By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 09, 2019 04:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वकांक्षी चंद्रयान 2 ची मोहीम अंतिम क्षणी फसली किंवा अपयशी ठरली असे म्हणता येणार नाही. इस्रोचे शास्त्रज्ञ अजूनही चंद्रयान 2 शी संपर्क साधण्याचा प्रयत्न करताहेत. कित्येक दिवस रात्र मेहनत घेऊन चंद्रयान 2 मोठ्या उमेदीने अंतराळात पाठवण्यात आले. 22 जुलै रोजी चंद्रयान 2 अवकाशात झेपावले तेव्हापासून शास्त्रज्ञ यानाच्या प्रत्येक प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून होते. यानाने चंद्राच्या अखेरच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वी चंद्राची दोन वेळा छायाचित्रे पाठवली होती. 7 सप्टेंबरला पहाटे होणाऱ्या विक्रमच्या वाटचालीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी नियंत्रण कक्षात हा क्षण अनुभवण्यासाठी हजर होते. परंतु चंद्राच्या पृष्ठभागापासून दोन किलोमीटर अंतरावर असताना 'विक्रम'चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. तेव्हा इस्रोचे अध्यक्ष डॉ. के.सीवन यांच्यासह तेथील सर्व शास्त्रज्ञ तंत्रज्ञ निराश झाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल कौतुक करून शास्त्रज्ञांना धीर दिला. शास्त्रज्ञ 'विक्रम' चा संपर्क तुटल्याने भावुक होणे, निराश होणे स्वभाविक होते. कारण कित्येक महिन्याच्या परिश्रमानंतर अशाप्रकारे अखेरच्या क्षणी यशाने हुलकावणी देणे हा अनपेक्षित धक्काच असतो.
या मोहिमेकडे नासासह अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. मुख्य म्हणजे या यानाच्या प्रक्षेपणासाठी रशियानेही आपल्या प्रक्षेपण स्थानकाचा वापर करण्यास नकार दिला होता. असे कळते. तरीही खचून न जाता शास्त्रज्ञांनी आपल्याच प्रक्षेपण स्थळात यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले. खरे तर 15 जुलै रोजी प्रक्षेपण करण्यात येणार होते पण काही तांत्रिक कारणामुळे ते 22 जुलैला करण्यात आले. 48 दिवसांचा प्रवास करून चंद्रयान 2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचले पण संपर्क तुटल्यामुळे विक्रम लँडरला त्या शेवटच्या क्षणी चंद्रभूमीवरती उतरवणे शक्य झाले नाही. शास्त्रज्ञांनी चंद्रयान 2 ची मोहीम हाती घेतली होती ती किती अवघड आणि जोखमीची होती हे जाणून घेतले तर त्याचे महत्त्व लक्षात येईल. पृथ्वीपासून चंद्र 3844 लाख किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पृथ्वीवरून कोणताही संदेश चंद्रावर पोहोचण्यास काही मिनिटे वेळ लागणारच तसेच सोलार रेडिएशनचाही चंद्रयान 2 वर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सिग्नल कमकुवत होण्याची शक्यता असते. आता विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत. संपर्क साधण्यात कोणता व का अडथळा आला? याचा शोध शास्त्रज्ञ घेतीलच. काही त्रुटी असतील तर भविष्यात त्या राहू नयेत यावर अधिक भर देता येईल. अर्थात जगातील कोणत्याही देशाने चंद्राचे दक्षिण ध्रुवावर यान पाठवण्याचा विचार केला नव्हता. भारतीय शास्त्रज्ञांनी ते धाडस केले.
2008 मध्ये इस्रोने चंद्रयान 1 प्रक्षेपित केले होते. मात्र ते यान प्रत्यक्षात चंद्रावर उतरले नव्हते. आता चंद्रयान 2 हे प्रत्यक्षात जी छायाचित्र पाठविल त्यावर संशोधन करून त्याचा उपयोग मानवी भवितव्यासाठी उपयुक्त ठरणार होते. म्हणून या मोहिमेला विशेष महत्त्व होते. विज्ञानात असे धोके पत्करावे लागतात ते धोके पत्करले गेले नसते तर थक्क करणारे प्रयोग घडलेच नसते. विक्रम लँडरशी संपर्क होईल ही अपेक्षा आहे पण त्यात अपयश जरी आले तरीही आपले शास्त्रज्ञ यशस्वी ठरले आहेत. कारण आता यातून पुढच्या मोहिमांचे आयोजन करण्यास प्रेरणा मिळणार आहे
ज्येष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी यांचे रविवारी सकाळी वयाच्या 95 व्या वर्....
अधिक वाचा