ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतीय राजकारणातील भीष्माचार्य-शरद पवार

By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 12, 2019 12:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतीय राजकारणातील भीष्माचार्य-शरद पवार

शहर : मुंबई

           भारतीय राजकारणातील भीष्माचार्य म्हणून ज्यांचा उल्लेख केले जातो ते राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८० वाढदिवस. यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे स्वाभिमान सप्ताह पाळण्यात येत आहे. शरद पवार यांना सर्व थरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन कार्यात आले आहे. भारतीय राजकरणात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणार्‍या शरद पवार यांचा केंद्र सरकारने २०१७ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केला. ते जेव्हा महाराष्ट्राच्या राजकरणात सक्रिय झाले तेव्हा महराष्ट्राचे भाग्यविधाते म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण आधी दिग्गज नेत्यांचा प्रभाव होता. शरद पवारांना यशवंतराव चव्हाण यांनी राजकरणात सक्रिय केले. यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांचे राजकीय गुरु होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणारे पवार वयाच्या २४ वर्षी महाराष्ट्र राज्य युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्याच्याकडे यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून पहिले जाऊ लागले. १९६६ मध्ये त्यांना युनेस्कोची शिष्यवृती मिळाली. त्याअंतर्गत त्यांनी पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देवून तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करण्याचा पद्धतीचा जवळून अभ्यास केला.

           १९६७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत शरद पवार प्रथमच बारामती मतदारसंघातून विजयी झाले आणि वयाच्या २७ व्या वर्षीच त्यांचा वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. तेव्हापासून बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आजवर कुणालाच सर करता आलेला नाही. १९८५ पर्यंत शरद पवार तेथून सतत निवडणूक लढवून जिंकले. १९८४ ला त्यांनी बारामतीतून लोकसभा निवडणूक जिंकली होती. पण राज्याच्या राजकरणात राहण्याचे ठरवून त्यांनी १९८५ ची विधानसभा निवडणूक बारामतीतून लढवून जिंकली. खासदारकीचा राजीनामा दिला. १९७८ ला कॉंग्रेसमधून अवघ्या १२ आमदारांसह इंदिरा कॉंग्रेस पक्ष सोडून त्यांनी कॉंग्रेस (स) आणि जनता पक्ष यांची पुरोगामी लोकशाही दल नावाने आघाडी केली. त्याच वेळी ते प्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा ते ३८ वर्षाचे होते. १९८० मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केंद्रात पुन्हा सत्तेत येताच विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात महाराष्ट्राचाही समावेश होता. सलग ९ वर्षे  कॉंग्रेस सोडून  आपल्या कॉंग्रेस (स) पक्षाच्या माध्यमातून प्रमुख विरोधी पक्ष नेते म्हणून ते सक्रिय होते. १९८७ मध्ये राजीव गांधीच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे त्यांनी पुन्हा कॉंग्रेस (इंदिरा) पक्षात प्रवेश केला. १९८८ मध्ये शरद पवार पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. २६ जून १९९१ रोजी पी.व्ही.नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये शरद पवार यांच्याकडे संरक्षण मंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली. मात्र दोनच वर्षानी शरद पवार यांना केंद्रातून महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर नेमणूक करून पाठविण्यात आले. महाराष्ट्राचे चौथ्यांदा ते मुख्यमंत्री झाले. १९९५ ला महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. १९९६ ला शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत बारामतीतून विजय मिळविला आणि ते खासदार झाले.

           १९९९ ला सोनिया गांधींच्या इटलीला जन्माचा मुद्दा उपस्थित केल्याने कॉंग्रेस ने  शरद पवारांची पक्षातून हकालपट्टी केली. तेव्हा त्यांनी पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांच्या सोबत १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी-कॉंग्रेसची स्थापना केली. तेव्हापासून गेल्या दोन दशकात राष्ट्रवादी कॉंग्रेस केंद्रात आणि राज्यातही सत्तास्थानी राहिली. मात्र २०१४ नंतर परिस्थिति बदलली. केंद्रात भाजप युतीचे सरकार आले  आणि राज्यातही सेना-भाजपने सत्ता हस्तगत केली. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ७९ वर्षांच्या शरद पवारांनी चमत्कार घडविला आणि भाजप ला सत्तेपासून दूर ठेवले. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी-कॉंग्रेसची महाराष्ट्र विकास आघाडी त्यांनी महाराष्ट्रात सत्तास्थानी आणली.

          अशाप्रकारे जवळपास ५०-५५ वर्षे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकरणात शरद पवारांनी स्वात:चा ठसा उमटविला आहे. कोणत्याही कठीण प्रसंगात विरोधकही त्यांचे मार्गदर्शन घेतात. पवार सत्तेत असोत किवा नसोत त्यांच्या मतांची, विचारांची दखल घ्यावीच लागते. राजकारणा बरोबरच साहित्यिक, उद्योजक, खेळाडू आधींशी त्यांचे तितकेच घनिष्ट संबंध आहेत. साहित्यिकांचा कार्यक्रम असो की, उद्योजकांची परिषद असो, शेतकर्‍यांच्या मेळावा असो की, माथाडी कामगारांचे संमेलन असो सर्व ठिकाणी त्यांचा वावर असतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.

          त्याचप्रमाणे जगमोहन दालमिया यांच्या नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भूषविणारे शरद पवार हे दुसरे भारतीय ठरले. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी राष्ट्रीय आपत्ती नियोजन मंडळाची धुराही मोठ्या विश्र्वासाने शरद पवारांकडे सोपविली होती.

         असे हे बहूआयामी व्यक्तिमत्व असलेले शरद पवार ८० वर्षाचे झाले. यशवंतराव चव्हाण, प्रा.मधू दंडवते यांच्यानंतर शरद पवार हे एक महाराष्ट्राचे असे नेते आहेत की, पंतप्रधानपद भूषविण्याची क्षमता असूनही हे तिन्ही नेते पंतप्रधान झाले नाहीत, याची खंत आजही महाराष्ट्राला वाटत आहे.                                 

मागे

 जबरदस्तीच्या आघाडीच फलीत
जबरदस्तीच्या आघाडीच फलीत

असंगाशी संग केल्यावर किवा विळ्या-भोपळ्याची मोट बांधल्यावर जे होतं तेच चित्....

अधिक वाचा

पुढे  

नाराजांना थोपविण्याचे आव्हान
नाराजांना थोपविण्याचे आव्हान

            सत्तेत असताना नाराजांकडे दुर्लक्ष केले तर चालते पण सत्ता ग....

Read more