By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 11:08 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
संत्या -: आर गण्या चल लवकर पारावार
गण्या -: थांब की एवडी काय घाई हाय
संत्या -: घाई नाय र मण्या आलाय कधीच वाट बघतोय आपली
गण्या -: आस व्हय चल मग लवकर जाऊ
मण्या -: आर किती उशीर कवापासण वाट बघतोया
संत्या -: का र काय झाल
मण्या -: नेते मंडळी आल्यात मत मागायला पाच वर्ष दिसले नवते ना तुला
गण्या -: आर आता निवडणूक हाय येणारच त्यात काय
मण्या -: आर संत्या काल म्हणत व्हता पाच वर्ष झाली त्यांना बघून
संत्या -: बरोबर हाय आज नाही बघितलं तर परत पाच वर्ष वाट बघायला लागणार त्यांचं तोंड बघायला
गण्या -: आज काय सांगत व्हते नवीन
मण्या -: काय सांगणार म्हण समदा सात बारा कोरा करणार
संत्या -: म्हणजे मुंबई च्या गिरणीच्या जागा आपल्या घशयात घातल्या तश्या आपल्या जमिनी भी घालणार काय
गण्या -: बरोबर असाच सात बारा कोरा करणार नाव असणार आपल आणि बाकी समद कोर
मण्या -: आर पाच वर्ष एमेकाला शिव्या घालत होते ते आज दोघ संग आल्यात भीक मागत
संत्या -: आर यांना जरा सुधा लाज वाटत नसल का र
गण्या -: कसली लाज र
संत्या -: आपण ज्याला शिव्या घातल्या लोकांनी बघितलं टी.वी.वर आणि आज माता साठी परत गळ्यात गळा घालून लोकांसमोर जायचं
मण्या -: त्यांना कसली लाज खुर्ची साठी ते काय पण करतील
संत्या -: आता निवडणूक होऊ दे बघ परत नाटक चालू होतील
गण्या -: समदे चोर आहीत बघ
मण्या -: आर लोकं बी आशा चोरणांच मत देतयात
संत्या -: पाप लोक काय करणार समदे चोरच उभे असल्यावर कोणाला तरी द्यायचं म्हणून देत्यात
गण्या -: यात साधा सरळ बघायचा म्हणजे गवतात सुई हुड्कल्यासारखं हाय बघ
मण्या -: बरोबर हाय काल बघितलं मी सगळे गुण्ड्च हाइत
संत्या -: म्हणजे आता कुणाचं सरकार अस म्हणायच नाय
गण्या -: म्हणजे काय र
संत्या -: आर कुठल बी सरकार येओ नाव एकच
मण्या -: कच र
संत्या -: आर गुंडांच सरकार
गण्या -: बरोबर हाय बघ गुंडांच सरकार
मण्या -: एकदम खर बोललास बघ गुंडांच सरकार
अध्यात्मात वा परमार्थात निर्मोही उपासना सर्वश्रेष्ठ उपासना समजली जाते. नि....
अधिक वाचा