दिवशी काय करावं :

1 या दिवशी तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मणाला जेवू घालतात.

2 या दिवशी दररोजची नित्यविधी उरकवून सूर्याला अर्घ्य देऊन पितरांच्या नावाने तर्पण करावं.

3 या दिवशी संध्याकाळच्या वेळी दिवा लावावा आणि पुऱ्या आणि इतर गोड पदार्थ चांगल्या स्थळी ठेवावं. जेणे करून आपले पितरं उपाशी जाऊ नये आणि दिव्याच्या प्रकाशात त्यांना जाण्याचा मार्ग सापडेल.

 

मागे

Pitru Paksha 2020: पितृ पंधरवडा सुरु, कशी होते पूजा, शेवटची तारीख कधी?
Pitru Paksha 2020: पितृ पंधरवडा सुरु, कशी होते पूजा, शेवटची तारीख कधी?

भाद्रपद महिन्याचा शुक्ल पक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृ पंधरव....

अधिक वाचा

पुढे  

नवरात्रात अखंड दिवा लावण्यामागील शास्त्रोक्त कारण आणि नियम
नवरात्रात अखंड दिवा लावण्यामागील शास्त्रोक्त कारण आणि नियम

दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो. देवांकडून आपल्याला संपूर....

Read more