ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अग्रलेख - चला मताधिकार बजावू या !

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 20, 2019 08:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अग्रलेख - चला मताधिकार बजावू या !

शहर : मुंबई

लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूका. लोकशाहीत मताधिकार जेवढ्या अधिक संख्येने बाजवतील तेव्हाच खर्या अर्थाने लोकशाही मजबूत झालेली दिसेल. मताधिकार बाजवणार्याला आपण मतदान करणे असे म्हणतो. अर्थात दान करणे आणि अधिकार बजावणे यात फरक आहे. दान कोणीही कोणाला करतो मतांचे मात्र तसे नाही. १८ वर्षे पूर्ण झाल्या नंतर मत देण्याचा अधिकार घटनेने मतदाराला दिलेला आहे. १८ वर्षाच्या आतील कोणाला ही मत देण्याचा अधिकार नाही. आपण योग्य उमेदवारला निवडून देण्या साथी मताधिकार बजवायचा असतो. कारण विधी मंडळात योग्य उमेदवार निवडून गेल्यास, तो उमेदवार लोकांच्या समस्यांना वाचा फोडू शकतो. त्याचबरोबर लोकांच्या आणि पर्यायाने राज्याच्या व देशाच्या हितच्या दृष्टीकोणातून सर्वांगीण विकासासाठी त्याने आपले बुद्धी कौशल्य पणाला लावावे ही अपेक्षा असते. लोकप्रतिनिधी म्हणून त्याने काम करावे अशी अपेक्षा मतदारची असते. प्रत्यक्ष विधी मंडळात लोकांच्या वतीने त्याने बाजू मांडणे अपेक्षित असते. या लोकप्रतिनिधी मधून जे सत्तास्थानी बसतात त्यांच्या कडूनही हीच अपेक्षा असते. म्हणूनच योग्य उमेदवार निवडून देणे ही मतदाराची जबाबदारी असते. दुर्दैयाने ही जाणीव अजूनही सर्व मतदारांना झालेली दिसत नाही. त्यामुळे ३५% ते ६५% मतदान होते. खरी तर ती जेव्हा ९०% पेक्षा ही अधिक होईल तेव्हा मतदारांन मध्ये जागृती झाल्याचे मानता येईल. आपण मतदानाचा अधिकार बजावतो म्हणजे त्या उमेदवारवर उपकार करीत नाही.तो आपला अधिकार आहे.म्हणूनच मत देण्याच्या मोबदल्यात आपण उमेदवार किवा राजकीय पक्ष यांच्याकडून काहीही मोबदला घेऊ नये.कोणी मत देण्यासाठी पैसे देत असेल तर तेही स्वीकारू नयेत.तसे केल्यास आपण आपले मत विकल्यासारखे होईल. आपले एक मत अमुल्य आहे.त्या एका मताने राज्याचे व देशाचे भवितव्य घडणार असते.योगी उमेदवारच लोकप्रतिनिधी झाल्यास तो जनतेच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील.पण केत्येकजण मताधिकार बजावित नाहीत. त्यामुळे राजकीय सौदेबाजी करणार्यांचे फावते.संख्याबळावर मग आपल्याला नको असलेले लोकप्रतिंनिधी निवडून आल्यावर सत्तास्थानी बसतात.त्यातही दुर्दैवाची गोष्ट अशी की मतदारानी नाकारलेले राजकीयपक्ष आपल्या निवडून आलेल्या उमेदवारासह प्रबळ पक्षात विलीन होतात.आणि सत्तास्थाने मिळवितात. उदाहरण द्यायचे झाले तर गोव्यात हाच प्रकार घडला. साहजिकच मतदारानी नाकारलेला पक्ष सत्तास्थानी आला.त्यातून मतदारचा विश्वासघात झाल्याचेच स्पष्ट झाले.अशा प्रकारामुळेही मतदार नाराज होतात.पक्षांतर करणारे मतदारांचा विचारच करीत नाहीत.या प्रकारातून प्रस्थापित राजघराणीतयार झालेली दिसतात.म्हणूनच उमेदवारणी योग्य उमेदवाराची निवड करून मताधिकार बाजवण्याची गरज आहे.जो उमेदवार अभ्यासू आहे.सुविध्य आहे.ज्याला जनतेची मनापासून सेवा करायची आहे,अशा उमेदवारला मग तो अपक्ष  म्हणून जरी निवडणूक लढवित असला तरी त्याला निवडून देण्याची मतदारांची जबाबदारी आहे.पक्ष कोणताही असो किवा उमेदवार अपक्ष असो,त्याची योग्यता पाहूनच योग्य  उमेदवाराला मतदान करायचे आहे.जर मतदानाची टक्केवारी घसरली तर नको असलेला उमेदवार अल्प मतांनी विजयी होतो.त्यामुळे योग्य उमेदवार पराभूत झाला की समाजात तरुण पिढीत  नकारात्मक संकेत जातात त्यातूनच मग एकुण राजकारण हा आपला प्रांत नाही असा अनेकांचा समज होतो.आणि सुविध्य तरुणही राजकारणाकडे पाठ फिरवतात.म्हणून मतदारांनी विचारपूर्वक मताधिकार मोठ्या संख्येने बजाविण्याची गरज आहे.चला तर मग मताधिकार बजावायला सिद्ध व्हा!

 

मागे

विठ्ठलाच मत.....
विठ्ठलाच मत.....

आज भल्या पहाटेच पंढरपूरला जाग आली,तशी जाग पंढरपूरला रोजचं येते म्हणा पण आजच....

अधिक वाचा

पुढे  

वडाच्या पारावार  - मत कुणाला द्यायचं ?
वडाच्या पारावार - मत कुणाला द्यायचं ?

गण्या-: मण्या,हे कागद कसले रे? संत्या-: काल वरच्या वाडीत तू असेच कागद वाटी....

Read more