ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

 ऑगस्ट क्रांतीचे विस्मरण नको

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 05:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 ऑगस्ट क्रांतीचे विस्मरण नको

शहर : मुंबई

ज्या क्रांतीमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्या ऑगस्ट क्रांतीचे विस्मरण होताना दिसत आहे. कित्येकांना 'ऑगस्ट क्रांती' म्हणजे काय? ती कधी साजरी होते? हे ठाऊक नाही. राष्ट्रवादाची जपमाळ ओढणार्‍यानी तरी ऑगस्ट क्रांतीचे महत्व लोकांना विद करून सांगणे गरजेचे आहे. म्हणूनच आज ऑगस्ट क्रांती का महत्त्वाची होती? याचे विश्लेषण.

स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली तमाम भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध अहिंसक चळवळी केल्या. सत्याग्रह, पोषण, बहिष्कार इत्यादी आयुधांचा वापर केला, पण ब्रिटीश अधिकार्‍यांनी चळवळ दडपून टाकण्याचे प्रयत्नही केले, त्यातून ब्रिटीशांविरोधात असंतोष अधिकच उसळून येत होता. १९४२ च्या सुमारास दुसरे महायुद्ध अधिकच चिघळले होते. या युद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने ब्रिटन सहभागी झाले होते. ही संधी साधण्यासाठी महात्मा गांधींनी भारतीय ब्रिटिश सत्तेविरोधात निर्णायक लढा देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे ब्रिटिशांना 'चले जाव'चा इशारा देण्यासाठी मुंबईतील तत्कालीन गवालिया टॅंक मैदानात ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेसचे अधिवेशन भरले. अधिवेशनात इशारा देतानाच ऑगस्टपासून 'करेंगे या मरेंगे' , 'छोडो भारत' या  घोषणा देत आंदोलन करण्याचे ठरले. मात्र ९ ऑगस्टच्या पहाटे ब्रिटीशांनी  काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली. महात्मा गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये तर नेहरू, पटेल, आझाद आदींना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवल्याचे समजताच देशभर आंदोलन भडकले. या आंदोलनाचे वैशिष्टय म्हणजे यात कोणी पुढारी नव्हता. ऑगस्टला गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जण पुढारी झाला होता आणि ऑगस्टला ब्रिटिशांविरोधात 'छोडो भारत' घोषणा देत जागोजागी हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला होता.

ब्रिटिश सरकारने जमावबंदी आदेश जारी केला, पण लोक ऐकायला तयार नव्हते. सरकारचे आदेश त्यांनी धुडकावले. पोलिसांच्या लाठीहल्याला, गोळीबाराला  लोक जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन  तारा कापणे, दंगल, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट करणे, असे प्रकार सुरू होते. हे आंदोलन दडपण्यासाठी विनाचौकशी कोणालाही अटक केली जात होती.  तुरुंग अपुरे पडले होते. सारा देश गोंधळलेल्या स्थितीत सापडला होता॰ या प्रकाराला ब्रिटीशांनी गांधीजींना जबाबदार ठरवले. गांधीजींनी याचा इन्कार करून त्याच्या निषेधार्थ 21 दिवसांचे उपोषणही केले.

पुढे जगभरातील परिस्थिती बदलत गेली. युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकले होते. अमेरिका नावाची सत्ता उदयास येत होती. तिने युद्धाचे पुढारीपण घेतले होते या साऱ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर क्रांती संग्रामाची तीव्रता ओसरली होती, पण त्याच बरोबर दुसऱ्या महायुद्धात झळ पोहोचलेल्या ब्रिटिशांना यापुढे भारतावर राज्य करणे अवघड असल्याची जाणीव झाली. त्यातूनच पुढे भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दिशेने पावले पडू लागली. या क्रांतीची स्मृती म्हणूनऑगस्टला क्रांतीदिन साजरा केला जातो. जर तेव्हा अशी क्रांती घडून आली सती आणि दुसर्‍या महायुद्धातून  ब्रिटीशांना सावरण्यास अवधी मिळाला असता  तर आजही आपण पारतंत्र्यातच राहीलो असतो, असे म्हटले तर वावगे रु नये.ज्या गवालिया टँक मैदानावर काँग्रेसचे अधिवेशन झाले,  त्या मैदानाला  'ऑगस्ट क्रांती मैदान' असे नाव देण्यात आले आहे. हा सारा  इतिहास स्फूर्तिदायक आहे, म्हणून त्याच्या  स्मृती जपल्या पाहिजेत.

मागे

भारतीय क्रांतीचे प्रणेते लोकमान्य टिळक
भारतीय क्रांतीचे प्रणेते लोकमान्य टिळक

1857 चा स्वातंत्र्यलढ्यानंतरही भारतात ब्रिटिशांविरुद्ध अनेक ठिकाणी बंड पुक....

अधिक वाचा

पुढे  

मला बी यात्रेला येऊ द्या की !
मला बी यात्रेला येऊ द्या की !

संत्या : काठी न घोंगड घेऊ द्या की रं, मला बी यात्रेला येव द्या की ! गण्या : आऱ सं....

Read more