ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

द्रौपदीशी  बंधु शोभे नारायण

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 15, 2019 09:08 AM 2019-02-12T14:15:30+5:30

द्रौपदीशी  बंधु शोभे नारायण

शहर : मुंबई

भरजरी ग पीतांबर दिला फाडून |

द्रौपदीशी बंधु शोभे नारायण ||

राखी पौर्णिमा. रक्षाबंधनाचा पवित्र सण देशभर उत्साहात साजरा करण्यात येत आहे.  या निमित्ताने वरील गीत ओठावर आले. रक्षाबंधन केव्हापासून सुरू झाल ? कुणी सुरू केल ? या विषयी अनेक मतप्रवाह आहेत. त्यापैकीच एक श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्याविषयी कथा सांगितली जाते. पाच पांडवांची पत्नी असलेली द्रौपदीही श्रीकृष्णाची मानलेली  आणि सुभद्रा ही सख्खी बहीण. तरही श्रीकृष्णाचा ओढा द्रौदीकडे अधिक असतो याविषयी सुभद्रा एकेदिवशी त्याला जाब विचारते. योग्य वेळी त्याचे उत्तर देईन, असे सांगून श्रीकृष्ण जातात. पुढे काही दिवसांनी श्रीकृष्ण सुभद्रेच्या महालात येतात. सुभद्रेला म्हणतात, "मला भूक लागले, काहीतरी खायला दे" सुभद्रेने विविध फळे आणून त्यांच्या समोर ठेवली. श्रीकृष्ण एकीकडे फळे कापून खात असतानाच बहिणीशी गप्पा मारतात. हीच वेळ योग्य असल्याचे जाणून त्यांनी फळ कापण्याचे नाटक करत बोट कापून घेतले आणि ते विव्हळू लागतात. सुभद्रेला म्हणतात, "एखादी चिंधी बांध, ते रक्त थांबेल" सुभद्रा म्हणजे सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाची  पत्नी तिच्या महालात चिंधी कुठून मिळणार?

सुभद्रेने सर्व उंची साड्या  धुंडाळल्या . पार्थाने दिग्विजय संपादन केला तेव्हा विविध राज्यातून एकापेक्षा एक भारी साड्या सुभद्रेला आणल्या होत्या. तिला चिंधी सापडत नसल्याचे पाहून श्रीकृष्ण म्हणाले, "चल, आपण द्रौपदीकडे जाऊ, तिच्याकडे चिंधी सापडते का पाहू"

श्रीकृष्ण आणि  सुभद्रा द्रौपदीच्या महालाच्या दरवाजात आले. श्रीकृष्ण तेथे उभे राहून तिला हाका मारु लागले. "पांचाली, पांचाली, धावत ये. माझं बोट कापलयं, रक्त थांबत नाहीये चिंधी घेऊन ये, द्रौपदी श्रीकृष्णाच्या हाका ऐकून तशीच बाहेर धावत आली. श्रीकृष्णाच्या बोटातून निथळणारे रक्त पाहून ती कळवली आणि क्षणाचाही विचार न करता तिने शालूचा पदर फाडून त्याची चिंधी करून ती त्यांच्या बोटाला बांधली. भावापेक्षा शालू, साडी महत्त्वाची नाही हे तिने दाखवून दिलं. तेव्हा श्रीकृष्णाने सूचक नजरेने सुभद्राकडे पाहिले श्रीकृष्णाला काय म्हणायचे आहे, हे लक्षात येताच सुभद्रेने मान खाली घातली. पुढे द्दुतामध्ये पांडव हरताच दू:शासनाने भर सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यास सुरुवात केली. तेव्हा तिने श्रीकृष्णाचा धावा केला. त्यासभेत भगवान परशुरामाचा पराभव करणारे महापराक्रमी कौरव-पांडवांचे गुरू द्रोणाचार्य, कृपाचार्यसारखी योद्धे होते. पण दू:शासनाला कोणी रोखले नाही. श्रीकृष्ण तेथे पोहोचले त्याने द्रौपदीला  वस्त्र पुरवली आणि दू:शासनाने ती फेडावीत. वस्त्राचा मोठा झाला. दु:शासन थकला. अखेर श्रीकृष्णाने पितांबर द्रौपदीला नेसवला आणि या वस्त्राला हात लावलास तर सर्व दुष्टांचा संहार करी, असा इशारा देता सर्व घाबरले.दू:शासन थांबला. द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा दुर्योधनाचा बेत फसला. तेव्हा द्दुतात रलेलं पांडवही तेथे होते पण तेही हतबल होते. तात्पर्य, बोटभर चिंधीचे मोल श्रीकृष्णाने असं चुकते केले. श्रीकृष्ण प्रेमाच्या सर्व कसोट्यावर उतरलेला असल्यामुळे त्यांच्या लीलांचे  सण-उत्सव साजरे केले जात आहेत. या प्रसंगातून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असावा अशी धारणा आहे आणि ती पटणारी आहे, कारण भाऊ आणि बहिणीचे प्रेम कसे निर्व्याज आणि त्यागाची परिसीमा गाठणारे असावे याचे प्रतीक म्हणजे ही कथा आहे.

आज या सणालाही व्यावसायिकपणा आल्याचे दिसत आहे. त्यातील जाणीव होत आहे. बहिण-भाऊ यांच्यातील पवित्र प्रेमाची जागा स्वार्थाने घेतल्याचे दिसून येते. अर्थात सर्व भाऊ बहीण असे आहेत असे नाही, पण स्वार्थी असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र आजही काही जण हे पवित्र नातं जपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. म्हणून त्या पवित्र सणांचे महत्त्व अजून टिकून आहे. प्रेम म्हणजे काय तर समर्पणाची भावना ज्याच्यावर आपण प्रेम  करतो त्याच्यासाठी सर्वोच्च त्याग करण्याची तयारी असली पाहिजे. निस्सीम, निर्व्याज, निस्वार्थ, प्रेमाची महती सांगणाऱ्या रक्षाबंधनाचा पवित्र सण आपणही तेवढेच गांभीर्याने पाळूया! बहिणीला तिच्या रक्षणाची हमी देऊन तिचा विश्वास सार्थ ठरवू या! म्हणूनच म्हणतात -

"प्रेम नाही मुळीच जगती

ही खोटी का हाकाटी

प्रेम लाभे प्रेमळाला

त्याग ही त्याची कसोटी"

मागे

राष्ट्राचे रक्षण करण्याचा निश्चय करून स्वातंत्र्यदिन साजरा करूया !
राष्ट्राचे रक्षण करण्याचा निश्चय करून स्वातंत्र्यदिन साजरा करूया !

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांच्या १५० वर्षांच्या गुलामगिरीतून आ....

अधिक वाचा

पुढे  

ज्यांनी ज्यांनी पूरग्रस्तांना मदत करताना सेल्फी काढली व ती एफबी, व्हाट्सअप्प इंस्टाग्राम वर अपलोड के
ज्यांनी ज्यांनी पूरग्रस्तांना मदत करताना सेल्फी काढली व ती एफबी, व्हाट्सअप्प इंस्टाग्राम वर अपलोड के

 ज्यांनी ज्यांनी पूरग्रस्तांना मदत करताना सेल्फी काढली व ती एफबी, व्हाट्स....

Read more