By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2019 06:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच समाजसुधारक, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष . चळवळीसाठी आक्रमक आणि आघाताची भाषा रूढ करणारे साहित्यिक म्हणून ते अधिक लोकप्रिय होते. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगांव या गावात 1 ऑगस्ट 1920 रोजी जन्मले. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे. अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळेत गेले पण शाळेत सवर्णाकडून होणाऱ्या भेदभावामुळे शाळा सोडून दिली. शाळेत न जाणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी पुढे जीवनात 35 कादंबर्या लिहिल्या . त्यांच्या लघुकथांचे 15 संग्रह याशिवाय नाटके, रशियातील भ्रमंती हे पुस्तक, 12 पटकथा आणि कथा, मराठी पोवाडा शैलीतील 10 गाणी लिहिली. त्यांनी लिहिलेले 'फकीरा' कादंबरी खूप गाजली. या कादंबरीच्या 19 आवृत्त्या निघाल्या. या कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार 1961 मध्ये मिळाला.फकिरामध्ये अण्णांनी आपल्या समुदायाला पूर्ण भुकमारीपासून वाचण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विरोध करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले आहे. शेवटी फकिराला आणि त्याच्या समुदायला ब्रिटिश अधिकारी अटक करतात . फकीराला फाशी देऊन ठार मारले जाते अशी अस्वस्थ करणारी मन हेलावून टाकणारी कथा खूपच वाचनीय आहे.
अण्णांवर प्रथम कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव होता आणि शाहीर अमरशेख यांच्या सोबत ते लालबाग कलापथक तमाशा नाट्यप्रसाराचे सदस्य होते. या पथकाने त्याकाळी सरकारी निर्णयाणा आव्हान दिले होते. स्वातंत्र्यानंतर देशातील उच्चवर्णीयांचे शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी मुंबईत 20000 लोकांचा मोर्चा काढला होता. या मोर्चाची घोषणा होती. 'ये आझादी झुठी है, देश की जनता भुकी है' इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन मध्येही अण्णांचा सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. चळवळीत त्यांनी मुंबई वर केलेली 'माझी मैना गावाकडं राहिली' ही छ्क्कड खूप प्रसिद्ध झाली.
अण्णाभाऊ साठेंवर ते पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव पडला ते आंबेडकरी चळवळीत सामील झाले तरी त्यांनी कामगारांच्या जीवनावर आधारित त्यांनी कथा लिहिल्या. 1958 मध्ये मुंबईत झालेल्या पहिल्या दलित साहित्य समेलनात आपल्या उद्घाटनीय भाषणात बोलताना अण्णानी,"पृथ्वीहि शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती दलित व कामगार लोकांच्या हातात घेतले आहे" असे म्हटले आहे.
अशा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे छायाचित्र असलेले चार रुपयांचे तिकीट 1 ऑगस्ट 2001 मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. पुण्यातील त्यातील अण्णाभाऊ साठे स्मारक आणि कुर्ला येथील एका उड्डाण पूलासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे. याशिवाय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन भरवण्यात येते. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ ही स्थापन करण्यात आले आहे.
त्यांच्या अनेक साहित्यकृतींची विविध भाषांत भाषांतरे झालेली आहेत. त्यांच्या कथा कादंबर्यांवर मराठी चित्रपट काढण्यात आलेले आहेत. कादंबऱ्यांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. नवमहाराष्ट्राच्या घडणीचा त्यांनी सतत पुरस्कारच केला. "ही अवनी आदिवाशांची, कोळी भिल्लांची, मांग, रामोशी कैक जातींची प्राणाहुन प्यारी" असे म्हणणाऱ्या या महान साहित्यिकाची 18 जुलै 1969 रोजी वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी निधन झाले. त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने विनम्र आदरांजली.
कठीण समय येता कोण कामास येतो या उक्तीप्रमाणे सध्या काँग्रेस राष्ट्रवादी का....
अधिक वाचा