By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 17, 2019 08:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोणत्याही योजनेत लोकांचा सहभाग असेल तर ती नक्कीच यशस्वी होते. त्याचबरोबर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने केलेल्या आंदोलनातील लोकांचा सहभाग किती, त्यावर त्या आंदोलनाचे यश अपयश अवलंबून असते. याबाबतीत अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. स्वतंत्रपूर्व काळात महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या लढ्यात तमाम भारतीयांना सहभागी करून घेतले. त्यामुळेच भारत स्वतंत्र झाला, हा इतिहास आहे. लोक सहभागच महत्व विद्यमान पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी जाणले. म्हणूनच त्यांनी आपल्या अनेक महत्वाकांशी योजनांमध्ये लोकांना सहभागी करून घेतले. त्याचा परिणाम आता जाणवू लागला आहे. यापूर्वी सताधार्यांनीही अनेक चांगल्या योजना राबविल्या. पण काही मोजक्या योजना सोडल्यास सार्वजनिक हिताच्या योजनांमध्येही लोकांचा अपेक्षित सहभाग दिसला नाही. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे राजकारण्याचे जनतेला गृहीत धरण्याचे धोरण महाराष्ट्रात याबाबतीत उदाहरण द्यायचे झाले, तर राज्याचे तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर. आर. उर्फ आबा पाटील यांनी 'संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान' आणि महात्मा गांधी तंटामुक्ती योजना' ग्रामीण पातळीवर सुरू केल्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. गावातील वादविवाद गावात मिटविले जात आहेत. या दोन्ही योजनाचे चांगले परिणाम दिसत आहेत.
पंतप्रधान नरेद्र मोदी लोकप्रिय होण्यात आणि मोदी लाट निर्माण होण्यात मोदींच्या धोरणांचाच मोठा वाटा आहे. त्यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या टप्प्यात 'स्वच्छ भारत अभियान' सुरू करून त्यात लोकांना सहभागी करून घेतले. बँकेत कोट्यवधी भारतीयांना झीरो बॅलेन्सवर खाते उघडण्याची संधी उपलब्ध करून दिली. 'मेक इन इंडिया' ,' मेड इन इंडिया' सारख्या योजनांना गती दिली. ज्यांची स्थिती उत्तम आहे. त्यांना अनुदानित गॅस सिलिंडर न घेण्याचे आवाहन केले. म्हणजेच आपल्या योजनात त्यांनी लोकांना सहभागी करून घेतले. आता त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाची दुसर्या टप्प्यात प्रारंभीच नवे प्रयोग जाहीर करताना लोकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
2022 पर्यंत 15 पर्यटन स्थळांना भेट देण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे. ते करताना त्यांनी दुर्गम भागातील पर्यटन स्थळे निवडण्याची सूचना केली आहे. तसे झाले तर देश विदेशातील पर्यटकांचे तिकडे लक्ष जाईल. दुसर्या प्रयोगात छोटे व्यापारी आणि दुकानदारांना त्यांनी डिजिटल पेमेंटचा आग्रह ग्राहकांना करण्याची सूचना केली. त्यातून डिजिटल व्यवहाराची व्याप्ती वाढेल. तिसर्या प्रयोगात 2 ऑक्टोबरला गांधी जयंती पासून प्लॅस्टिक बंदी करण्याचे आवाहन करतानाच कापडी पिशव्या भेट देण्याचे सुचविले आहे. आपल्या चौथ्या प्रयोगात शेतकर्यांना 25 ते 30 टक्केच म्हणजेच कमीत कमी रासायनिक खताचा वापर करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे जमिनीचा पोत जपता येईल. पाचवा आणि महत्वाचा प्रयोग म्हणजे देशातच तयार होणारी वस्तूंचा वापर करण्याची त्यांनी केलेली सूचना म्हणजेच एकार्थी स्वदेशीच आग्रह त्यांनी धरलेला दिसतो. स्वतंत्र पूर्व काळात परदेशी मालावर बहिष्कार घालण्याचे आंदोलनही प्रभावी ठरले होत. आता स्वदेशीचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्यास त्याचा परिणाम भारतीय उदद्योगांच्या भरभराटीत होईल आणि आयात वस्तूंच्या संख्येत घट होईल. भारतीय कारागिरानाही सुगीचे दिवस येतील, ही अपेक्षा . अर्थात हे सर्व जनतेच्या सहभागावर अवलंबून आहे. मात्र मोदींचा सध्याचा प्रभाव पाहता, त्यांच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत. यातून विरोधकांनाही खूप काही बोध घेता येण्यासारखा आहे.
ज्यांनी ज्यांनी पूरग्रस्तांना मदत करताना सेल्फी काढली व ती एफबी, व्हाट्स....
अधिक वाचा