ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रसारमाध्यमांची विश्वासहर्ता

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 12, 2019 07:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रसारमाध्यमांची विश्वासहर्ता

शहर : मुंबई

महाराष्ट्रात विधान सभा निवडणूक होत असून आता खर्‍या अर्थाने प्रचारात रंग भरू लागला आहे या प्रचार सभेमधून प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका ही ठळकपणे पुढे येत आहे. येनकेन प्रकारेण सत्ता मिळवण्याचा नेते मंडळींचा उद्देशही यातून स्पष्ट होत आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनीच वेगळी आणि लोकशाहीला पोशाक अशी भूमिका मांडली आहे. सत्ता हस्तगत करण्या इतपत बहुमत आपल्या पक्षाला लाभणार नाही याची जाणीव त्यांना असल्याचे यातून स्पष्ट होते, म्हणूनच त्यांनी या वेळी आपल्याला जनतेने प्रभावी विरोधी पक्ष म्हणून निवडून देण्याचे आव्हाहन केले आहे. आपल्याला विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळावे अशी भूमिका प्रथमच राज ठाकरे यांनी मांडल्यामुळे त्यांचे खरे तर अभिनंदंनच करायला हवे. लोकशाहीच्या मंदिरात अलीकडच्या काळात विरोधी पक्षच निष्प्रभ झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर विधिमंडळात आणि लोकसभेतही प्रभावी पणे मांडले जात नाही. साहजिकच बहुमतच्या जोरावर सत्ताधारी जनतेला गृहीत धरून मनमानी कारभार करत असल्याची चर्चा आहे.

दुर्देवाची गोष्ट म्हणजे सत्ताधार्‍यांची तळी उचलून धरण्याची कामगिरी प्रसार मध्यमही करू लागली आहे. वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधार स्तभ मानला जातो. तो सत्ताधार्‍यांवर व राजकारण्यांवर अंकुश ठेवण्याचे काम करतो. विरोधी पक्षाचे काम त्यामुळे बरेचसे सोपे होते आणि सत्ताधार्‍यांवर वचकही राहतो. स्वातंत्रपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारवर आपल्या “केसरी” वृत्तपत्रातून जहाल टीका केली. प्रसार माध्यमांची ताकद काय असते हे टिळकांनी दाखवून दिले. स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विख्यात साहित्यिक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (प्र.के.अत्रे) यांनी वृत्तपत्र कशी प्रभावी भूमिका बाजावू शकतात हे “मराठा” ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून दाखवून दिले. संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधकांना अत्रेंनी “मराठा”तुन जहाल टीका करीत सळो की पळो करून सोडले. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा  इतिहासत “मराठा” ची भूमिका निर्णायक ठरली. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणार्‍या आंदोलकाना स्फूर्ति मिळाली असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यानंतर साधारणता नव्वद च्या दशकापर्यंत काही प्रमाणात तरी प्रसार माध्यमांची विश्वास हर्ता काही निष्ठावंत नामवंत पत्रकारांमुळे टिकून होती. काही स्वतहाच्या मालकीची वृत्तपत्रे चालवणारी मालक संपादक निर्भीड पणे सरकारवर टीका करीत होते. सत्ताधार्‍यांच्या चुकीच्या धोरणावर आसूड ओढत होते. याचे ठळक उदाहरण द्यायचे झाल्यास नवाकाळचे निळू भाऊ खाडीलकर यांचे नाव घ्यावे लागेल. तर भांडवलदाराच्या वृत्तपत्रात काम करूनही काही पत्रकारांनी आपला स्वतंत्र बाणा जपला होता. सरकार उलथवून टाकण्याची क्षमता त्यांच्या लेखनी मध्ये होती. म्हणूनच सत्ताधारी त्यांना वाचकून असत.

राजकरणात पुढे काय घडणार याचा अचूक अंदाज ते वर्तवित असत. बातमीची सत्यासत्यता पडताळून मगच ती बातमी छापली जात असे त्यामुळे ती बातमी प्रसिद्ध झाली की सर्वत्र खळबळ उडायची. सर्वत्र त्याची चर्चा व्हायची, प्रामुख्याने माधव गडकरी, कुमार केतकर, भारत कुमार, दिनकर रायकर, टीकेकर, मोरे, डॉ.निडगुडकर, निखिल वागळे, अशा पत्रकारांनी विश्वास हर्ता जोपासली होती, मात्र पुढच्या काळात इलेक्ट्रोंनिक प्रसार माध्यमे फोफावली आणि हळूहळू पत्रकारांची विश्वास हर्ता लोप पावत चालली त्यामुळे प्रसार माध्यमांचा कशावरही वचक राहिलेला दिसत नाही. मध्यंतरी पाच-सहा वेळा तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशा बातम्या झळकल्या पण प्रतेक वेळी त्या बातम्या फोल ठरल्या. कारण सत्ताधार्‍यांची तळी उचलून धरणारे आणि भांडवलदार धार्जिणे पत्रकार सध्या प्रसार माध्यमात धुडगूस घालीत आहे. त्यांची बांधिलकी फक्त राजकीय नेत्यांशीच असल्याची दिसून येते. त्यामुळे आपण काहीही बोललो कोणताही निर्णय घेतला तरी आपल्याला कोण विरोध करणार नाही याची खात्रीच या नेते मंडळींना झाली आहे. प्रभावहीन विरोधी पक्ष आणि विश्वासहर्ता गमावलेली प्रसार माध्यमे लोकशाहीला घातक ठरू शकतात. त्यामुळे विरोधी पक्ष प्रबळ हवा, ही राज ठाकरे ची भूमिका पटणारी आहे.

मागे

लाल बहादूर शास्त्रीचे अविस्मरणीय कर्तृत्व
लाल बहादूर शास्त्रीचे अविस्मरणीय कर्तृत्व

आज लाल बहादुर शास्त्री यांची जयंती . शास्त्रीजीचे जीवन कार्य आजच्या नेत्या....

अधिक वाचा

पुढे  

लेखनाचा धंदा
लेखनाचा धंदा

लेखनाला आवड,व्यासंग,छंद गंध म्हणण्याइतपत भारदस्त शब्द माझ्या शब्द गाठोड्य....

Read more