ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बायको मला बोलली ,”ऐका, जर मी तुम्हाला दुसऱ्या स्त्रीसोबत डिनर आणि ?….

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: मे 25, 2019 05:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बायको मला बोलली ,”ऐका, जर मी तुम्हाला दुसऱ्या स्त्रीसोबत डिनर आणि ?….

शहर : मुंबई

एक दिवस अचानक माझी बायको मला बोलली – ” ऐका, जर मी तुम्हाला दुसऱ्या स्त्रीसोबत डिनर आणि चित्रपट बघायला जायला सांगितले तर, तुम्ही काय बोलणार ? “
मी म्हंटले – ” मी म्हणेल की, आता तू माझ्यावर प्रेम नाही करत
ती बोलली – ” मी तुझ्यावर प्रेम करतेच पण, एक आणखी स्त्री आहे जी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझ्यासोबत थोडा वेळ घालवणं तिला स्वप्नासारखं वाटेल.

ती स्त्री दुसरी कुणी नसून माझी आई होती. जी माझ्यापासून वेगळी एकटी राहत होती. मी  व्यस्त असल्याने मी तिला कधी कधीच भेटायला जाऊ शकलो  नव्हतो . मी आईला फोन करून रात्री माझ्यासोबत जेवायला आणि चित्रपट बघायला येण्यास सांगितले. तू ठीक तर आहेस ना ? तुमच्या दोघांत काही वाद झाला नाही ना ? – आईने विचारले. तिच्यासाठी माझा अस फोन करणं तिला माझ्यावर काही संकट असल्याचे संकेत वाटले .

नाही, काहीच त्रास वैगेरे नाही. बस मी विचार केला की, तुझ्यासोबत बाहेर जाणे एक सुखद अनुभव राहील.मी उत्तर दिले आणि म्हटले की, आपण दोघेच जाऊया. तिने ह्यावर क्षणभर विचार केला आणि म्हणाली ठिके येते. शुक्रवारी संध्याकाळी जेव्हा मी तिला घ्यायला तिच्या घरी गेलो तेव्हा ती दारात वाट बघत बसली होती. तिने पोशाख घातला होता आणि तिचा चेहरा एका वेगळ्याच आनंदाने चमकत होता. कार मध्ये आई बोलली, ” मी माझ्या मैत्रिणींना सांगितले की, आज मी माझ्या मुलासोबत बाहेर जेवायला जात आहे.ती फार प्रभावित झाली होती.

आम्ही दोघे आईच्या आवडीच्या एका रेस्टोरंट मध्ये आलो. जे फार सुरुचीपूर्ण तर नाही पण चांगले आणि आरामदायी होते. आम्ही बसलो आणि मी मेनू बघायला लागलो. मेनू बघता बघता मी आईकडे बघितलं तेव्हा ती माझ्याकडेच बघत होती आणि ओठांवर एक उदासी हास्य होत.
तू जेव्हा लहान होता तेव्हा हा मेनू मी तुझ्यासाठी वाचायची.आई बोलली.
आई ह्यावेळी मला हे तुझ्यासाठी वाचायचे आहे.मी उत्तरलो.

जेवण करताना आम्ही एकमेकांच्या जीवनात नुकत्याच घडलेल्या घटनांबद्दल चर्चा करायला लागलो. आम्ही आपसात इतक्या गोष्टी केल्या की, वेळ कधी निघून गेला हे ही कळले नाही. नंतर घरी परत येतांना आई बोलली की, पुढच्या वेळी मी तिला जेवणाचे बिल भरू दिले तर, तिला पुन्हा माझ्यासोबत बाहेर जेवायला यायला आवडेल. मी म्हणालो, आई तू म्हणशील तेव्हा जाऊ आणि बिल कुणी भरले तरी काय फरक पडतो. आई बोलली, फरक पडतो आणि पुढच्या वेळी तीच बिल भरणार.

घरी पोहचल्यावर बायकोने विचारले, कसे वाटले ?
खूप मस्त, जसा विचार केला होता त्यापेक्षा कितीतरी अधिक भारी वाटले.
ह्या घटनेनंतर काही दिवसांनी हृदयविकाराच्या झटक्याने आईचा मृत्यू झाला. हे इतके अचानक झाले की, मी तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही. आईच्या मृत्यूनंतर मला एक पाकीट मिळालं. ज्यात त्याच हॉटेलच्या ऍडव्हान्स बिल सोबत आईच पत्र होत. पत्रात आईने लिहिले होते की, बेटा मी तुझ्यासोबत पुन्हा बाहेर जेवायला येऊ शकेल की नाही हे माहीत नाही. म्हणून मी दोन लोकांच्या जेवणाचे ऍडव्हान्स पेमेंट करून दिले आहे. जर मी नाही येऊ शकली तर, तू आणि बायको दोघे नक्की जा.

त्या रात्री तू म्हणाला होतास ना, की काय फरक पडतो. माझ्यासारख्या एकट्या राहणाऱ्या वृद्ध स्त्रीला फरक पडतो. तुला माहीत नसेल की, त्या रात्री तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा आयुष्यातील सुंदर क्षणांपैकी एक होता. देव तुला कायम सुखी ठेवो. तुझीच आई.त्याक्षणी मला आपल्यांना वेळ देण्याचे आणि प्रेम अनुभवण्याचे महत्व कळले.

आयुष्यात कुठलीच गोष्ट ही आपल्या कुटुंबापेक्षा महत्वाची नाही. मित्रानो खरंच धावपळीच्या आयुष्यात आणि स्पर्धेच्या जगात आपण आपल्यावर जीवापाड जपणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या आईला विसरत चाललो आहे  हि वास्तविकता आहे .त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आई वडिलांसोबत दिवसातील काही मिनिटे सवांद साधावा .कारण काय सांगता येते कि तुमचे ते काही मिनिटे तुमच्या त्यांना सुखद अनुभव देतील .. कथा आवडली  असेल तर नक्की शेअर करा कारण तुमचा एक शेअर दुसऱ्यांना एक चांगला संदेश देऊन जाईल ..

 

मागे

जाणून घ्या तुळशीची पूजा करण्याचे काही नियम
जाणून घ्या तुळशीची पूजा करण्याचे काही नियम

तुळशीचे रोपटे तर सगळ्याच धर्माचे लोक ठेवतात पण हिंदू धर्मात तुळशीला देवी म....

अधिक वाचा

पुढे  

स्री सत्व.....
स्री सत्व.....

स्री सत्व..... जेव्हा एखाद्या पुरुषाची बायको मरते... तेव्हा त्याला विधवा म्हण....

Read more