By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2019 03:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
संत्या : हाताला १३४ वरसं झाली बगा.
गण्या : हाताला नाय रं कॉंग्रेसला म्हन.
संत्या : हात कुणाचा?
गण्या : ती कॉंग्रेसची निशाणी हाय एवढ्या वर्षात अशा किती निशान्या झाल्यात त्या पक्षाच्या.
मन्या : खटारा, गाय-वासरू अशा निशान्या पण व्हत्या कॉंग्रेसच्या.
गण्या : त्याची आताच का आठवण झाली तुला?
संत्या : आरं २८ डिसेंबरलाच कॉंग्रेसची स्थापना झाली.
मन्या : १८८५ मध्ये हा इतिहास सर्वांनाच माहिती हाय.
संत्या : देशातला सर्वात जुना पक्ष.
गण्या : बरं मग त्याचं काय आता?
संत्या : सोतंत्र्याच्या लढ्यात या पक्षाचं मोठं योगदान.
मन्या : देश उभारणीतील या पक्षाच्या नेत्यांनी चांगली कामगिरी केली.
गण्या : तरी पण तुला आताच का हे आठवला.
संत्या : २८ तारखेलाच कोंग्रेसनं देशभर निदर्शन केली.
गण्या : पुन्हा कॉंग्रेसचा जुना कल आठवला.
मन्या : केंद्र सरकारनं केलेल्या सीएए कड्याला इरोद करण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं.
संत्या : हे हायच, पण कॉंग्रेस नेत्याचा इशाव्स वाढलेला दिसला.
गण्या : त्यो कसं काय?
संत्या : गेली ५-६ वरसं या पक्षात मरगळ आलेली दिसत व्हती.
मन्या : कॉँग्रेसच्या आवाजच बसला व्हता.
गण्या : कॉंग्रेस हाय का नाय समजत नव्हतं.
मन्या : तवा कमळाचा जोर व्हता.
संत्या : कमळाचा जोर कमी व्हताच हाताचं बळ वाढलं असच का.
गण्या : घड्याळ हातावर आलं आन धनुष्य-बाणानं निशाणा साधला.
मन्या : त्याचा परिणाम झारखंडातही झाला.
संत्या : तसं पायलं तर कॉंग्रेसची धुरा सोनियाजींनी पुन्हा सांभाळली आन चित्रा पालटलं.
मन्या : शिवाय त्यांनी निर्णय घेताना भूमिकाही बदलली.
गण्या : कमळ वाळ्याचं काय झालं? पुन्यादा सत्ता मिलाली आन ते अधिक शेफरले.
मन्या : बहुमत आपल्या बाजुनं असल्याने आपल्या मर्जी फरमान कडे लादण्याचा सपाटा लावला.
संत्या : आपण म्हणू तेच व्हणार, असा त्याचा समज झाला.
मन्या : त्यातूनच त्यांनी एनआरसी, सीएए रेटून केले. पण झालं उलटचं.
गण्या : देशभर जाळपोळ करीत आंदोलन झाली. देशात असंतोष भडकला.
मन्या : तत्पूर्वी महाराष्ट्रात सत्तेचा हाता-तोंडाशी आलेला घास गेला.
गण्या : त्यातून देशातील राज्यात येगळाच संदेश गेला. कमळही कोमेजू शकतं.
मन्या : महाराष्ट्रातील सत्ताबदलाचे पडसाद झारखंडमध्ये उमटले.
संत्या : मुख्य म्हंजे कॉंग्रेसला उभारी आली.
मन्या : इरोधक संपवण्याच्या घोषणा हवेत विरल्या.
संत्या : सरकारला दोन पावलं मागं घ्यावी लागली.
गण्या : ती मागं घेताना पंतपरधान बी थोडे निराश झालेले दिसले.
मन्या : समदे दिवस सारखे नसतात.
संत्या : दिवस हाय तर रातबी येतेच की.
गण्या : म्हणून म्हणूनच कुणीबी जास्त घमेंड करू नये.
संत्या : ते काय बी आसूदे, पण कमळ कोमजलं आणू हात सरसावला, हे बेस झालं.
मन्या : आपण म्हणू तेच व्हणार, आसं कुणीबी म्हणू नये, हाबी धडा यातून मिलालाच की.
२०१९ हे वर्ष अनेक घटनाक्रमांनी कायमच लक्षात राहील. याच वर्षां....
अधिक वाचा