ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

स्री सत्व.....

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: मे 25, 2019 06:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

स्री सत्व.....

शहर : मुंबई

स्री सत्व.....

जेव्हा एखाद्या पुरुषाची बायको मरते... तेव्हा त्याला विधवा म्हणले जात नाही...
किंवा त्याची बायको नाही म्हणून कोणती स्री त्याला वाईट नजरेने पहात नाही...
नाही समाज त्याला कोणते बंधन घालत... आणि नाही त्याला कोणते रितीरिवाज पाळावे लागत....
त्याला बायको नसतानाही त्याच मानाने जगतो.... ज्या मानाने तो बायको असताने जगत होता....

पण स्री चं असं होत नाही..
तीचा नवरा मरतो तेव्हा तिला विधवा घोषित केले जाते...
तिचा मान तिच्याकडून हिरावून घेतला जातो....
तिचे मंगळसूत्र, तिची जोडवी, तिच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या.... हे सुवासनीचं लेणं तिच्याकडून काढून घेतले जाते.... पण मेलेल्या नवऱ्याचे नाव मात्र तिच्या नावामागे तसेच रहाते....
लग्नाच्या सात फेऱ्यात हे अलंकार तिच्यावर चढवले जातात.... आणि नवरा तिच्या आधी मेला कि ते उतरवले जातात....
मंगळसूत्र गळ्यात पडले कि बापाचे नाव हटवले जाते.... आणि नवऱ्याचे नाव लावले जाते मग नवरा मेल्यावर त्याचे नाव का हाटवले जात नाही.... असा प्रश्न पडतो...
काही स्रींया हे अलंकार उतरवत नाहीत.... तेव्हा समाज त्यांच्या विषयी चर्चा करायला सुरवात करतो.... तिच्या मागे तिच्या विषयी अनेक शब्दांचा फुपाटा उडायला लागतो...
नवरा मेला कि तिला हळदीकुंकाचा मान नसतो..... सुवासिन म्हणून तिची निवड वगळली जाते.. तिला तो मान दिला जात नाही...तिची निवड केली जाते ही वेधना तिला कमी दुखवत असेल का..?
सुवासिन म्हणून मानानं जगणं.... आणि विधवा म्हणून रंगीबेरंगी आयुष्य पाढरेफट्ट पडणे.... हे तिच्या मनाला कोठेतरी कुरतडत असेलच....
अशी एखादी स्री श्रीमंत आणि यशाच्या शिखरावर पोहचली असेल तर.... तिच्याकडे बघण्याचा द्रुष्टिकोण वेगळा पण सामान्य मजुरी करून खाणारी अशीच स्री असेल तर तिच्याकडे बघण्याचा द्रुष्टिकोण वेगळा.... आणि सामान्य जनता जास्त असल्यामुळे अशा सामान्य स्रीया च जास्त आहेत...
असे सगळे पुरुषाच्या बाबतीत घडतं हे मी तर अजून ऐकलं नाही......

या ही दुप्पट परिस्थिती असते ....ती नवरा सोडुन गेलेल्या स्री ची...
गुरुनाथ सुबेदार सारखा शेण खाणारा भैताड नवरा असेल तर त्या स्वभिमानी असलेल्या राधिका सुबेदारचा दोष काय...माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत राधिकाला भलेही साथ देणारी माणसे मिळाली असतील..... पण खऱ्या आयुष्यात अशा बायकांना साथ देणारी माणसे मिळतातच असं नाही..
नवऱ्याची चुक असुनही धब्बा मात्र तिच्यावरच लागतो..... कि तुला सौसार करता नाही आला.... किंवा तुझा नवरा तुला संभाळता नाही आला... असे अनेक टोचणारे शब्द तिच्या अवतीभवती फिरायला लागतात.... नवरा सांभाळायचा म्हणजे नेमके कय करायचे....नातं हे विश्वावर टिकून असतं....
आईबापांनी म्हणावं निट वाग नात्यागोत्यात मान खाली घालायला लाऊ नको... भावाने म्हणावं तिला इकडे नको मी मित्रांना काय सांगू.... बहिणीच्या नवऱ्याची आणि बहिणीची काही कुजबुज होते तेव्हा त्याने म्हणावं तुझ्या बहिणी सारखे तुलाही एकटेच रहायचे आहे का..? हे मी वास्तवात ऐकलेले शब्द....
समाज चर्चा करतं कि हिचीच काहीतरी चुक असेल.... म्हणून नवऱ्याने सोडून दिली किंवा तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला सुरवात होते.... 
पण पुरुषाला जेव्हा त्याची बायको सोडून जाते तेव्हा समाज त्याला वेगळ्या नजरेने पहात नाही..... ती नाहीतर दुसरी करु अशी साथ त्याला सहज मिळुन जाते....
स्री स्वाभिमानी असो कि स्वावलंबी असो पण तिच्या आयुष्यात अशा घटना घडल्या तर समाजाच्या द्रुष्टीने तिचे जगणे बदलुन जाते... 
आपल्याकडे कणी वाईट नजरेने बघतय का.. ? किंवा माझ्या मागे माझी कोणी वाईट द्रुष्टिकोणातुन चर्चा करतय का? हे तिच्या मनाला नेहमीच टोचत राहते....
पहिल्या सारखे तिचे आयुष्य उलगडून रहात नाही.... ते नेहमीच कोमजलेलं असतं.... तिच्यावर तिने कसं वागावं हा दबाव पडतो.... तिच्या इज्जतीची आणि समाज तिच्याबाबतीत काय म्हणेल याची तिला वरचेवर जानीव करून दिली जाते...
स्री पुरुष समानता असुनही हा भेदभाव सहजरीत्या दिसुन येतो.... 
काही भागात नवरा मेल्यानंतर स्री ला आख्खं आयुष्य तसेच उधळावे लागते.... पण पुरुषाला मात्र पुन्हा लगनाची परवानगी असते....
अशा स्रीयांनी भूतकाळ विसरून जरी नव्याने आयुष्याला सुरवात केली तरी..... समाज तिच्या मनाच्या तळाशी गाडलेलं तिचं दुःख खोदून खोदून वरती तरंगतच ठेवतं... आणि यात जास्तीत जास्त समावेश असतो तो स्रीयांचाच बाईचे दुःख बाई पेक्षा कोणी समजू नाही शकत तरीही एक बाई दुसऱ्या बाईला डवचायला तयारच असते बाई बाईच्या मदतीला कधीच धावत नाही म्हणून पुरुषाच्या मदतीची अपेक्षा केली जाते पण काही पुरुषही तेथे काहीतरी आपला स्वार्थ साधनेच्या अपेक्षेतच असतात...

 

मागे

बायको मला बोलली ,”ऐका, जर मी तुम्हाला दुसऱ्या स्त्रीसोबत डिनर आणि ?….
बायको मला बोलली ,”ऐका, जर मी तुम्हाला दुसऱ्या स्त्रीसोबत डिनर आणि ?….

एक दिवस अचानक माझी बायको मला बोलली – ” ऐका, जर मी तुम्हाला दुसऱ्या स्त्रीस....

अधिक वाचा

पुढे  

बारावीचा निकाल
बारावीचा निकाल

काल बारावीचा निकाल लागला आणि मन एकदम २3 वर्ष मागे गेलं. खरं तर बारावीच्या निक....

Read more