ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

धर्म, पंथ-संप्रदाय, व्यक्ती, स्थल, कालपरत्त्वे उपासना भिन्न-भिन्न असू शकते. काही अपवाद वगळता प्रत्ये

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 04, 2019 08:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

धर्म, पंथ-संप्रदाय, व्यक्ती, स्थल, कालपरत्त्वे उपासना भिन्न-भिन्न असू शकते. काही अपवाद वगळता प्रत्ये

शहर : मुंबई

धर्म, पंथ-संप्रदाय, व्यक्ती, स्थल, कालपरत्त्वे उपासना भिन्न-भिन्न असू शकते. काही अपवाद वगळता प्रत्येक उपासनेमागे उघड व गुप्त काही ना हेतू इच्छा कामना असतेच हे सर्व मान्य आहे. परंतु कोणत्याही उपासनेने मनःशांती लाभावी हाच प्रधान हेतू असावा. उपासनेत साधनापेक्षाही साध्याला फार महत्त्व आहे. अशा उपासकांनाच जनता- जनार्दनाच्या हृदयात स्थान मिळते.
उपासनेच्या साधनापेक्षाही साध्य किती महत्त्वाचे असेत हे प्रबोधित करणारा समर्थ रामदास स्वामींच्या जीवनात एक प्रसंग निश्चितच विचार करावयास लावणार आहे. एकदा एक तपस्वी समर्थांना भेटावयास सज्जनगडावर आला. आपण एक तप कठोर तपश्चर्या करून पाण्यावरून चालण्याचे सामर्थ्य प्राप्त केले आहे. असे सांगू लागला पाण्याने तुडुंब भरलेल्या नदी पात्रावरून मोठ्या तलाव, सागरावरून आपण सहज चालत जाऊ शकतो. असे तो मोठ्या अभिमानाने श्री समर्थांना सांगू लागला.
समर्थ त्यास आपादमस्तक न्याहळत म्हणाले तपस्वी युवा पाण्यावरून आवश्यकता नव्हती त्याऐवजी जनता जनार्दनाच्या कल्याणासाठी कष्ट उपसले असते. त्यांच्या भल्यासाठी काही केले असते तर तुमचा एक तपाचा कालावधी सार्थकी लागला असता.
त्या तपस्व्याला त्याच्या तपश्चयेंतील फोलपणा कळला पण हे समजण्यासाठी त्याची बारा वर्षे फुकट गेली. त्यामुळेच उपासनेत उपासनेतील साधना पेक्षाही साध्याला फार महत्त्व असते. सर्वच धर्मातल्या धर्म संस्थापकांनीख् साधू-संत सत्पुरूषांनी विविध माध्यमांतून उपासनेतून काय साध्य करावयास हवे ते सांगितले आहे. आत्मोध्दाराबरोबरच इतरांवाही उध्दार हे उपासनेतील उद्दिष्ट सर्वसामान्य आहे. पण आपणास सध्यातरी सर्वच तीर्थक्षेत्री, मठ, मंदिरात वा अन्य धार्मिक स्थळी स्व उपासनेतून स्वतःचाच भैतिक विकास साधण्यात गुंतलेले अनेक साधक दिसतात. अशी स्व-उपासना आध्यात्मिक दृष्ट्या विफल असते.
डॉ. यशवंतराव पाटील
यशवंत क्लासेस, गजानन इनक्लेव्ह,

अशोक स्तंभ, गंगापूर रोड, नाशिक -01, मो.9890615649

मागे

शिक्षणाचे महात्म्य
शिक्षणाचे महात्म्य

शिक्षण हे सर्व सुधारणांचे प्रवेशद्वार आणि समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आ....

अधिक वाचा

पुढे  

निर्मोही उपासना
निर्मोही उपासना

अध्यात्मात वा परमार्थात निर्मोही उपासना सर्वश्रेष्ठ उपासना समजली जाते. नि....

Read more