ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 06, 2019 03:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा

शहर : मुंबई

रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. शिवराज्याभिषेक सोहळयासाठी राज्यभरातून शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. बुधवार संध्याकाळपासूनच रायगडावर वेगवेगळया कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन झाल्यानंतर शिवकालीन युद्धकलेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांमध्ये तलवार, भाला, जांबिया, माडू, फरी- गदगा यांचे सादरीकरण झाले. आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचा भव्य आगमन सोहळा होईल.

शिवभक्तांनी रायगडावर स्वच्छता मोहीमही राबवली. रायगडावर बुधवारी झालेल्या कार्यक्रमांना संभाजीराजेंसमवेत पोलंड व चीन येथील प्रतिनीधी उपस्थित होते.

मागे

अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक ,करू नका 'या' चुका
अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक ,करू नका 'या' चुका

अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाण....

अधिक वाचा

पुढे  

माहीम सार्वजनिक वाचनालयात कालिदास दिन साजरा
माहीम सार्वजनिक वाचनालयात कालिदास दिन साजरा

माहीम सार्वजनिक वाचनालयात कालिदासदिनाचे औचित्य साधून 'पाऊस कविता वाचन' ....

Read more