ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बेस्ट जगली पाहिजे पण ....

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 26, 2019 03:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बेस्ट जगली पाहिजे पण ....

शहर : मुंबई

आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप अखेर कोर्टाच्या मध्यस्थीने 9 दिवसांनी मिटला.कोर्टाने राज्यसरकारला व कृती समितीच्या वाटाघाटीसाठी तीन महिन्याची मुदत दिली आणि संप मागे घेण्याची आज्ञा दिली त्याप्रमाणे संप संपला तरी पुढील वाटचाल मात्र खडतर आहे .बेस्ट सध्या तोट्यात आहे .दोन हजार कोटीचे कर्ज आहे .महिन्याला उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे.अश्या परिस्थितीत बेस्ट चालविणे महाकठीण आहे.पण बेस्ट कामगारांना कामाचा पगार देणेही आवश्यक आहे.वेतनवाढ, आणि इतर मागण्या मागण्याचा त्यांना अधिकारही आहे पण बेस्ट जगण्यासाठी व बेस्टच्या उत्पन्न वाढीसाठी काही सुधारणा करण्याचीही गरज आहे.ती सुधारणा न करता खाजगीकरणाचा बाऊ करणे योग्य नाही बेस्ट कृती समितीने यापूर्वीच कोर्टात धाव घेतली असती तर जनतेला त्रास झाला नसता परंतु आणि काही दिवस गेले असते तर लोक बेस्टला विसरले असते हे नक्की.
बेस्टमध्ये 80 टक्के मराठी माणूस आहे हे खरे असले तरी पैशाचे सोंग घेता येत नाही त्यासाठी दुसर्‍या मराठी संघटनेवर टीका करून आपली राजकीय पोळी भाजणे योग्य नाही.यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येऊन बेस्ट फायद्यात कशी येईल याचा विचार केला पाहिजे तरच बेस्ट जगेल.सुज्ञास सांगणे न लगे.

अरुण पां. खटावकर
लालबाग 400 012

मागे

कवी केशवसुत पुलाखालील बजबजपुरी !
कवी केशवसुत पुलाखालील बजबजपुरी !

दादरच्या पश्चिमेस फुलबाजारजवळ असलेल्या कवी केशवसुत पुलाखाली बजबजपुरी माज....

अधिक वाचा

पुढे  

...आणि अंगात वीज सळसळली !
...आणि अंगात वीज सळसळली !

2011 चे ते वर्ष ! काहीजण शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर माझ्यासारख्या कडवट शिवसै....

Read more