By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 06, 2020 03:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
देशाच्या राजधानीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील घुसून अज्ञात हल्लेखोरांनी विद्यार्थी व प्राध्यापकांना केलेल्या अमानुष मारहाणी संतप्त प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. देशभर या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. या हल्ल्याची चौकशी होईलही. तपासात मात्र तर हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचाही संशय अनेकांनी व्यक्त केला आहे. त्याला कारणेही तशीच आहे. विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे तरुण आहेत. उच्च शिक्षण ते घेत असतात. विद्यार्थांनी आंदोलन केले की त्याचे पडसाद देशभर उमटतात. एरवी त्यांचे ज्ञानार्जनाचे काम सुरू असते.
वास्तविक जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असते. विद्यार्थांनाही ओळखपतत्राशिवाय तेथे प्रवेश दिला जात नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिल्ली हे देशाचे राजधानीचे ठिकाण आहे. संसद भवनासह अनेक अत्यंत महत्वाची कार्यालये, येथे आहेत. जगभरातील प्रमुख नेतेही येथे येत असतात. यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था कडेकोट असते. काही वर्षापूर्वी संसद भवनावर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. साहजिकच त्यानंतर दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. अशा या दिल्लीत हे विद्यापीठ असून मुलींचे वसतीगृह आहे तेथे सुरक्षा रक्षकही कायम तैनात असतात. असे असताना अज्ञात हल्लेखोर विद्यापीठात घुसले तेव्हा सुरक्षा रक्षक कुठे होते? त्यांनी या हल्लेखोरांना अडविण्याचा प्रयत्न का केला नाही? हल्लेखोरांनी प्राध्यापकासह सुमारे ३४ विद्यार्थांना जबर मारहाण करेपर्यंत सुरक्षा रक्षक काय करीत होते? या हल्ल्याच्या संदर्भात पोलीस कंट्रोल रुमला सातत्याने फोन केले गेले. त्यांची दखल घेऊन पोलिसांनी तत्काळ हालचाल केली असती तर काही प्रमाणात घटना नियंत्रणात आली असती. काही हल्लेखोरांना पकडताही आले असते, पण पोलिसांनी आणि विद्यापीठाच्या प्रशासनाने उशिरा हालचाली सुरू केल्या, असा आरोप केला जात आहे.
एकंदरीत सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची यासंदर्भातील भूमिकाच संशयास्प्द असल्याचे म्हंटले जाते. विद्यापीठ प्रशासनानेही यावर तातडीने कारवाई केली नाही, असाही आरोप होत आहे. अत्यंत संवेदनशील असलेल्या शहरात सुरक्षा व्यवस्थेतील विद्यापीठात बुरखाधारी अज्ञात हल्लेखोर बिनधास्त घूसून राडा करून आरामात निघून जातात. याची खबर सुरक्षा रक्षकांनाही लागत नाही. यावरून विद्यापीठ प्रशासनालाच काही उत्तरे द्यावी लागणार आहेत. विशेष करून तेथील सुरक्षा यंत्रणा एवढी गाफिल कशी राहिली? हा मुद्दा या निमित्ताने पुढे येत आहे.
या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्यामकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हल्लेखोरांनी तोंडाला रूमाल व मास्क लावल्यामुळे त्यांची ओळख पटली नाही. मात्र या प्रकरणात काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर हल्लेखोरांच्या हल्यात जखमी झालेल्या ३४ जणांवर एम्स रुग्णालयात उपचार करण्यात आले. तथापि, दिल्लीत जर अशा घटना घडत असतील तर सुरक्षा यंत्रणाचे ते अपयश मानावे लागेल. त्याचबरोबर हा हल्ला कोणी व का केला, हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत हल्लेखोरांचा उद्देशही उघडकीस येणार नाही. हल्लेखोरांना कोणाचा पाठिंबा आहे का, हे देखील समजणार नाही.
राज्याच्या अनेक भागांत सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती असल्याने क....
अधिक वाचा