ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

युगपुरुष महात्मा गांधीजींचे स्मरण

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 30, 2020 12:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

युगपुरुष महात्मा गांधीजींचे स्मरण

शहर : मुंबई

         आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७२ वी पुण्यतिथी. जगात अनेक सम्राट, जगज्जेते, राजे-महाराजे होऊन गेले. पण भारताच्या भूमीत जगाच्या पाठीवर एकमेव राष्ट्रपिता झाला. ज्याने शस्त्राच्या बळावर नव्हे तर अहिंसक चळवळीच्या जोरावर भारताला स्वतंत्र देण्यास ब्रिटीशांना भाग पाडले. सशस्त्र क्रांतीने जगाचा नकाशा अनेक वेळा बदलला असेल, पण महात्मा गांधींनी अहिंसक आंदोलनाने इतिहास रचला. जो कधीच कुणालाही पुसता येणार नाही. म्हणूनच ७२ वर्षे लोटली तरी भारतातच नव्हे तर जगभरात ज्यांना आदराचे स्थान  आहे. अशा मोजक्याच व्यक्तींमध्ये गांधीजींचे नाव अग्रस्थानी असल्याचे दिसते.

         आज खर्‍या अर्थाने गांधीजींच्या विचारांची भारतासह जगाला नितांत गरज आहे. त्यांचे विचार जगाला पटले आहेत. पण महत्वाकांक्षी राष्ट्रांनी स्वार्थापोटी शस्त्रा-अस्त्रांचा बळावर जगाला विनाशाच्या कडेवर आणून उभे केले आहे. तर गांधीजींच्या विचारांची खुद्द भारतातच रोज हत्या केली जात आहे. जे लोक आपल्या विरोधी तत्वांचा वैचारिक पातळीवर पाडाव करू शकत नाहीत तेच शस्त्र हाती घेत विचार देणार्‍या व्यक्तींना मारत सुटतात. शांतता आणि अहिंसेसाठी आयुष्य झटणार्‍या, आपले विचार परखडपणे मांडनार्‍यांच्या हत्या आजही होत आहेत. येशू ख्रिस्त, सॉक्रेटिसपासून डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉ.गोविंद पानसरे, डॉ.एम.एम. कलबुर्गी, गौरी लंकेश आदी विचारवंतांची हत्या कट्टरपंथियांनीच  केल्याचे दिसून येते. कारण या विचारवंतांच्या विचारांचा पाडाव वैचारिक पातळीवर करू न शकणारे कट्टरपंथियच त्यांच्या विचार दडपून टाकण्याच्या उद्देशाने त्यांची हत्या करतात. पण विचारवंतांची हत्या करून त्यांचे विचार संपविता येत नाहीत. हेच गांधीजींच्या हत्येनंतर गेल्या ७२ वर्षात दिसून आले आहे. २०१८ मध्ये महात्मा गांधीजींची १५० वी जयंती साजरी झाली. यानिमित्ताने अमेरिकेत "लिडरशिप मॅटर्स रिलेव्हन्स ऑफ गांधी इन कंटेपररी वर्ल्ड" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही अमेरिकेच्या दौर्‍यावर होते. या कार्यक्रमात बोलताना संयुक्त राष्ट्रांचे सरचटणीस ग्रेट्रेस यांनी संगितले की, "गांधीजींची दृष्टी व तत्वज्ञान हे संयुक्त राष्ट्रांच्या संघाचे मूळ आधारस्तंभ आहे. त्यांनी भारताला वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त केले. त्यांचा विचार हा राजकारणापलीकडे मानवी हक्क व शाशव्त विकासाला प्रेरणा देणारा होता. समाजातील कुठलाही घटक मागे राहता कामा नये, त्यांच्याबाबत भेदभाव होता कामा नये, हीच त्यांची शिकवण होती. त्याचाच पाठपुरावा त्यांनी अखेरपर्यंत केला. परंतु त्यांच्या विचारांच्या विरोधी असलेल्या कट्टरपंथीयांना वैचारिक पातळीवर त्यांचा पाडाव करता आला नाही. म्हणून मग त्यांनी टोकाचा निर्णय घेत गांधीजींची हत्या केली, याला इतिहास साक्ष आहे.

         ज्या भारतात महात्मा गांधींनी मानवतावादी विचार वृद्धिंगत केला त्याच देशात त्यांच्या विचारांची रोज हत्या होताना दिसत आहे, हा केवढा दैवदुर्विलास आहे? मात्र जगभर आज गांधींजींच्या विचारांची पारायणे केली जात आहेत. त्यांचे विचारच जगाला वाचवू शकतील, यावर विचारवंतांचा दृढविश्वास आहे. यावरून महात्मा गांधीजींना युगपुरुष का म्हणतात, ते लक्षात यावे! त्यांच्या पवित्र स्मृतीस आमचे विनम्र अभिवादन!!

मागे

नव्या वळणावर
नव्या वळणावर

        परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. माणसालाही तो लागू होतो. बदलत्या का....

अधिक वाचा

पुढे  

अर्थसंकल्प : सामन्यांची क्रयशक्ती वाढविणार का?
अर्थसंकल्प : सामन्यांची क्रयशक्ती वाढविणार का?

      उद्या शुक्रवारपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. १ ....

Read more