ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...आणि अंगात वीज सळसळली !

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 26, 2019 03:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

...आणि अंगात वीज सळसळली !

शहर : मुंबई

2011 चे ते वर्ष ! काहीजण शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकाला आणि पत्रलेखकाला त्यांचा राग येत होता .ज्या पितृतुल्य शिवसेनाप्रमुखांच्या प्रेमाचे ,कृपाशीर्वादाने जे लोक धनी झाले त्यांच्यापैकीच काही विशिष्ट व्यक्तीनि आपल्या महत्वाकांक्षीपोटी ,आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी मराठी ऐक्याचा दुभंग घडवीत शिवसेनाप्रमुखांचा विश्वासघात केला त्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी माझ्यातील शिवसैनिक आणि पत्रलेखक जागृत झाला आणि याच ईर्षेपोटी मी तब्बल शंभराहून पत्रे या विश्वासघातकी विरुद्ध वृत्तपत्रातून लिहिली .या प्रसिद्ध झालेल्या पत्राचा संग्रह करून तो पुस्तकरूपाने बाळासाहेबांच्या हस्ते त्याचे प्रकाशन व्हावे ही माझी मनोमन इच्छा होती.ते पुस्तक होते ’नाराजाचा पंचनामा ’.परंतु साहेब कसे आणि केव्हा भेटणार याची चिंता माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला होती.आणि माझ्या मनातील ईच्छा पूर्ण होण्याचा योग आला .आमच्या शाखेचा वर्धापनदिन सोहळा होता मी माझी इच्छा शाखाप्रमुख अनिल गावकर यांजकडे बोलून दाखविली त्यांनी आताचे आमदार अजय चौधरीना सर्व सांगितले पण बाळासाहेबांची प्रकृती ठीक नसल्याने ते भेटतील की नाही ही शंका होती तरीही साहेबाचे आशीर्वाद घेण्यासाठी शाखेतील सैनिक आणि पदाधिकारी आम्ही मातोश्री वर पोहोचलो .काही वेळाने बाळासाहेब हळू हळू खाली हॉल मध्ये आले .साहेबाना बघून माझा ऊर भरून आला होता.साहेबांनी आमची विचारपूस केल्यानंतर चौधरीसाहेबांनी मला बोलाविले आणि मी प्रकाशित करण्याच्या पुस्तकासह साहेबापुढे गेलो.साहेबाना अगदी जवळून पाहिले आणि अचानक माझ्या अंगातून वीज सळसळली .एका दैवी शक्तीची जाणीव झाली .साहेबानी माझे नाव विचारले मी नाव सांगितल्यावर ते पटकन म्हणाले ’अरे मी तुझी रोज पत्रे वाचतो ,छान लिहितोस ’हे शब्द कानावर पडताच मी धन्य झालो .साहेबाच्या पायावर डोके टेकले .यावरून साहेबाचे  आमच्या पत्रलेखकावर किती प्रेम होते याची कल्पना आली . खरोखरच तो दिवस मी माझ्या आयुष्यात कदापि विसरणार नाही .

अरुण पां.खटावकर
लालबाग 400 012

मागे

बेस्ट जगली पाहिजे पण ....
बेस्ट जगली पाहिजे पण ....

आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप अखेर कोर्टाच्या....

अधिक वाचा

पुढे  

जीवनाचे अध्यात्म
जीवनाचे अध्यात्म

आजच्या 21 व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या काळात काळ - काम- वेग यांच्याशी नि....

Read more