By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2020 10:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मित्रांनो ही गोष्ट आहे 2002 ची, वर्तमानपत्रापासून ते "टी व्ही" पर्यंत फक्त एकाच गोष्टीची चर्चा होती. कसा एक पेपर विकणारा मुलगा ज्याला आधी पायलट बनायचे होते पण तो स्पेस सायंटिस्ट झाला. आणि आता तो भारताचा 11 वा राष्ट्रपती होणार होता. राजकारणाचा लांब-लांब पर्यंत संबंध नसताना सुद्धा त्यांनी हे सिद्ध करून दाखवले की या जगात अशक्य असे काहीच नाही. ते म्हणजे तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके "डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम" सर. कलाम सरांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, पण आजच्या लेखामध्ये आपण 5 अश्या गोष्टी बघणार आहोत ज्या पैकी एक किंवा दोन जरी गोष्टी आपण आपल्या आयुष्यात उतरवू शकलो तर यशस्वी होण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही.
१. आयुष्यात कधीच हार मानू नका-: मित्रांनो "पृथ्वी" आणि "अग्नी" मिसाईल या दोघांच्या यशामागे कलाम सरांचा खूप मोठा हात होता. पण तुम्हाला हे माहिती आहे का या दोघांची पहिली उड्डाणे अयशस्वी ठरली होती. आणि अशी अनेक अपयशे त्यांच्या आयुष्यामध्ये आली होती. आणि ज्या वेळेस हे अपयश त्यांच्या वाट्याला आले तेंव्हा लोकांनी त्यांच्यावर टीका केली, त्यांची खिल्ली उडवली आणि काहींनी त्यांच्या कर्तृत्वावर शंका सुद्धा निर्माण केली. पण जे लोकं मनाने कणखर असतात, ज्यांना स्वतःवर विश्वास असतो, जे कोणत्याही संकटाला कधीच घाबरत नाहीत त्यांना माहिती असते की अपयश हा यशाच्या प्रवासामध्ये येणारा एक भाग आहे. महत्त्वाचे हे आहे अपयश आल्यामुळे कोलमडून जायचे नाही, त्याच्यामुळे थांबायचे नाही. आणि आपले ध्येय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पुढे पुढे जात राहायचे. आपला प्रवास चालू ठेवायचा.
२.नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा-: मित्रांनो कलाम सरांचा जन्म रामेश्वरम सारख्या छोट्या शहरात झाला आणि त्यांचे वडील एक नावाडी होते. पण त्यांचा स्वतःवर विश्वास होता. आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी घरोघरी वर्तमानपत्र वाटली. याच जिद्दीने ते अभ्यास करत पुढे जात राहिले आणि भारताचे सर्वात टॉपचे शास्त्रज्ञ झाले. भारताचे सर्वोत्कृष्ट राष्ट्रपतींपैकी एक झाले. त्यांचे आयुष्य आपल्याला खूप मोठी शिकवण देते, ती म्हणजे तुम्ही कितीही छोट्या शहरात किंवा गावात जन्म घेतला असेल याने काही फरक पडत नाही तुमची स्वप्ने नेहमी मोठी असली पाहिजे.
३. नेहमी स्वतःशी आणि आपल्या कामाशी वचनबद्ध रहा-: "डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम" सरांच्या नावासमोर डॉक्टर ही पदवी लागते आणि ते टॉपचे शास्त्रज्ञ सुद्धा होते. पण तुम्हाल हे माहिती आहे का, त्यांच्याकडे पूर्ण केलेली अशी "पी. एच. डी" डिग्री नव्हती त्यांनी ती मिळवण्यासाठी अर्ज सुद्धा केला होता पण तो फेटाळण्यात आला. पण त्यांच्या कामामुळे त्यांच्या सेवेमुळे त्यांना एक नही, दोन नाही तर तब्बल 40 विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळाली होती. याचा अर्थ आपल्या स्वभावातच स्वतःबद्दल आणि कामाबद्धल वचनबद्धता असेल तर आज ना उद्या तुम्हाल त्याचे फळ नक्कीच मिळते. त्यामुळे नेहमी स्वतःशी आणि आपल्या कामाशी नेहमी वाचनबद्द राहा. कटिबद्ध राहा.
४. नेहमी मोठी स्वप्ने बघा-: मित्रांनो हे गरजेचे नाही की तुमचे प्रत्येक मोठे स्वप्न पूर्णच होईल. पण जेंव्हा तुमचे विचार मोठे असतात तेंव्हा तुमचे प्रयत्न, तुम्ही केलेली मेहनत नेहमी तुम्हाला मोठे यशच देते. कलाम सरांचे स्वप्न होते की "फायतर पायलट" व्हायचे होते. पण फक्त ते एका पोजिशनमुळे राहिले नंतर त्यांनी "डी. आर. डी. ओ" जॉईन केले, ज्याचा फायदा पूर्ण आपल्या देशाला झाला. प्रत्येक यशाची सुरुवात ही एका स्वप्नापासून होते. आणि एका मोठ्या यशाची सुरुवात एका मोठ्या स्वप्नाने होते. त्यांचे "फायतर विमान" चालवायचे स्वप्न सुद्धा पूर्ण झाले. वयाच्या 74 व्या वर्षी 2002 साली त्यांनी भारताचे "सुपर सॉनीक फायतर विमान" सहपायलट म्हणून 40 मिनिटे चालवली. आणि ते भारताचे पहिले एकमेव राष्ट्रपती ठरले ज्यांनी "फायतर विमान" चालवले.
५. नेहमी नम्र राहा, जमिनीवर राहा-: कलाम सरांनी फक्त मोठे यशच मिळवले नाही तर त्यांनी लोकांच्या मनात सुद्धा आपली जागा निर्माण केली. आणि मला वाटते यालाच खरे यश आपण म्हणू शकतो. त्यांच्या नम्र स्वभावामुळेच त्यांना लोकांचे राष्ट्रपती म्हणून संबोधले जायचे. राष्ट्रपती भवनामध्ये सुद्धा ते एक साधे आयुष्य जगत होते आणि जेंव्हा ते राष्ट्रपती झाले तेंव्हा त्यांची पूर्ण जबाबदारी भारत सरकारने घेतली. तेंव्हा त्यांनी आपली सगळी संपत्ती दान केली. जेंव्हा पहिल्यांदा ते राजभावनामध्ये जाणार होते तेंव्हा ते कोणत्याही मोठे व्यक्ती किंवा सुपरस्टारला बोलवू शकले असते, पण त्यांनी बोलवले एका चांभाराला म्हणजे चप्पल शिवणाऱ्याला आणि एका छोट्या हॉटेलच्या मालकाला. मित्रांनो त्यांच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग घडले जे त्यांना एक असामान्य व्यक्ती बनवते. मित्रांनो यांमधील तुम्हाला आवडलेली शिकवण कोणती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
नातं कोणतंही असो मतभेद कितीही असो संबध तोडण्याची भाषा मुळीच कधी करू न....
अधिक वाचा