By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: मे 17, 2019 03:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
14 फेब्रुवारी 2019! भारतीय इतिहासातील काळा दिवस.
नेमके त्याच दिवशी काही व्यक्तिगत कारणासाठी दिल्लीला जात होतो. सायंकाळी 6 वाजता बसने पुणे विमानतळाला जाण्यास निघालो. दुपारभर कामाची लगबग असल्याने फ़ोन पहिलाच न्हवता. बसमधे बसल्यावर फ़ोन पहिला, अन् कळाले की पुलवामा तेथे सीआरपीएफ च्या काफ़िल्यावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला आहे आणि आपले शूरवीर 18 जवान शहीद झाले आहेत, आणि आणखी काही घायळ झाले आहेत. नकळत डोळ्यातून पानी आले. सतत मोबाईल बघत होतो, हळूहळू शहीदांचा आंकड़ा वाढत गेला. मध्यरात्री पुणे विमानतल्यावर पोहचलो. शहीदांचा आकड़ा 40 वर गेला होता. मनात आग धगधगत होती.
विमानतळावर समोर पाहिले तर सीआरपीएफ चे 4 जवान सुरक्षेसाठी उभे होते. आणि कोणि सुशिक्षित तरुण पार्किंग वरून त्यांच्याशी वाद घालत होता. मला थोडं रहिवले नाही म्हणून त्यांच्या जवळ गेलो आणि पुलवामा हल्याबद्दल चौकशी केली. तर ते म्हणाले "सहाब वो तो हमारे जवानों का नसीब है कि सरहद पर शहीद हो गए। वरना हमारे जैसे है जिनको इन पागलो को समझाना पड़ता है कि हम क्यों खड़े है! यहां पे आपकी रक्षा करने। हम जब आर्मी जॉइन करने के लिए घर से निकलते है तभी बोलते है कि घर जरूर वापिस आएंगे, या खुद चलते आएंगे, या तिरंगे पे लपेट के कोई ले आएगा। पर आएंगे जरूर।"
हे ऐकून फार अभिमान तर वाटलाच, पण मनात एक विचार आला की आपण काय करतो आपल्या देशसाठी?
पहाटे दिल्लीला पोहचलो. तेथेही विमानतळावर जवान त्यांचे काम करत होते. त्यांचा मनात राग होता. परंतु देश सर्वोपरि होता, म्हणून ड्यूटी फर्स्ट! माझा त्यांच्या विषयीचा आदर आणखी वाढला.
कामाच्या ठिकाणी गेलो. सायंकाळी सर्व काम आवरून हॉटेल वर आलो. आधी टीव्ही सुरू करून न्यूज़ पाहिली आणि कळाले की रात्री 9 वाजता सर्व शहिदांची पार्थिव शरीरं पालम विमानतळावर येणार आहेत. आपले मान. पंतप्रधान व अन्य मंत्रीगण त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. खूप दमलो होतो तरी रहावले नाही. त्याच वेळी ताड़कन उठून पालम एयरपोर्ट ला गेलो. सुरू असलेली धावपळ बघत 2 तास उभा होतो. साधारण रात्री 8 च्या सुमारास कैबिनेट मंत्री येण्यास सुरु झाली. बाकी नावे ओळखली नाहीत. परंतु रक्षामंत्री सौ निर्मला सीतारमण आणि खेल मंत्री श्री राजवर्धन सिंग राठौड़ याना पहिले येताना. ते दृश्य विसरत नाही , अत्यंत दु:खाने डोळे पाण्याने लबालब भरलेले दिसले ....... परंतु वाहता येत नाहीत ....
आमच्या सोबत काही मोजकेच नागरिक होते. आणि साधारण 40-50 जनाचा समूह आमच्या पुढे होता. आपले जवान त्यांच्याभोवती घोळका करुन उभे होते. विचारणा केल्यावर कळाले की हे सर्व शहीदांचे परिजन आहेत. एयरपोर्ट वर आल्या पासून माझ्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हते, भयंकर ठंडी होती, फणि जाणवत काही नव्हती कारण आत मध्ये प्रतिशोधची ज्वाला भडकत होती!
ठरल्या वेळी मान. मोदीजी आले आणि त्यांनी श्रद्धान्जली वाहिली , तत्पुर्वीच बाकीच्यानी श्रद्धान्जली वाहिली होती. आपले गृह मंत्री तर शहीदां सोबतच आले होते हे तर सर्वानी tv वर पहिलेच, पण ह्यानंतर जे पहिले त्ये दृश्य मी आयुष्यभर विसरणार नाही.
माननीय श्री मोदीजी श्रद्धान्जली वाहून बाहेर पडले आणि शाहीदांच्या परिजनाना भेटायला आले. डोळ्या देखतचे दृश्य! माननीय प्रधानमंत्री, माननीय गृहमंत्री , माननीय रक्षामंत्री , खेलमंत्री भेटत होते. परिजन ढसाढसा रडत होते आणि हे त्यांना धीर देत होते. भेटत भेटत रक्षामंत्री एका जवानाच्या बहिणीला भेटल्या , ती बहीण सीतारमजीनां म्हणत होती कि
माझी परिक्षा पूर्ण झाली आहे आणि पुढच्याच वर्षी मी BSF जॉइन करणार आहे. त्यावेळी तुम्ही मला माझ्या भावाचा बदला घेण्यासाठी आणि देश रक्षेसाठी सीमेवर जाण्याची परवानगी द्यावी. समोर भावाचे पार्थिव आहे आणि ही वीरांगना अशी मागणी करतीये!
हे ऐकून माननीय सीतारमजीनां रहिवले नाही आणि त्यानी तिला मीठी मारली आणि त्याही मनसोक्त रडल्या.
आणखी एक दृश्य सांगण्यासारखे. आपले माननीय प्रधानमंत्रीजी एका परिजनाला भेटले. साधारण 60-65 वर्षाचे असतील ते. म्हणाले की
मी सुद्धा सेनेत होतो आणि हा माझा दुसरा मुलगा! पहिलाही अतिरेक्यांशी लढतांना शाहिद झाला, छातीवर गोळी खाल्ली त्याने! दुसऱ्याच्या नशिबी ते नाही, म्हणून या भ्याड हल्यात तो शहीद झाला. तिसरा मुलगा नाही , असता तर त्याला ही देशरक्षेसाठीच पाठवला असता. आतापर्यंतच्या आम्हाला सरकार कडून काहीच अपेक्षा नव्हती. परंतु तुमच्या कडून आहे , तुम्ही नक्की पाकिस्तानला धड़ा शिकवणार. आणि गरज लागली तर मी पुनः सीमेवर जाण्यास तैयार आहे ....! मोदीजी स्तब्ध, त्यांचे डोळे पाणावले आणि ढसाढसा रड़ले! त्यांच्या डोळ्यातील आग स्पष्ट जाणवत होती.
हे सर्व पाहताना मला माझं घरचं माणूस सोडून गेल्याचे दुःख होत होतं. एकाही शहिद जवानाचे नाव मला माहीत नव्हते , परंतु आपलेपणाची भावना उचंबळून येत होती । डोळे थांबता थांबत नव्हते!
प्रधानमंत्री आणि कैबिनेट मंत्री गेले आणि आम्हा नागरिकांना श्रद्धान्जली वाहण्याची संधी मिळाली. मी पुढे गेलो, तिथे उभ्या असणाऱ्या एका जवानाने फुलं दिली ती रडत रडत वाहिली. तो जवान किंवा तिथे उभा असणारा प्रत्येकच जवान स्तब्ध उभा होता. कारण तेच ...प्रोटोकॉल! ड्यूटी फर्स्ट! परंतु जसे आपण उरी चित्रपटात पहिले तशेच दृष्य समोर होते. जवान सावधान मध्ये उभा होता, परंतु डोळ्यातून अश्रु वहावत होते, राग झळकत होता, बदल्या ची भावना दिसत होती, की आत्ता परवानगी द्या, जावून त्या अजहर मसूद ला संपवूनच येवू । शेवटी एक सैनिकही मानुस आहे ......त्याला ही मन आहे .....!
जड़ मनाने श्रद्धान्जली वाहिली आणि जाताना उभा असणाऱ्या प्रत्येक सैनिकाशी हात मिळवून आपल्या भावना प्रकट केल्या! आणि मनाशी ठरवले की या पुढे कधीही , कोणता ही सैनिक , कोठेही भेटला तर प्रथम त्याला नमन करणार, शक्य ती मदत करणार! एवढंतरी मी करू शकतोच शकतो!
आणखी एक! दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी बंद ची घोषणा झाली, काल आमचे गावही बंद ची घोषणा झाली! व्यापार बंद! मोर्चात मी सहभागी होतो, पण दृश्य पूर्ण विदारक! सहभागी बरेच जण गप्पा-विनोद करत हसत होते. पान-गुटका खात थुंखत होते, व्यापारधंद्याच्या चर्चा करत होते! नावाला मोर्चात सामील होते, पण.....! विचार आला मनात की दुपारी 4 वाजता हल्ला झाला आणि तरीही एकाही CRPF जवानाने काम बंद केले नाही, उलट आपल्या भावना बाजूला ठेवून आपली ड्यूटी पूर्ण केली! पुणे विमानतळावर, श्रद्धान्जली सभेत, पालम एयरपोर्ट वर, किंवा नंतर शाहीदांना त्यांच्या घरी पोहचवु पर्यन्त किंवा आता पुनः सीमेवर तैनात होवू पर्यन्त .......!!
खरी श्रद्धान्जलि वहावयाची असेल तर काय करावे? हा प्रश्न माझ्या मनात आहे! कोणाकड़े उत्तर असेल तर कृपया कळवावे!
स्वयंपाक घर हे स्त्रियांसाठी stress buster असतं म्हणे किंवा स्वयंपाक करणे म्हणजे म....
अधिक वाचा