ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

स्मार्ट फोनमुळे संवाद हरवला

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 18, 2020 12:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

स्मार्ट फोनमुळे संवाद हरवला

शहर : मुंबई

        इंटरनेटमुळे जग जवळ आलं पण माणूस हरवला. एकमेकांमधील संवाद संपुष्टात आलं, याची खंत अलीकडेच फेस बुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनीच व्यक्त केली आहे. अर्थात याचा अनुभव सध्या सर्वांनाच येत आहे. घरात आई-वडील, आजी आजोबा यांच्याशी संवाद साधण्यापेक्षा अनेक तरुण मूलं मोबाईलमध्ये व्यस्त असतात. मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग करण्यात, फेसबूकवर आलेल्या कमेंट वाचण्यात किवा अन्य काही मॅसेज वाचण्यात आणि मॅसेज पाठविण्यात गुंतलेली असतात. मोबाईल सतत त्यांच्या हातात असतो. कुणी त्यांना काम सांगितले, तर वेळ नाही म्हणून सांगतात. रात्री झोपल्यानंतरही अंथरुणात रात्री उशीरापर्यंत मोबाईलमधील गेम खेळणे (पबजी इ.) अथवा काही कार्यक्रम पहाणे, असले उपद्व्याप सुरू असतात. 

        यातील सर्वात महत्वाच्या भाग म्हणजे देशात घडणार्या कोणत्याही बर्या-वाईट घटनावर किवा सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर हल्ली प्रत्येक जण कमेंट करतो. त्या अभ्यास असो नाही तर नसो मत व्यक्त करायचं, एवढंच त्यांना माहिती असते. त्याच्या परिणामशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं. आर्थिक विषय असेल तर पूर्वी त्यावर अर्थतज्ञ मत व्यक्त करायचे. सामाजिक विषय असेल तर सामाजिक विषयांचे जाणकार अधिकार वाणीने बोलायचे. शेतीविषयक काही समस्या असतील तर कृषीतज्ञ आपले विचार व्यक्त करायचे. एखाद्या प्रकरणावर न्यायालयाने निकाल दिला तर त्यावर प्रसिद्ध कायदेतज्ञ त्यावर भाष्य करायचे. हवामान किवा पर्यावरणावर त्याचे सखोल ज्ञान असणारे बोलायचे, पण आता विषय कोणताही असो त्यावर लगेच माध्यमातून कमेंट व्यक्त करण्यात येत आहेत. मिम्स, ट्विटर, फेसबूक, व्हॉटअॅप वापर करण्यात येत आहे. इन्स्टाग्रामवरही कुणीही कमेंट करीत असतात. म्हणजे सर्व अशा कमेंट  करणार्‍यांना त्या विषयाचे ज्ञान असतेच असे नाही. मात्र प्रत्येकाला व्यक्त होण्याची घाई असते. पूर्वी धार्मिक विषयावर धर्मवेतेते बोलायचे तर अंधश्रद्धा निर्मूलनावर त्या समितीचे कार्यकर्ते तावातावाने मते मांडून त्या विषयीची वैज्ञानिक बाजू पटवून देण्याचा आटापिटा करायचे. म्हणजेच ज्याचा ज्या विषयाचा अभ्यास असेल तो त्या विषयाच अधिकार वाणीने विवेचन करायचा. समाजही अशा विचारवंतांच्या, अभ्यासकांच्या मतांचा आदर करायचा. त्यावर चर्चा व्हायच्या. पण आता कुठल्याही विषयावर कुणीही आपले मत व्यक्त करून मोकळा होता. फेसबूक आणि ट्विटर समोर कोणीच जाब विचारणारा नसतो. त्यामुळे कुणाचेच दडपण नसते. म्हणूनच जो तो उठतो तो कमेंट करतो. समोर कुणी असेल तर मत व्यक्त करताना थोडे दडपण येते. कारण समोरची व्यक्ती त्या विषयाची तज्ञ असण्याची शक्यता असते. त्यामुळे समोरासमोर मत व्यक्त करताना तो काय म्हणेल? अशी शंका येते. फेसबूक किंवा ट्विटरवर मत व्यक्त करताना अशी भीती बाळगण्याची गरज नसते. त्यामुळेच सध्या फेसबूक आणि ट्विटरवर कमेंटचा नेहमीच पाऊस पडत असतो. 

       पूर्वी ही माध्यमे नव्हती तेव्हा चावडीवर, चौका-चौकात कॉलेज कट्ट्यावर, गावच्या पारावर, मित्रांच्या मैफिलीत इतकेच काय पण घरात जेवताना वडीलधारी मंडळीही विविध विषयांवर उलटसुलट चर्चा करायची. त्याचबरोबर मुलांनाशीही मोकळेपणाने संवाद व्हायचा. आजी-आजोबा नातवंडांना मौखिक गोष्टी सांगायचे त्यातूनही अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन व्हायचे, उपदेश मिळायचा, आता हे सर्व हरवले आहे. पालक आतल्या खोलीत असतील तर मुलं बाहेरच्या खोलीतून एसएमएस करून निरोप देतात. "अर्जंट काम आहे बाहेर जातो". वडील बाहेर येई पर्यंत मुलगा बाहेर गेलेला असतो. सबूक मित्रांमध्येही गप्पा-चर्चा होतात त्याही एसएमएस ट्विटरच्या माध्यमातून. त्यामुळे जग जवळ आलं पण माणसं तुटली. मित्र वाढेल पण मैत्री संपुष्टात आली. आपलेपणा कमी झाला. भावनांमध्ये रुक्षपणा आला. माणूस एकलकोंडा झाला या एकाकी पाणातूनच कधी तरी नैराश्य येत आणि जीवन निरर्थक वाटू लागत म्हणून संवाद त्यासाठी सोशल मीडियापासून थोडा वेळ दूर राहायला हवं तरच पुन्हा एकदा जीवन आनंदी होईल!   

मागे

लष्कर दिनाचे महत्व
लष्कर दिनाचे महत्व

         आपल्याला १५ ऑगस्टला स्वतंत्र दिन, २६ जानेवारीला प्रजासत्ताक द....

अधिक वाचा

पुढे  

नव्या वळणावर
नव्या वळणावर

        परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. माणसालाही तो लागू होतो. बदलत्या का....

Read more