ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ईव्हीएम मधील “नोटा” चा पर्याय ही बिन कामाचा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 20, 2019 08:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ईव्हीएम मधील “नोटा” चा पर्याय ही बिन कामाचा

शहर : मुंबई

निवडणुकीच्या तोंडावर आता सर्वाधिक चर्चा आहे तीनोटा चीनोटा चे दोन प्रकार आहेत.एक चलनातीलनोटाआणि दूसरा नकाराधिकारसाठी ईव्हीएम मध्ये पर्याय ठेवलेलानोटावापरण्याचा अधिकार.म्हणजेच मतदारांना आपल्या मतदारसंघात निवडणूक लढविणार्या उमेदवारापैकी एकही उमेदवार योग्य वाटत नसेल तर मतदारनोटा चे बटन दाबून सर्व उमेदवार अमान्य असल्याचे आपलेमत नोंदवू शकतात. उमेद्वाराविषयी नाराजी व्यक्त करण्यासाठी आणि लोकशाहीच्या बाळकटीकरणासाठी वरकरणी हा पर्याय चांगला वाटतो.मात्र निवडणुकीनंतर मतमोजणीतनोटाची मत मोजली जातात. तथापिनोटामतांची संख्या सर्वाधिक झाली तर त्या मतदारसंघात नव्याने उमेदवार बदलून निवडणूक घेण्याची तरतूद असणे गरजेचे होते.पण तशी तरतूद नाही.मात्रनोटामतांची संख्या अधिक झाली तर दुसर्या क्रमांकाची मत मिळवणारा उमेदवार विजयी घोषित करण्याची तरतूद आहे.त्यामुळे हानोटाचा पर्याय बिनकामाचा असल्याचे दिसून येते.

                  निवडणुकांमध्ये हजारो कोटी रुपये खर्च होतात प्रशासकीय यंत्रणाचाही प्रचंड वेळ यासाठीखर्च होतो असतो.मताधिकार बाजाऊन मतदार  आपला प्रतिंनिधी निवडतात. तथापि निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारापैकी एकही उमेदवार मतदारसंघाच्या हिताचा नाही असे वाटणार्या मतदारांसाठी नाकाराधिकारासाठीनोटाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.मात्र यानोटामतांची नोंद होत असली तरी त्यातून काहीच निष्पन्न होत नाही.राजकीय उमेदवारांनविषयी राजकीय पक्षांविषयी आणि एकुणच राजकरणविषयी अनेक मतदार नाराजी व्यक्त करण्यासाठी आतानोटा चे बटन दाबतात. त्याची नोंद होते,असे करून आपण आपला वेळ पैसा श्रम वाया घालवीत असतो.कारण यातून काहीच निष्पन्न होत नाही.”नोटाची संख्या अधिक असली तर पुन्हा निवडणूक घेण्याची तरतूद नाही.उलटनोटानंतर ज्या उमेदवारला दुसर्या क्रमांकाची मत मिळालेली असतील तो उमेदवार विजयी म्हणून घोषित केला जातो.असे असेल तरनोटाचा पर्याय वापरुन काय उपयोग.

                     अशाप्रकारे आपले मत वाया घालविण्यापेक्षा आपला अधिकार मतदानाचा  बजावताना  आपल मत वाया जाणार नाही याची मतदारांनी काळजी घेणे गरजेचे आहे.कारण मताधिकार बजाविण्यासाठी संधि ही पाच वर्षातून एकदाच मिळत असते.ती वाया घालवून चालणार नाही.सगळे उमेदवार जरी अयोग्य वाटत असले तरी त्यातल्या त्यात म्हणजेचदगडा पेक्षा वीट मऊया उक्ती प्रमाणे पर्याय निवडणेच हिताचे ठरेल किवा निवडणूकआयोगानेनोटा ची संख्या जास्त असेल तर पुन्हा निवडणूक हा निर्णय घेणे गरजेचे आहे आणि यामुळे सर्व पक्ष सुधा योग्य उमेदवार देण्यास बांधील राहतील.

मागे

वडाच्या पारावार  - मत कुणाला द्यायचं ?
वडाच्या पारावार - मत कुणाला द्यायचं ?

गण्या-: मण्या,हे कागद कसले रे? संत्या-: काल वरच्या वाडीत तू असेच कागद वाटी....

अधिक वाचा

पुढे  

नसलेल्या बंधाऱ्यांची  गोष्ट 
नसलेल्या बंधाऱ्यांची  गोष्ट 

काय लिहावं , हा सध्या पडलेला प्रश्न,जे लिहावं ते खर आणि बर लिहावं हे त्यावरचं ....

Read more