By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 24, 2019 03:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
संत्या -: अरे आज लवकर माझ्या आदी आलासा की
मण्या -: कामं आटपली म्हणल लवकर जावं
गण्या -: आर रोज तू येतोस की आज आम्ही आलो
मण्या -: आर मला सांग तुला का उशीर झाला
संत्या -: काय नाय र ते स्टँड वर पोस्टर लावत होते तिथ थांबलो वाईच
मण्या -: कसल पोस्टर र
गण्या -: ते डेअरी जवळ भी कायतरी लावत होती पोर
संत्या -: आर ते शिवशाही गाडीचं
मण्या-: अरे ती सुरू होऊन तर लई दिवस झाले की र
गण्या -: आणि त्या गाडीचा काय फायदा भी झाला नाय,कीती तरी नुकसान व्हतय
मण्या -: सगळ्यात लई अपघात झाले बघ तिचे
संत्या-: आर त्यावर ड्रायवर सगळे खासगी हाइत त्यांना कुठला धाक
गण्या -: कसबी गाडी हाणत्यात, कोण हाय त्यासणी विचारणार
मण्या -: माग तर म्हणे एकजण जेवायला गाडी लावली आणि गटारी करायला गेला म्हण
संत्या -: व्हय ही बातमी मी भी बघितली व्हती त्याला दारू जास्त झाली आणि आलाच नाय
गण्या -: आणि ही गाडी चालू करून नेहमीच्या गाड्या बंद केल्यात
मण्या -: व्हय आर यांचा ड्रायवर नाय आला की गाडीच सोडत नाहीत
संत्या-: एस.टी. वाले म्हंत्यात आमचा ड्रायवर नाय आम्ही काय करणार
गण्या -: आर या नेत्यांनी आपल्या माणसांसनी कंत्राट दिलय एचई सर्व
मण्या -: बरोबर बोलतोस तु काय गरज होती एचई सर्व करायची
संत्या -: आपल्या साध्या गाड्या बंद केल्या आणि यांच्या खासगी गाड्या वाडल्या
गण्या -: द्या म्हणावं तस भाड
मण्या -: आपल्याच गावातनं मुंबईला पाच साध्या गाड्या व्हत्या
संत्या -: आणि समद्या फूल जायायच्या
गण्या -: आता नावाला एक शिवशाही चालू केली आणि समद्या गाड्या बंद
संत्या -: ती बी कधी येते कधी नाय
मण्या -: आर लग्झरी चालू झाल्या की दहा बारा
संत्या -: त्या या नेत्यांच्या पोरांच्या आणि मेवण्याच्या
गण्या -: घेत्यात पायजे तेवडा पैसा
मण्या -: आणि यात रोज मानस मरत्यात ते येगळच
गण्या -: आर मुद्याच राहीलच की र
मण्या -: काय र
गण्या -: ते पोस्टर कसले
संत्या -: आर ते दिव्यांग लोकांसाठी सूट दिले म्हणी त्यात
गण्या -: सूट द्यायला गाड्या तरी आहीत का बराबर
मण्या -: तू काय येडा बिडा हाइस काय र
संत्या -: का र आता मी काय केल हाय
मण्या -: आता चार महिन्यांनी काय हाय
गण्या -: काय र तुझ दुसर लगीन हाय की काय
मण्या व्हय ये भात खायला
संत्या -: आर आस काय करतूयास
मण्या -: चार महिन्यानी निवडणूक आली इसरलास व्हय
गण्या -: आता आल बघ ध्यानात हे सगळ तोंडाला पान पुसायच चालू हाय म्हण की
संत्या -: म्हणजे आता रोज नवी सपण बघायची
मण्या -: आणि ती पत्याच्या घरासारखी कशी कोसळत्यात ते भी बघायच
गण्या -: मी ठरवलय आता लई झालं या येळेस चांगला नेता निवडायचा
संत्या -: हे बघ येड
गण्या -: का र
संत्या -: चांगला नेता निवडायला चांगल्या माणसाला तिकीट तरी पायजे काय नको
गण्या -: यावर काय तरी करायला पाहिजे बघ नाय तर हे देश इकणार एक दिवस
संत्या -: आता काय बाकी राहलया
गण्या -: चल बघूया काय तरी मार्ग निगल यात न भी
मण्या -: चल त्यांना म्हणावं शिवशाही गाडी काडून काय व्हणार नाय
संत्या-: आस करून आमच्या राजाच नाव खराब करण्यापेक्षा त्यांनी जस राज केले तसा करा
मण्या -: बरोबर हाय पण यांची घर कसी भरणार मग चल जाऊ घरला परत आपला राजा जन्माला आल्या शिवाय काय हे व्हणार नाय
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार यांच्य....
अधिक वाचा