By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 03, 2019 03:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मंगळवारी भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला होता. तब्बल बारा विमाने पाकच्या 50 किलोमीटर हद्दीत घुसवून हजारो किलोचा बॉम्बमारा केला होता. त्यामुळे पाकिस्तानी जनतेला दाखवण्यासाठी पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हद्दीत विमाने घुसविण्याची नाटकं केली.पाकव्याप्त काश्मीर लगत असलेल्या भारतीय हद्दीमधील नौशेरा व राजौरी या भागात पाकिस्तानने आपली विमाने घुसवली. पण भारतीय सुरक्षा यंत्रणा इतकी सतर्क होती की, पाकिस्तानचे एक विमान आपल्या सैन्याने पाडले. भारताने तब्बल 50 किलोमीटर पाकिस्तानात घुसून जो हल्ला केला तेवढा पल्ला गाठण्याची हिंमत पाकिस्तानला करता आलेली नाही. याचे कारण पाकिस्तानची तेवढी कुवत नाही. सीमा ओलांडताच भारताने पाकिस्तानचे एक विमान पाडले. जर पाकची विमाने आणखी आत आली असती तर त्यातील एकही विमान परत जाऊ शकले नसते, हा इशाराही भारताने पाकिस्तानला दिला.
जर भारताची विमाने 50 किलोमीटर अंतरावर घुसू शकतात, यावरून भारताने मनात आणले पाकिस्तानमध्ये असलेले लाहोर हे शहर चुटकीसरशी उडवून देण्याची हिंमत भारतामध्ये आहे, हे सुद्धा या हल्ल्यातून सिद्ध झाले आहे. पण भारत शांतताप्रिय देश असल्याने अतिरेकी तळांवर हल्ला करताना सामान्य लोकांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी भारतीय जवानांनी घेतली.
पाकिस्तानवर लष्कराचा अंकुश असतो. त्यामुळे देशाचा विकास, मानवाधिकार, गरिबी निर्मूलन या गोष्टींना तिथे फारसा थारा नाही. सध्याचे पंतप्रधान इम्रान खान हे सुद्धा पाकिस्तानी लष्कराचेच बाहुले आहेत. पाकिस्तानी लष्करानेच त्यांना या पदावर येण्यास मदत केली आहे. पाकिस्तानमधील विविध अतिरेक्यांना पोसण्याचे काम सुद्धा लष्कर करत असते.
वास्तवात, पाकिस्तानची सध्याची अवस्था कंगाल झालेली आहे. त्यांची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. आम्हाला पैसे द्या म्हणून हा देश जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आखाती देश, चीन यांच्यापुढे झोळी पसरत आहे. सौदी अरेबिया वगळता त्यांना कुणीही मदत करीत नाही. कारण पाकिस्तान मिळालेल्या पैशातून विकासकामे, लोक कल्याणकारी योजना राबविण्याऐवजी अतिरेक्यांना पोसण्याचे काम करतो हे जगाला ठाऊक झाले आहे. पूर्वी अमेरिका पाकिस्तानला भरपूर मदत करायचा. यातूनच आयएसआय, अतिरेकी संघटना मजबूत झाल्या.
पण 9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला मदत करणे सोडून दिले आहे. भारत काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे 1999 चे कारगील युद्ध. पाकने अतिरेक्यांच्या वेशात त्यांचे हजारो सैनिक कारगीलच्या पर्वतांमध्ये घुसवले होते. हिवाळ्याच्या दिवसांत बर्फ पडत असल्याने दोन्ही देशांनी या काळामध्ये आपापले सैन्य मागे घ्यावेत असा सीमला करार झालेला आहे. त्यानुसार भारताने आपले सैन्य मागे घेतले होते. पण पाकिस्तानने विश्वासघात करून त्यांचे सैन्य भारतीय हद्दीत घुसवले होते. पर्वतांच्या शिखरांवर भारतीय बंकरमध्ये पाक सैनिकांनी आश्रय घेतल्याने त्यांना बाहेर काढणे एवढे सोपे नव्हते. भारतामध्ये तेवढी हिंमतच नाही, असा गैरसमज पाकिस्तानच्या लष्कराला झाला होता. पण भारतीय सैन्याने चिवट झुंज देऊन पाकिस्तानच्या सैन्यांचा खात्मा केला. 1971 मध्येही भारतीय लष्कराने पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. त्यातूनच बांगलादेश जन्माला आला.
भारताने पाकिस्तानची खोड अनेकदा जिरवलेली आहे. याउलट पाकिस्तान भारताच्या केसालाही धक्का लावू शकलेला नाही. जागतिक महाशक्ती म्हणून उदयास येऊ पाहत असलेल्या भारतापुढे पाकिस्तान फारच किरकोळ आहे.
दोन्ही देशांतील ही झुंज पुढे वाढू नये. ते दोन्ही देशांनाही परवडणारे नाही ही सार्याच जनतेची इच्छा आहे. पण पाकिस्तानमध्ये खुमखुमी असेलच तर भारत गप्प बसणार नाही, हे सुद्धा तितकेच सत्य आहे.भारताच्या तडाख्यांसमोर पाकिस्तानचा नायनाट होऊ शकतो याचा धडा पाकिस्ताने इतिहासातून घ्यायला हवाआणि सुधरायला हवे नाहीतर ते त्यांच्या आस्तित्वासाठी सुद्धा चांगले नाही.
संत्या -: अरे आज लवकर माझ्या आदी आलासा की मण्या -: कामं आटपली म्हणल लवकर जावं....
अधिक वाचा