By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 24, 2019 03:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
संत्या -: गण्या जेवण झाल ना चल मग
गण्या -: थांब जरासं यवडी कसली घाई
संत्या -: आर मण्या चा फोन आलता कदीचा आलाय तो पारावार
गण्या -: चल जाऊ मग
मण्या -: आर कुठं आहीसा तुम्ही कावादारण वाट बघतोय मी इथं
गण्या -: व्हय र जरा उशीरच झाला
मण्या -: का रंं
गण्या -: बाबा संग जरां बोलत बसलो होतो
संत्या -: एवड काय रं खास
गण्या -: काय नाय रं, ते सरकार न म्हणे आज बजट दिल तेचं
मण्या -: ते व्हय ते आपल्या काय कामच नाय लेका ते पैसेवल्यासाठी असतं
संत्या -: मी भी एकल रं की शेतकर्याला भी काहीतरी दिलाय म्हणून तेथे डेरीत बोलतं व्हते
गण्या -: दिलय की वर्षाला सहा हजार रु.
मण्या -: कशाला ते, कोणी शेतकरी दुष्काळामूळ फासावर लटकला तर त्याच्या मैताला व्हयं रं
संत्या -: त्या सहा हजारत कुठल बी तरी येते का बघा म्हणावं सरकारला
मण्या -: बरोबर हायं आर त्यांची कसली ती जी.ऐस.टीच सोळा हजार झालती मगल्यावरशी बियाण्याची आणि झाल काय पावसानं सर्व नेले त्या सरकारला दिलेल्या जी.ऐस.टीचपैस बी नायं आलं
गण्या -: आणि हे सहा हजार आमच्या घरला येऊन लागे पर्यंत आपलं पाच हजार जातील त्या पुढार्यांच्या घशयात
संत्या -: हे अगदी बरोबर हायं बघ तुझं
मण्या -: उद्या पासणं ते बघ कसं दाबात फिरत्यात गावातनं
गण्या -: आता या सहा हजारसाठी त्यांना रोज सलाम करा चहा पाजा
संत्या -: आर ते सहा हजार काय एकदम नाय मिळणार हप्त्या न म्हणं
मण्या -: मला तरी नग बाबा हे मी उपाशी मरेन पण आता या नेत्यांच्या लोभाला बळी पडणार नाही
गण्या -: मी भी ठरवलय या खेपेला कुणाच्या पाठण झेंडा घेऊन फिरणार नाय
संत्या -: बरोबर बोलतोस तू सगळे सारे एकाच माळेतले मणी बघ
मण्या -: आता फिरल्यात मोठ्या पुढर्यांच्या माग माझ्या बायकोला तिकीट दे पोरला दे करून
गण्या -: व्हय हे वरचे पुढारी बायका पोरांना पैसे घेऊन तिकीट देत्यात आणि आमच्या माथ्या वर मारतात
संत्या -: मग निवडून आले की त्यांना दिलेले पैसे उकळायला चालू करण्यात
मण्या -: त्यात आपल्या सारख्या गरिबाचा कोण विचार करतोय कशाला
गण्या -: आता लई झाल मी घरात बा ल भी सांगितलंय कुणाला दारात उभं करून घ्याच नाय आणि कुणाच्या मगण फिरायच नाय
संत्या -: बरोबर हाय बघ तुझ मी बी माझ्या घरात असच सांगतो लई झाल आता
मण्या -: मी बी सांगतो आर आता डोळ नाही उघडलं तर आपल घर भी धूऊन नेतील हे
संत्या -: चला सकाळी लवकर उठायला पाहिजेत
गण्या -: कारं सहा हजार घ्यायला काय
संत्या -: घ्यायला कसले घालू त्यांच्या सरणावर, जरा शेतात आऊत मारव म्हणतो दुपारी लई ऊन व्हतयं
गण्या -: व्हय मला भी जायचं हायं.
नुकताच तिरुपती बालाजी दर्शनासाठी गेलो होतो. एका दुकानात चहा पिण्यासाठी गेल....
अधिक वाचा