ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

श्रावणात राशीनुसार करू शकता शिव पूजा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2019 07:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 श्रावणात राशीनुसार करू शकता शिव पूजा

शहर : मुंबई

महादेवाचा प्रिय महिना श्रावण शुक्रवार 2 ऑगस्टपासून 30 ऑगस्टपर्यंत राहील. या दिवसांमध्ये महादेवाची विशेष पूजा करावी. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार श्रावण महिन्यात शिव पूजन आणि दर्शन केल्याने भक्तांचे पुण्य वाढते. महादेवाला जल, बिल्वपत्र, रुईचे फुल, धोत्रा अत्याधिक प्रिय आहेत. स्वतःच्या राशीनुसारसुद्धा शिव पूजा करू शकता. येथे जाणून घ्या, राशीनुसार महादेवाची कशाप्रकारे उपासना करावी...

मेष

या राशीचा स्वामी मंगळ आहे. मेष राशीच्या लोकांनी महादेवाला दह्याने अभिषेक करून गुलाल अर्पण

वृषभ

या राशीचा स्वामी शुक्र आहे. या लोकांनी कच्चे दूध आणि पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करावा. महादेवाचे वाहन नंदी म्हणजे एखाद्या बैलाला अष्टमी आणि चतुर्दशी तिथीला हिरवा चारा खाऊ घालावा.

मिथुन

बुध राशीचे स्वामित्व असलेल्या या राशीच्या लोकांनी शिव-पार्वतीला लाल कण्हेरीचे फुल अर्पण करावे. मध आणि पिस्ताचा नैवेद्य दाखवावा. बेलाची सहा पाने अर्पण केल्याने लाभ होईल.

कर्क

या राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र महादेवाच्या मस्तकावर शोभित आहे. शिवलिंगावर कच्चे दूध, रुईचे फुल आणि दही अर्पण करून पूजन करावे. खव्याच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.

सिंह

या राशीचा स्वामी सूर्य आहे. या लोकांनी थंड पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करावा. शिव मंत्राचा रोज जप करावा.

कन्या

या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांनी मुगाच्या डाळीपासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. बेलाचे पान अर्पण करावे.

तूळ

शुक्र या राशीचा स्वामी आहे. श्रावण महिन्यात अष्टमी आणि एकादशी तिथीला शिवलिंगावर पांढरे वस्त्र अर्पण करावे. देवी पार्वतीला शृंगार सामग्री अर्पण करावी.

वृश्चिक

मंगळाच्या या राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. संपूर्ण महिना शिव मंदिराबाहेर गरीबाची सेवा केल्यास साडेसातीचा अशुभ प्रभाव दूर होऊ शकतो.

धनु

गुरुचे स्वामित्व असलेल्या या राशीच्या लोकांनी प्रत्येक गुरुवारी बेसनापासून बनवलेली मिठाई महादेवाला अर्पण करावी. आपल्या आईला पिवळे वस्त्र भेट द्यावे.

मकर

या राशीचा स्वामी शनी आहे. या लोकांनी शिवलिंगावर निळे फुल अर्पण करावे. दिवा लावून महादेवाची पूजा करावी.

कुंभ

हीसुद्धा शनिदेवाची राशी आहे. या राशीच्या लोकांनी महादेव आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करावी.

मीन

गुरुचे स्वामित्व असलेल्या या राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यात कोणत्याही एक ज्योतिर्लिंगाचे दर्शन करावे.

मागे

नारायण राणेंच्या 'नो होल्ड्स बार्ड' पुस्तकाच्या प्रकाशनाला शरद पवार उपस्थित राहणार
नारायण राणेंच्या 'नो होल्ड्स बार्ड' पुस्तकाच्या प्रकाशनाला शरद पवार उपस्थित राहणार

स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या 'नो होल्ड्स बार्ड' या आत्....

अधिक वाचा

पुढे  

ओळख आपल्या भारतीय संस्कॄतीची.....
ओळख आपल्या भारतीय संस्कॄतीची.....

खास करुन आपल्या मुलांना याबाबत माहिती दया कारण ही माहिती त्यांना होणे आवश्....

Read more