ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतीय क्रांतीचे प्रणेते लोकमान्य टिळक

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2019 08:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतीय क्रांतीचे प्रणेते लोकमान्य टिळक

शहर : मुंबई

1857 चा स्वातंत्र्यलढ्यानंतरही भारतात ब्रिटिशांविरुद्ध अनेक ठिकाणी बंड पुकारण्यात आले पण ब्रिटिशांनाही हे बंड मोडून काढले कारण बंडामध्ये संघटितपणाचा अभाव दिसून येत होता. ब्रिटिशांनी संपूर्ण भारतात जम बसवला होता. त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी सर्वप्रथम सामाजिक जागृतीची समाजात ब्रिटिशांविरुद्ध असंतोष घडविण्याची गरज होती. नेमकं हेच कार्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केले म्हणूनच त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून म्हटले जाते. त्यांना तुरुंगात टाकता तत्कालीन कामगारांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. एवढा त्यांच्या विचारांचा प्रभाव निर्माण झाला होता. त्याच्याच प्रेरणेने चाफेकरांनी ब्रिटिश अधिकारी रॅडची हत्या केली. लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीचे हे शताब्दी वर्ष आहे. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले.

 अनेक नररत्नाचे जन्मस्थळ असलेल्या कोकणातील रत्नागिरीतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील चिखली हे त्यांचे मूळ गाव त्यांनी 1981मध्ये समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि चिपळूणकर व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरु केली. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी लोकजागृतीचे महान कार्य केले व त्यांनी काही आजच्यासारखी प्रसारमाध्यमे त्याकाळी आजच्या सारखी प्रसारमाध्यमे नव्हती. संपर्काची साधने नव्हती. त्या काळात 1982 च्या अखेरीस देशात सर्वाधिक खप असलेले केसरी हे प्रादेशिक वृत्तपत्र ठेवले होते.

 1981 ते 1920 या चाळीस वर्षात लोकमान्य टिळकांनीही केसरीमध्ये 553 अग्रलेख लिहिले. टिळकांचे अग्रलेख हाच केसरीचा आत्मा होता. समाज संघटित वा  समाजात ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण व्हावा म्हणून टिळकांनी 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव आणि 1895 बसून शिवजयंती उत्सव सुरु केले.

 या उत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक लोककला व कीर्तने भजन हो असत. मिरवणूकाही निघू लागल्या. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला असंख्य स्वातंत्र्यसैनिक लाले कारण या उत्सवामधून मोठ्या प्रमाणावर जणाऱ्या समुदायाचे प्रबोधन करण्यात येत असे.

 ऐतिहासिक पौराणिक घटनातील दाखले देत ब्रिटिशांविरोधात जनतेच्या मनात रोष निर्माण करण्यात येत होता. तथापि ब्रिटिश अधिकारी त्या काळात धार्मिक कार्यात ढवळाढवळ करीत नव्हते. त्याचा उपयोग टिळकांनी करून घेतला. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केसरी मराठीतून जबरदस्त टीका केली "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ही त्यांची घोषणा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात 'गीतारहस्य' हा गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळकांवर प्रदर्शित झालेल्या 'लोकमान्य एक युगपुरुष' या चित्रपटात भूमिका सुबोध भावे यांनी साकारली आहे. याशिवाय विश्राम बेडेकर यांनी 'टिळक आणि आगरकर' हे तीन अंकी नाटक लिहिले आहे. त्याचप्रमाणे अनेक नामवंत लेखकांची पुस्तके लिहिली आहेत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीची जेव्हा जेव्हा उजळणी केली जाईल तेव्हा तेव्हा टिळकांच्या कार्याची नोंद घेणे अपरिहार्य ठरेल  म्हणूनच हे युगपुरुषच ठरले आहेत. त्यांच्या निधनानंतर महात्मा गांधींचा भारतीय राजकारणात खर्‍या अर्थाने उदय झाला. लोकमान्य टिळक आजही भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

 

 

 

 

 

 

मागे

लोकशाहीर  अण्णा भाऊ साठे
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

 तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच समाजसुधारक, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे हे ज....

अधिक वाचा

पुढे  

 ऑगस्ट क्रांतीचे विस्मरण नको
 ऑगस्ट क्रांतीचे विस्मरण नको

ज्या क्रांतीमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्या ऑगस्ट क्रांतीचे विस्मर....

Read more