By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 06:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गण्या : लय वाईट दिस आले बगा.
मण्या : अरे यालाच तर अच्छे दिन म्हणत्यात.
संत्या : बुडत्या जहाजातल उंदीर इकडे तिकडे पळतायत जसे.
मण्या : दुसर्या पक्षात जाण्यासाठी उंदीर म्हणणं म्हणजे अतिच झालं.
संत्या : मग काय म्हणायच ? आर आमच्या नेत्यांनी या पलून जाण्यासणी काय कमी पद दिली व्हती ?
गण्या : आर तवा त्याचं सरकार व्हत. आता त्यांचं सरकार न्हाय.
संत्या : म्हणून काय झालं. सरकार नसल म्हंजी पक्ष सोडून जायचं ? हे पटत न्हाय .
मण्या : तुमी बी आमच्या पक्षात या की ? तुमासणी कुणी अडवल?
गण्या : मी का कूट बी जाणार नाय . ऊबी जिंदगी आमची एका पक्षात गेली आण अस अडचणीच्या काळात पक्ष सोडण बरूबर न्हाय.
मण्या : संत्या, तू तरी ईचार कर. तुमचे भाऊ आमच्याकडे परवाच आलेत.
संत्या : कुणी जरी इकडे तिकडे गेले तरी आमि जाणत्या राजाला सोडणार न्हाय.
मण्या : इतकी वरस पक्षात राहून, दिस रात काम करून काय मिळालं हो तुमासणी ?
गण्या : नाय आमाला काय मिळणार? आता तर आमच वयच झालं बाग.
संत्या : आर निष्ठा बिष्टा काय हाय का नाय ?
मण्या : निष्ठा व्यवहारात उपयोगी पडत न्हायत.
गण्या : आमि सायबासणी शब्द दिलाय. दिल्या शब्दाला जागाया नको काय ?
मण्या : मग तुमी तसेच राहणार. तुमी फक्त झेंड घेऊन घोषणाबाजीच करीत रहावा.
संत्या : तू एवढ्या गमजा मारतोस मग तुला इतक्या वरसात काय दिल पक्षानं . तू सुदिक आमच्या परमानच राबतोय न्हवं.
मण्या : ते काय बी असाल तरी आज आमच सरकार हाय.
गण्या : तुमची बी अवस्था का घर का ना घाट का अशीच हाय.
संत्या : जेणी पक्षाला वाढवल, मोठ केल. ते आज अडगळीत टाकल्यासारख झालेत.
मण्या : आसच काय नाय. आमच सायब अजून बी त्यांचा सल्ला घेत्यात.
गण्या : पण त्यांना ना सत्तेत स्थान न पक्षात पद. बिचारे कुडत बसलेत.
संत्या : सायबांचा आदेश आला की आमि झपाटून कामाला लागायचो .
मण्या : आर तुमच्या सारख्या निष्ठावाणांची त्यांनी काय कदर केली ?
गण्या : आमाला आमच्या पक्षाचा, नेत्याचा अभिमानच हाय . सायबानी सामान्य कार्यकर्त्यालाही मुख्यमंत्री केला व्हता.
मण्या : पण काय उपेग झाला ?
संत्या : रस्त्यावरचे कार्यकर्ते नेते झाले. मंत्री झाले. सायबानी घडवले.
गण्या : आता सत्ताधार्यांचच बगा. किती लोक तिकडे जातायत. त्यांना लगेच सत्तेची लाटरी लागते.
संत्या : पण ज्यांनी उभी हयात पक्षात घालवली, पक्षाला हे दिवस आणले ते कुटच दिसत न्हाईत.
गण्या : भायरून आलेले आयत्या बिळावर नागोबा झालेत.
मण्या : पक्ष वाढवायला अशा गोष्टी कराया लागत्यात. तुमी तुमच्या नेत्या कार्यकर्त्यांना सामभाळू शकत न्हाय. असाबी त्याचा अर्थ व्हतो.
संत्या : मग इतकी वर्ष पक्षात राहूनच त्यांनी पैसा, बंगला, गाड्या , जमनी घेतल्या.
गण्या : पक्षांमुळ मोठी पद मिळाली. लोकांमध्ये नाव झालं.
मण्या : त्यो समदा भूतकाळ झाला. आज काय ?
संत्या : म्हंज वाईट दिस आल का पळून जायच दुसर्याचा आधार घ्यायचा, म्हणजे गरज सरो वैद्य मरो असच न्हवं काय ?
मण्या : यालाच व्यवार म्हंत्यात. ज्याला व्यापार जमला त्यो तरला. बाकीच्यानी निष्ठांचा जप करत रहावा.
गण्या : तुमच्या पक्षाच तेच धोरण दिसत.
मण्या : मग त्यात काय चुकीच हाय ?
संत्या : आयुशभर शेतात राबवून घेतलेल्या बैलाला खाटीकाकडं. द्यायचं आसच का ?
गण्या : दुसर्या पक्षातले मोठे लोक आपल्यात आणायचे, त्याना पद द्यायची, काय मागतील ते द्यायचं .
संत्या : आणि आपल्या पक्षातल्या निष्ठावानांना डावलायच . त्यांच्याकडण फक्त काम करून घ्यायच, हेच आमच राजकारण झालय.
गण्या : पण ते आज ना उद्या उलट व्हईल, तवा निष्ठावानांची परमानिक कार्यकर्त्याची याद येईल.
संत्या : तवा बी आज व्यवार बगणारे पळत सुटतील.
मण्या : आशी येळ आस आजच्या धोरणावरण तरी वाटत न्हाय. पुढचं पुढ.
भारतीयांच्या मनात सीमेवर लढणाऱ्या सैनिकांविषयी कायमच आदराची भावना राहिले....
अधिक वाचा