By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 06:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कठीण समय येता कोण कामास येतो या उक्तीप्रमाणे सध्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची केविलवाणी अवस्था झाल्यासारखे दिसत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती मात्र जोमात असल्याचे पाहावयास मिळत आहे येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका झालेल्या या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मध्ये भवितव्य नसल्याची खात्री झालेले अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत इतकेच काय पण अनेक बडे नेते भाजप मध्ये येतील असा दावा करण्यात आला आहे. या दाव्याला पुष्टी देणाऱ्या घटना घडत आहेत. तर काही नेते व गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेचे अशी अपेक्षा होती पण तसे काही घडले नाही तरी सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का असल्याचे मानले जात आहे अशा स्थितीत भारतीय जनता पार्टीचे नेते सक्रिय झाले त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या द्विधा मनस्थितीत असलेल्या नेत्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी कॉंग्रेस च्या विखे पाटलांना जाळ्यात ओढले.तरआता काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्वस्थ नेते दाखल होण्याच्या तयारीत आहेत. यात प्रामुख्याने माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधूकर पिचड आणि त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघयांचा समावेश आहे. या तिघांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याचे म्हटले जाते त्याच वेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय काँग्रेसचे विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे अशा रीतीने काँग्रेस-राष्ट्रवादी
-काँग्रेस मधील नेते पक्ष सोडून जात असताना या दोन्ही पक्ष नेत्यांकडूनही गळती रोखण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी थोरांतांची नेमणूक करुण त्यांच्या बरोबर आणखीन चार कार्यअध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या नव्या पक्षाध्यक्षांवर पक्षातील गटबाजी संपुष्टात आणून गळती रोखण्याचे आणि पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांनी आतापासूनच त्यादृष्टीने पावले टाकने अपेक्षित आहे मात्र अजून तरी काँग्रेसकडून काही हालचाल दिसत नाही. अशा स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अडचणीतभर पडत असल्याचे दिसत आहे. पक्ष सोडून दिग्गज नेते जात असतानाच पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यताही धोक्यात
आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची अशाप्रकारे दयनीय अवस्था झालेली दिसत असताना शिवसेना आणि भाजपने विधानसभा जिंकण्याच्या दृष्टीने आखलेल्या रणनीती प्रमाणेच वाटचाल करताना पाहायला मिळत आहे. युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी जन आशिरवाड यात्रा सुरू केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 1 ऑगस्ट पासून महा जनादेश यात्रेस प्रारंभ करणार आहेत.त्याच बरोबर सत्तेच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत अश्या रीतीने भाजप-शिवसेना तयारी करीत असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती असल्याचे अनुभवास येते. खरे तर अजूनही वेळ गेलेली नाही. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी पक्ष संघटनेची बांधणी करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे महिला व तरुण वर्ग आकर्षित करण्यासाठी काही योजना तातडीने अमलात आणल्या पाहिजेत तरच युतीच्या समोर आघाडीचा निभाव लागेल नाहीतर आणखीन पाच वर्षे आघाडीला सत्तेपासून वंचित राहावे लागेल.
गण्या : लय वाईट दिस आले बगा. मण्या : अरे यालाच तर अच्छे दिन म्हणत्यात. ....
अधिक वाचा