ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आयएनएक्स मीडिया : इतिहासाची पुनरावृती

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 22, 2019 12:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आयएनएक्स मीडिया : इतिहासाची पुनरावृती

शहर : मुंबई

मानवी जीवनाच्या रंगमंचावर कधी कधी इतिहासाची पुंनरावृती होताना दिसते. आपण त्याला योगायोग असेही म्हणतो. पात्र तीच असतात. फक्त त्यांच्या भूमिका आणि कथानक वेगळं असतं. हा नियतीचा खेळ आहे. आता माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम विरुद्ध अमित शहा यांच्याही बाबतीत अशाच योगायोगाची गजब कथा घडली आहे.  चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अटक केली. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल. आपली अटक टाळण्यासाठी चिदंबरम 72 तास बेपत्ता होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी प्रयत्न केले. पण त्यात अपयशी ठरले आणि सीबीआय अधिकार्‍यानी घरात घुसून अटक केली. विद्यमान केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्याही बाबतीत अशीच घटना 9 वर्षापूर्वी घडली होती. फक्त प्रकरण वेगळं होत. तेव्हा पी. चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री होते. आणि अमित शहा गुजरातचे गृहमंत्री होत.

2010 मध्ये केंद्रात कॉंग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. तेव्हा केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम होते. साहजिकच तपास यंत्रणा त्यांच्या नियंत्रणात होत्या. त्याचवेळी म्हणजे 2010 मध्ये गुजरातमधील अत्यत वादग्रस्त ठरलेल्या सोहराबूद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री आणि आताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने गांधीनगर येथून अटक केली होती. सोहराबूद्दीन प्रकरणात अमित शहावर सीबीआयने हत्येचा आरोप ठेवला होता.

त्यावेळी अमित शहा चौकशीसाठी समन्स बजावून सुद्धा उपस्थित राहिले नव्हते. अमित शहासह 15 जणांवर सीबीआयने त्याच वर्षी आरोपपत्र दाखल केले होते.  त्यावेळी अमित शहा यांच्या निवासस्थळी धाड टाकली होती. त्यावेळी अमित शहाना अटक झाल्याने त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ते गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. नरेंद्र मोदींनी त्यावेळी या प्रकरणात केंद्र सरकारवर कडाडून हल्ला केला होता. सीबीआयला हाताशी धरून केंद्र सरकार राजकीय हत्या करीत असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला होता. त्यांच्या विरोधात 30 हजार पानाचे आरोप पत्र दखल करण्यात आले होते. 2014 मध्ये या प्रकरणातून अमित शहा यांची निर्दोष मुक्तता झाली.

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन नाकारताच पी. चिदंबरम बेपत्ता झाले होते. कारण कोर्टाने जामीन फेटाळताच सीबीआय अधिकारी चिदंबरम यांना अटक करण्यासाठी त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या घरी पोहोचले.पण चिदंबरम सापडले नाहीत. दोन वेळा तेथे जाऊनही चिदंबरम सापडले नाहीत. दरम्यान चिदंबरम यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा आपल्या वकिलामार्फत ठोठावला. पण काही उपयोग झाला नाही. त्यांचे वकील सर न्यायाधीशांपर्यंतही गेले पण पी. चिदंबरम यांची अटक टाळण्यात त्यांना अपयश आले. शेवटी रात्री पी. चिदंबरम प्रसारमाध्यमांसमोर  आले. त्यांनी पत्रकार परिषदेत स्वत:वरील आणि मुलावरील सर्व आरोप फेटाळून लावले. नंतर ते थेट आपल्या घरी गेले.

 सीबीआयचे अधिकारी दिल्लीतील जोरबाग येथील चिदंबरम यांच्या घरी त्यांना अटक करण्यासाठी गेले. पण घरचा दरवाजा उघडला जात नव्हता. शेवटी सीबीआय अधिकारी गेटवरुन उड्या मारून त्यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांना ताब्यात घेतले. योगायोगाची आणखी एक गोष्ट म्हणजे 2011 मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री असलेल्या चिदंबरम यांच्याच हस्ते उद्घाटन झालेल्या सीबीआयच्या मुख्यालयाच्या इमारतीत क्रमक 5 च्या खोलीत तळमजल्यावर त्यांना रात्रभर ठेवण्यात आले होते. त्यांना आता न्यायालयात हजर करून सीबीआय, त्यांची 14 दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता आहे. तसेच चिदंबरम यांच्याकडूनही जामिनासाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो. याला म्हणतात नियतीचा खेळ. कधी कोणावर कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही, हेच खर.

 

मागे

लोकसहभागाचे महत्व
लोकसहभागाचे महत्व

कोणत्याही योजनेत लोकांचा सहभाग असेल तर ती नक्कीच यशस्वी होते. त्याचबरोबर स....

अधिक वाचा

पुढे  

ज्याच्या हाती सत्ता...
ज्याच्या हाती सत्ता...

आपल्याकडे एक प्रसिद्ध वाक्यप्रचार आहे, 'ज्याच्या हाती ससा तो पारधी' आता थ....

Read more