ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अपघातांची मुंबई

By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 05:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अपघातांची मुंबई

शहर : मुंबई

       गेल्या १० महिन्यात राज्यात ३० हजार अपघात झाले. यात ११ हजार लोकांचे बळी गेल्याचे  उघडकीस आले आहे. मात्र त्यातही मुंबईमध्ये संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत अपघातांची आकडेवारी चिंताजनक आहे. २०१८ मध्ये या वेळेत ३९६ अपघात झाले. या अपघातांमध्ये ६३ जणांना आपले प्राण गमावले लागले. तर रात्री ९ ते १२ या वेळेत झालेल्या ३४० अपघातांमध्ये ७१ मुंबईकर प्राणास मुकले. दुपारी १२ ते ३ या अवधीत ३१२ अपघात झाले यात ६४ जण मृत्यूमुखी पडल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. सर्वसाधारणपणे मुंबईसारख्या शहरात रोज कुठे ना कुठे अपघात होतच असतो. हे अपघात जसे वाहन चालकाच्या चुकांनी होतात तसेच ते प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे अधिक होत असल्याचे दिसून येते. 
       मुंबई मायानगरीत अनेकजण आपले नशीब अजमावण्यासाठी येतात. मुंबईत जो उपाशी राहिला तो जगाच्या पाठीवर कुठेही पोट भरू शकत नाही, असे म्हंटले जाते. कारण मुंबईत काम करणारा कधीही उपाशी राहत नाही. म्हणूनच देशाच्या कानाकोपर्या तून असंख्य तरुण-तरुणींचे लोंढेच्या लोंढे येत असतात. उत्तरेकडील राज्यामधून आलेले कसलाही अनुभव नसलेले अनेकजण कुठेही पदपथावर चहा-भाजीपाला विक्रीचा धंदा करतात. साहजिकच मुंबईची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आणि झपाट्याने वाढत आहे. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे मुंबईत सर्व प्रकारचे उद्योगधंदे-व्यवसाय चालतात. बांधकाम क्षेत्रातील शेकडो मजूर राबत आहेत. त्यामुळे मुंबई उपनगरे, नवी-मुंबईपर्यंत विस्तारली. ठाणे-पालघर-पुणे आदी भागातूनही असंख्य कामगार कर्मचारी, व्यावसायिक ये-जा करीत असतात. अर्थात कुणी खासगी वाहनांचा वापर करतात तर कुणी सार्वजनिक वाहनांचा वापर करतात. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत आणि संध्याकाळी ६ च्या नंतर मुंबईत प्रचंड गर्दी दिसून येते. सर्व रेल्वे स्थानके आणि लोकल गाड्यांना तूफान गर्दी असते. लोकलने संध्याकाळी प्रवास करणे दिव्यच पार पाडण्यासारखे असते. रेटारेटी, धक्काबुक्कीमुळे रेल्वे प्रवास नकोसा वाटतो. तर संध्याकाळी होणार्याआ वाहतूक कोंडीमुळे रास्ते-प्रवासही जीवघेणा झालाय. महत्वाची गोष्ट अशी की, वाहतूक कोंडी ही योग्य पद्धतीने नियोजन न होणे, बेशित्तपणे वाहने चालविणे, कुठेही रस्त्यात वाहने उभी करुन ठेवणे, पदपथावर फेरीवाले, दुकानदारांनी धंदे थाटणे, रस्त्यावरही फेरीवाले असणे. या सर्वामुळे वाहतूक कोंडी होते. प्रवासी-पादचारी यांना धड चालताही येत नाही. रूग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिकाही वेळेत पोहोचत नाही. त्यामुळे अपघात होत असतात. 
       या संदर्भात आणखी एक गोष्ट नमूद करावी लागेल ती म्हणजे वाहनांची प्रचंड वाढलेली सख्या. झोपडपट्टीत राहणार्याा खोली मालकापेक्षा भाडेकरूच्याच दोन-चार मोटारसायकली असतात. १८ वर्षावरील तरूणच अपघातात अधिक बळी जात असल्याचे आढळून आले आहे. रात्रीच्या वेळी बहुसंख्य तरुण मोटारसायकाल वरुन उशिरापर्यंत फेरफटका मारत असतात. बेफाम वेगाने मोटारसायकल चालविणे हा तरुणांचा शौक असतो. वाहने थांबलेली असली तरी स्कूटर वेडीवाकडी करीत त्यातून पुढे रेटीत जातानाही अनेकजण दिसतात. वाहन चालविताना काळजी घेतली जात नाही. रस्त्यावर चाललेली कामे, रस्त्यावरील खड्डे हे देखील अपघातांना कारणीभूत ठरतात. 
       असे जरी असले तरी वाहन चालकांनी थोडी जारी काळजी घेतली आणि महापालिकेने अनधिकृत फेरीवाले व दुकानदार यांच्यावर धडक कारवाई केली तरी काही प्रमाणात अपघातांना आळा बसेल. मात्र यात काही बदल झाला नाही तर अपघातांची संख्या अशीच वाढत जाईल. 

मागे

घोडा का अडला ?
घोडा का अडला ?

         घोडा का अडला ? भाकरी का करपली? तर त्याचं उत्तर न फिरवल्याने असं आ....

अधिक वाचा

पुढे  

वडाच्या पारावार - नववर्ष स्वागताची तयारी
वडाच्या पारावार - नववर्ष स्वागताची तयारी

  मन्या : संत्या-गण्या, काल पारावर का नाही आलात? संत्या : नव्या वर्षाची स्वाग....

Read more