By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 21, 2019 06:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई देशाची आर्थिक राजधानी, मुंबई उद्योगनगरी, मुंबई मायानगरी अशा विविध उपाध्या मुंबई शहराला लाभल्या. मुंबई शहराचं आकर्षण आजही अनेकांना आहे. असंख्य स्वप्न उराशी बाळगून या शहरात वर्षानुवर्षे असंख्य तरुण येत आहेत. देशात मुंबईप्रमाणेच पुणे, ठाणे, नाशिक आदी शहरेही विकसित झाली. तेथेही मोठ्या प्रमाणात उद्योग धंदे सुरू आहेत. पण तरीही मुंबईचे आकर्षण तसूभरही कमी झालेले नाही . खेडापाड्यातील तरुणांची पावले प्रथम वळतात ती मुंबईकडेच. मुंबईने सर्वांना सामावून घेतले. पण आज मुंबईची अवस्था गॅस चेंबरसारखी झाल्याचे दिसते . येथे श्वास कोंडतोय. वाढत्या प्रदूषणामुळे आणि प्रचंड गर्दीमुळे येथील जीवनमान धोक्यात आल्याचे दिसत आहे.
गेल्या गुरुवारी याची प्रचिती आली. या दिवशी 19 सप्टेंबरला रात्री 8.40 पासून 11.43 पर्यंत मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला गॅस गळतीसंबंधी 82 फोन कॉल्स आले. मात्र या तक्रारी आल्यानंतर महानगर गॅस , आयसीएफ आणि बीपीसीएलने संयुक्तपणे तपासणी केली. गॅस गळती कोठून होतेय हे कळाले. गॅसचा वास आल्याने चेंबुर, मानखुर्द आणि गोवंडी भागातून गॅस गळती झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.
आता गॅस गळती नाही झाली तरीही मुंबईतील वाढते प्रदूषण ही एक गंभीर समस्या झाली आहे. देशातील सर्वाधिक प्रदूषण असलेल्या शहरांमध्ये दिल्लीनंतर मुंबई दुसर्या स्थानावर आहे. दिल्लीत तर प्रदूषणामुळे शाळा महाविद्यालयेही बंद ठेवण्यात येतात. इतकेच काय पण बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना भारताच्या दौर्यावर आले होते. तेव्हा दिल्लीतील आलीशान हॉटेलात त्यांचे वास्तव्य होते. तरी देखील दिल्लीतील प्रदूषित हवामानामुळे ओबामांचे आयुष्य 6 तासांनी कमी झाल्याचे सर्वेक्षनात एका संस्थेने म्हटले होते. यावरून दिल्लीत किती प्रदूषण आहे ते लक्षात येते. असे सर्वेशन जर मुंबईत झाले तर दिल्लीपेक्षा वेगळी स्थिती येथे आढळणार नाही.
मुंबईत वाढलेली प्रचंड लोकसंख्या, उद्योग, उभ्या राहिलेल्या इमारती लाखो वाहनांची वर्दळ, मेट्रो रेल्वेचे विस्तारणारे जाळे, आदींमुळे मुंबईत प्रदूषण वाढले आहे. चेंबुर, गोवंडी, मानखुर्द, माहूल आदी भागात तर रहिवासी प्रदूषणामुळे त्रस्त आहेत. मुंबईतील बहुसंख्य लोकांना श्वसनाचा त्रास जाणवतो. मुंबईतील माणसांचं जीवन सरासरी 40 ते 50 वर्षे इतकेच झाले आहे. कारण त्यानंतर माणसाची कामाची क्षमताच क्षीण होते. कित्येक तरुणांना थकवा जाणवतो. ही सारी प्रदूषणाचीच लक्षणे नव्हेत काय ? असे असून ही मुंबईतील उद्द्याने नष्ट करण्यात येत आहेत. याचे उदाहरणच द्द्यायचे झाले तर प्रभादेवी येथील सिद्धी विनायक मंदिराशेजारील साने गुरुजी गार्डन नष्ट झाले. आता गोरेगाव येथील आरेची वनश्रीनी नटलेली जागा मेट्रोच्या कारशेडसाठी वापरण्याचा घाट घातला जात आहे. अशा स्थितीत प्रदूषणात वाढ झाली नाही तरच नवल. आधीच मुंबई उपनगरांतील असंख्य वृक्ष या ना त्या कारणाने तोडले गेले. नद्द्या, समुद्र हटवून इमारती बांधल्या गेल्या. झोपड्या वाढल्या. म्हणजेच वाढत्या लोकसंख्येनुसार शहराच्या व्यवस्थेचे नियोजन केले गेले नाही. परिणामी मुंबई एक गॅस चेंबर झाल्याचे दिसत आहे. याची दाखल घेतली गेली नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची वेळ लवकरच आल्याशिवाय राहणार नाही.
संत्या : आमच बी ठरलय बग ? मन्या : काय ठरलंय तुमचं ? गण्या : आमि बी तुझ्या पक्षा....
अधिक वाचा