ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

७२­ वर्षांनंतरचा भारत

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 02:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

७२­ वर्षांनंतरचा भारत

शहर : मुंबई

येत्या १५ ऑगस्टला भारताला स्वतंत्र होऊन ७२ वर्षे पूर्ण होत आहेत. आणखी तीन वर्षानी आपण स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सवी सोहळा साजरा करणार आहोत. ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी असंख्य देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या सर्वांचे स्मरण व  त्यांच्या ऋणांची आठवण करण्याचा दिवस म्हणजे १५ ऑगस्ट. ब्रिटीशांनी संपूर्ण भारतावर आपले वर्चस्व निर्माण केले. त्यांच्या अधिपत्याखाली देश होता. तेव्हा कमालीचे दारिद्र्य होते. कोणत्याही सुविधा नव्हत्या. कामगारांचे शोषण केले जात होते. १४ ते १६ तास कामगारांना राबवून घेतलं जात होत. ब्रिटीशांचा मनमानी कारभार सुरू होता. अशिक्षित आणि असंघटित ब्रिटीशांच्या लोकांची संख्या मोठी होती. अशा स्थितीतही काही देशभक्तांनी ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध संप बंद करून त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न थिटे पडल्याचे इतिहासाच्या पानात नमूद आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ब्रिटीशांविरुद्ध आवाज उठविला . त्यांच्या निधनानंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली असंख्य भारतीयांनी स्वातंत्र्यासाठी संग्राम केला.महात्मा गांधींनी अहिंसक चळवळीची नवी आयुधे वापरली. त्यात असहकार, सत्याग्रह, उपोषण, यात्रा, असे मार्ग अवलंबून ब्रिटीशांना जेरीस आणले. ९ ऑगस्ट १९४२ रोजी 'छोडो भारत', 'करेंगे या मरेंगे' अशा घोषणा देत देशभर आंदोलन सुरू झाले. सर्व कॉँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाली. पण आंदोलन अधिक भडकले अशा स्थितीत दुसर्‍या महायुद्ध्याची झळ सोसणार्‍या ब्रिटीशांनी अखेर भारताला स्वतंत्र देण्याचा निर्णय घेतला  आणि भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. या घटनेला ७२ वर्षे झाली. इतिहासाचे अवलोकन करून वर्तमानात वाटचाल ७२ वर्षात झाली का? जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा अनेक समस्या होत्या. आजच्यापेक्षा कितीतरी कमी लोकसंख्या असूनही कित्येकांना दोन वेळचे पोटभर अन्नही मिळत नव्हते. जातीयवाद, धर्मवादने थैमान मांडलेले होते. प्रचंड दारिद्रय व अशिक्षितपणामुळे कर्मकांड व अंधश्रद्धेला उत आलेला होता. गुलामगिरी भिनलेली होती. दळणवळणाची अपुरी साधने, संपर्काची माध्यमेही कमी होती. उद्योगधंद्याची वाढ झालेली नव्हती. अन्नधान्यासाठी सुद्धा आपण दुसर्‍या राष्ट्रांवर अवलंबून होतो.

आज काय स्थिती आहे. या ७२ वर्षात तिप्पटीहून अधिक लोकसंख्या असूनही अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वावलंबी आहोत. आज आपण आपल्याकडची धान्ये, फळे, भाजीपाला, आधी निर्यात करतो. शैक्षणिक क्षेत्रातही लक्षणीय प्रगती झाली आहे. दळणवळणाची साधने मुबलक झाली आहेत.  खेडोपाडी रस्ते झाले. रेल्वे पोहोचली तालुका जिल्हा राज्य आणि देश जोडला गेला. संपर्काची प्रगत साधने उपलब्ध झाली. नवी शहरे, नवे उद्योग व्यवसाय उभे राहिले. आज आपण शस्त्रसज्ज आहोत. त्याचबरोबर अंतराळ संशोधांनातही आपल्या शास्त्रज्ञांनी आश्चर्यकारक प्रगती केली आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून आपला दबदबा आहेच. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपण आपला वेगळा ठसा उमटविण्यात यशस्वी ठरलो आहोत.

असे जरी असले तरी अजूनही आपण अपेक्षित प्रगति साधण्यात अपयशी ठरल्याचे मान्य करावे लागेल. आपल्याला अजून दुष्काळावर मात करता आलेली नाही. लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान आहे. वाढती बेरोजगारी, नक्षलवाद फुटीरतावाद रोखण्यात अजून यश आलेले नाही. जम्मू कश्मीरचा अडथळा दूर केला असला तरी आता जम्मू काश्मीरसह लडाखच्या विकासाचामुद्दा आहे. तिला आपण  कसे सामोरे जातो, यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत. हे आव्हानही पेलण्यास आपण समर्थ आहोत, हे जगाला दाखवून देण्याची गरज आहे. स्वतंत्र भारत अमृत महोत्सव जेव्हा साजरा करील तेव्हा हे जगाला दाखवून देण्याची गरज आहे. आपण पंच्याहत्तरीचा महोत्सव जेव्हा साजरा करु, तेव्हा यातील काही समस्या सुटलेल्या असतील, अशी आशा आपण करूया, आणि भारत एक बलशाली राष्ट्र म्हणून उदयाला येवो, अशी प्रार्थना करूया. !

मागे

माणसात पाहिला देव
माणसात पाहिला देव

  ठाणे येथून कोल्हापूरला जाण्यासाठी दिनांक २७ जुलै  रात्री नऊ वाजता महाल....

अधिक वाचा

पुढे  

वडाच्या पारावार
वडाच्या पारावार

गण्या : संत्या आज पारावार यायला एवढा उशीर का ? मन्या : असा सुतकी चेहरा का तुझा....

Read more