By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 02, 2019 04:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आज लाल बहादुर शास्त्री यांची जयंती . शास्त्रीजीचे जीवन कार्य आजच्या नेत्यांनाही मार्गदर्शक ठरणारे आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक महान नेते तळपत होते. त्यांच्या प्रभावात शास्त्रीचे कर्तृत्व झाकोळलेले दिसते. नेता कसा असावा, हे शास्त्रीनी आपल्या कृतीने दाखवून दिले आहे त्यांची आज 115 वी जयंती आह. या निमिताने त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा.
2 ओक्टोंबर 1904 रोजी लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म वाराणसी येथे एका गरीब कुटुंबात प्राथमिक शिक्षकाच्या घरात झाला. ते दीड वर्षाचे असताना यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा मुलांना घेवू माता राम दुलारी माहेरी आल्या. शास्त्रीचे प्राथमिक शिक्षण मिरजापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले शाळेत असताना नावाड्याला द्यायला पैसे नव्हतं म्हणून शास्त्रीजी डोक्यावर दफ्तर व कपडे घेवून नदी पार करून जात अससात, अशीही आठवण सांगितली जाते. अशा या शास्त्रीवर लोकमान्य टिळक महात्मा गांधी लाला लजपतराय यांच्या विचारांचा प्रभाव पडला. गांधीजी 1915 मध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालयची कोणशीला बसविण्यासाठी आले होते. तेव्हा 11 वर्षाच्या शास्त्रीनी तेथे गांधीजींचे भाषण ऐकले आणि ते भारावून गेले. तेव्हापासून त्यानी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह रोलेट अॅक्ट, जालियानवाला बाग हत्याकांड इत्यादि घटना त्यांना अस्वस्थ करणार्या ठरल्या मग विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर या आंदोलनात शास्त्रीनी स्वत:ला झोकून दिले. त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल आले. काशी विद्यापीठाचे ते शास्त्री झाले. त्यांचे मूल आडनाव श्रीवास्तव होते. पुढे ते सर्व्हंट ऑफ द पीपल्स सोसायटीचे सदस्य झाले शैक्षणिक व सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते.
पंडित जवाहर लाल नेहरू आणि लाल बहादुर शास्त्री यांना कॉंग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. 1937 मध्ये सत्याग्रहात ते कारावासात गेले. शास्त्रीना सतेची लालसा नव्हती. 11946 मध्ये निवडणुकी झाल्या. शास्त्री गोविंदवल्लभ पंत यांचे सचिव झाले. मात्र पंत गेल्यावर शास्त्री उतर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.
1951 मध्ये पंडित नेहरूंनी त्यांना कॉंग्रेसचे सचिव केले. तर 1956 मध्ये नेहरूंनी आपल्या मंत्रीमंडळात शास्त्री ना रेल्वे मंत्रिपद दिले. मात्र ते रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्रीनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी नेहरूंसह अनेक नेत्यांनी त्यांना राजीनामा मागे घेण्यास नकार दिला. पण शास्त्रीजी आपल्या विचारांवर ठाम राहिले. 1957 मध्ये त्यांनी कॉंग्रेसला निवडणुका जिंकून दिल्या.
1947 ला देश स्वतंत्र झाल्यापासून पंतप्रधान पद भूषविणारे पंडित नेहरू 1962 मध्ये चीनने केलेल्या आक्रमणाने खचले. चीनने विश्वास घात केला याचा परिणाम होऊन नेहरूंचि खालावली. त्यातच 1964 मध्ये नेहरूंचे निधन झाले. तेव्हा नेहरूंचा प्रचंड प्रभाव असलेल्या भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादूर शास्त्री यांची एक मताने निवड करण्यात आली. त्यावेळी देशात अन्नधाण्याचे दुर्भिक्ष होते. भाताचे उत्पन्न कमी झाल्याने आठवड्यातून एकदाच जनतेला भात खायला मिळत होता. त्यावेळी शास्त्रीनीही आठवड्यातूनच एकदाच भात आपल्या जेवणात खाण्याचा निर्णय घेतला. शास्त्री हे वामन मूर्ति होते. नेहरूंच्या निधनानंतर पाकिस्तानने हीच संधी साधण्यासाठी 1965 ला भारतावर आक्रमण केले. त्यावेळी शास्त्रीनी ‘जय जवान जय किसान’ हा मंत्र देशाला दिला. शास्त्रीच्या कणखर नेतृत्वामुळे भारताने पाकवर मात केली. संयुक्त राष्ट्र संघाने युद्ध बंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. पाक बरोबरचा युद्धबंदीचा करार करण्यासाठी तत्कालीन रशियाला गेले तेथेच 10 जानेवारी 1966 रोजी निधन झाले. शास्त्रीवर विषप्रयोग झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी ललीता शास्त्रीनी केला. कारण शास्त्रीचे शरीर मृत्यू नंतर काळे निळे पडले होते. मात्र याचा खुलासा अद्यापी शकला नाही.
साधी राहणी असलेल्या शास्त्री यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग कधीच केला नाही. अशा या देशसेवकाला मरणोत्तर 1966 मध्येच भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान करण्यात आला.
गण्या : मन्या, काल कुठ गेला व्हतास ? संत्या : वाट बघून कंटाळलो आमी. ग....
अधिक वाचा