By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: जानेवारी 20, 2019 03:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गण्या - : अरे संत्या जेवाण झाल का न्हाय अजून
संत्या -: हे बघ आताच हातावर पाणी घेतलं बघ
गण्या -: मग चल जाऊ पारावारन जरा फिरूनशान येऊ
संत्या -: चल जाऊ
मण्या -: येवा आर किती उशीर कुठ गेलता दोघ भी एकदम आलात
संत्या -: काय न्हाय र असच जरा काम व्हत
मण्या -: वाटल आजभी काय नवीन बातमी बघित बसलाय
गण्या -: काय बघायच र रोज तेच चालू आसत
मण्या -: का र काय झाल
गण्या -: रोज तेच गरिबाच दुखड आणि नेत्यांची मजा
संत्या -: आता आणि नव काय झाल बोल की
गण्या -: आर मुंबईत बस चा संप चालू आहे तेच रे
मण्या -: आर तेला तर आठ दिवस झाले की
गण्या -: आज मिटला म्हण तो संप
संत्या -: आर मग चांगलंच झाल की
मण्या -: व्हय बर झाल बघ
गण्या -: आर कोर्टान सांगितलं तवा मिटला म्हण
मण्या -: व्हय मी तोच ईचार करतोय
संत्या -: गरिबान आपली सगळी दुखडी कोर्टातच न्यायची वाटत आता
गण्या -: आर आपल्या नेत्यासनी कुणाचं काय पडल न्हाय
मण्या -: बरोबर बोलतूयास बघ तू त्यांना फकस्त आपली खुर्ची पाहिजेत बाकी काय नको
संत्या -: आर ते खुर्ची साठी काय बी करत्यात बघ
मण्या -: आणि एकावर पोट भी भरत नाय बघ
गण्या -: बरोबर आपली खुर्ची मिळाली की बायकोला कसी मिळालं त्याच्या माग लागत्यात
संत्या -: खुर्ची मिळसतवर समद्याच्या हात जोडायच
मण्या- : निवडून आल्यावर बसा बोंबलात म्हणायच
गण्या -: बघ की कामगार बिचारे संप करून आपल्या मागण्या सांगल्यात
संत्या -: आणि आपले नेते निवडणुकी च्या माला कुटली जागा तुला कुटली हेच चालू आहे बघ
मण्या -: कामगारांच हयासणी काय नाय यांना युती व्हते का नाय त्याची चिंता
गण्या -: आणि कुणाचा आमदार आपल्यात येतोय याची चिंता
संत्या -: ते हक्कासाठी लढाल्यात त्यांना न्याय द्यायचा सोडून त्यासणीच घर खाली करायला सांगत्यात
मण्या -: हयो तर आपल्या देशाची अब्रू जाण्यासारखं आहे बघ
संत्या -: आर गण्या मला ऐक सांग हे आमदार आपला पगार कसं र पाहिजे तसा वाढून घेत्यात
गण्या -: आर हे येवढे बेशरम झाल्यात लोकांसमोर भांडत्यात आणि आपल काय असलं तर सगळे ऐक व्हत्यात बघ
मण्या -: बरोबर म्हणतोस बघ तू मी किती वेळा बघितलाय यांनी आपला पगार वाढवून घेतलाय
गण्या -: यांना फोन चे पैसे , इमानाण फिरायचे पैसे मोठ्या मोठ्या हाटेलात राहायचे पैसे
संत्या -: आणि हे सर्व ऐकदा निवडून आल की आयुष्य भर मिळतया म्हण
गण्या -: व्हय र तुला नाही माहीत ऐकदा निवडून आल की झालं समद मिळणार
मण्या -: मग बायको , मुलगी यांना उभ करायच मग त्यांच्या नावावर भि चालू
संत्या -: आर पण यासणी कोण रोकतया कोणी नाही मग त्यांनी थोड तरी गरिबांसाठी करायला पायजे की नको
गण्या -: समद्याच चांगलं झालं तर त्याच्या पाया कोण पडणार
मण्या -: मग मत काय सांगून मघणार
संत्या -: बरोबर बघ
मण्या -: मग आता झाल्या त्यांच्या मागण्या मान्य
गण्या -: झाल्यात म्हंत्यात पण त्यांच्या पदरात पडतील तवा ना
मण्या -: आपली बी कर्ज माफ झाल्यात की , आपण अजून सातबारा भरलेला हाय नव्ह
गण्या -: कश्याला लेका जखमेवर मीठ चोळतोस
मण्या -: मग काय करू आता त्या कामगारांच्या बायका पोरांनी मिठाई वाटली नाचत व्हते
संत्या -: आमि भी कर्ज माफ झाल तवा नाचलो मिठाई वाटली की
मण्या -: मग काय झाल
गण्या -: काय व्हतया बियांनाच कर्जवाले दरात येत व्हते आता मिठाईवले आणि वाजपी भी येत्यात
संत्या -: आता बियाण्याचे पैसे फेडायचे की कर्ज माफ झालेल्या मिठाईचे
मण्या -: हे कोर्टातच जाऊन विचारायला पाहिजेत बघ
संत्या -: का र
मण्या -: आपल्या नेत्यांना आता टाइम कुठ आहे ते समदे माझी खुर्ची राहते कशी त्याच्या मग हाइता
गण्या -: बरोबर बोलतोस तू रोज टीव्हीवर हेच चालू आसतय बघ युती व्हणार का नाय
मण्या -: चल लई उशीर झाला हे आपल्या समोर भांडत्यात आणि आपल काम असलं की लगेच युती करट्यात
मण्या -: झाली तरी काय आणि नाही झाली तरी काय आपला वाली कोण न्हाय बघ.
मुंबईत नऊ दिवस झालेला बेस्ट बसचा संप म्हणजे जसे मिल कामगार संपले तसेच बेस....
अधिक वाचा