ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निर्मोही उपासना

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 06:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निर्मोही उपासना

शहर : मुंबई

अध्यात्मात वा परमार्थात निर्मोही उपासना सर्वश्रेष्ठ उपासना समजली जाते. निर्मोही उपासक आढळणे, भेटणे, दिसणे जवळ-जवळ अशक्यच. कारण प्रत्येकालाच काहीना काही हवे असतेच. निर्मोह उपासना प्रभू रामचंद्राला उष्टी बोरे खाउ घालणार्‍या अडणी-भिल्लीणीसारखी असते. भगवन श्री कृष्णालाच आपला प्राणसखा मानणार्‍या मीरे सारखी असते.यात देवाकडे मागणे काही नसते. आपण देवाचे देव आपला ही साधी सोपी सरळ भावना या उपासनेत असते. देव हा भक्तीचा भुकेला आणि प्रेमाचा तहानलेला असतो. निर्मोही उपासक परमेश्वराच्या याच उद्दिष्टाने सदासर्वदा आचार- विचार आणि व्यवहार करीत असतो. या चराचरात तो भरून राहिलेला आहे. तो निर्गुण आणि सगुण स्वरुपातही आहे. अशीच निर्मोही उपासकाची मनोधारणा असते. एका विशिष्ट तत्त्वात मूर्तितच परमेश्वर आहे. असा त्याचा आग्रह नसतो. दया - क्षमा-शांती आणि करूणा ज्या - ज्या ठिकाणी आहे. तेथे परमेश्वराचे अस्तित्त्व आहे. सत्यम्-शिवम्-सुंदरम् यात परमेश्वर  आहे असे त्यास वाटत असते. म्हणून याच विचार धारेची जपवणूक करण्याकडे निर्मोही  उपासकाचा वाटत असते. म्हणून याच विचार धारेची जपवणूक करण्याकडे निर्मोही  उपासकाचा कल असतो.
एका विशिष्ट मंदिरात जाऊन मूर्तीतच उपासना करण्याकडे निर्मोही उपासकाचा कल नसतो. जे-जे भेटे भूत। ते ते जाणीजे भगवंत।ं असा या उपासने मागचा भाव असतो. निर्मोह उपासनेत खरा खुरा आंतरिक जिव्हाळा, परमेश्वर प्राप्ती निखळ उमाळा महत्त्वाचा असतो. या उपासनेत परमेश्वरा प्रती पोकळ डामडौल खोटी प्रतिष्ठा, फसवे नटवेपण यास अजिबात थारा नसतो.
अनेक उपासक वा साधक बाह्य उपचारात फारच गुरफटलेले असतात. साध्यापेक्षाही साध्या साधनांना अवास्तव महत्त्व प्राप्त होते. तेव्हा निर्मोही  उपासना लोप पावते. यासाठी उपासकाने आपणाास काय हवे आहे? काय साध्य करावयाचे आहे.? ते चिरंतर आहे की क्षणभंगूर इत्यादी बाबींची काळजीपूर्वक विचार करावयास हवा पण तसा तो अनेकदा होताना दिसत नाही. म्हणून निर्मोही उपासना अनेकांकडून होताना दिसत नाही.
उपासकाच्या खर्‍याखुर्‍या आंतरिक उमाळ्यापेक्षा भाव-भक्ती यापेक्षा अनेकदा बहुतांशी उपासक बाह्य उपचारात अडकलेले असतात. आपण देवभक्त वा परमेश्वर उपासक आहोत याचे तेे प्रदर्शन करतात. येथेच ते फसतात. अध्यात्म्यात व आपण यातून बोध किती घेतो? अनेकदा अहंपणा, अज्ञान, आळस, बेफिकीरामुळे अभक्ती घडते. आचार-विचारातला कर्मदरिद्रीपणा प्रयत्नपूर्वक घालवला तर परमेश्वराची निर्मोही उपासना घडू शकते. सुदाम्याने आणलेल्या पोहयांत, द्रौपदीच्या थाळीत चिकटलेल्या भाजीच्या एका पानात वा कणता, शबरीच्या उष्ट्य बोरात आणि विदुरा घरच्या कण्यातही भगवंताचे प्रेम- भाव- भक्ती सर्वज्ञात आहे. हे सर्व निर्मोह उपासनेमुळेच साध्य झाले.

मागे

धर्म, पंथ-संप्रदाय, व्यक्ती, स्थल, कालपरत्त्वे उपासना भिन्न-भिन्न असू शकते. काही अपवाद वगळता प्रत्ये
धर्म, पंथ-संप्रदाय, व्यक्ती, स्थल, कालपरत्त्वे उपासना भिन्न-भिन्न असू शकते. काही अपवाद वगळता प्रत्ये

धर्म, पंथ-संप्रदाय, व्यक्ती, स्थल, कालपरत्त्वे उपासना भिन्न-भिन्न असू शकते. क....

अधिक वाचा

पुढे  

गुंडांच सरकार
गुंडांच सरकार

संत्या -: आर गण्या चल लवकर पारावार  गण्या -: थांब की एवडी काय घाई हाय संत्या -: ....

Read more