By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 06, 2019 06:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज यांची महिती
नाव (Name) |
शिवाजी शहाजी भोसले (shivaji maharaj) |
जन्म (Birthday) |
19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी (Shiv Jayanti) |
मृत्यु (Death) |
3 एप्रील 1680 रायगड |
राज्याभिषेक (Rajyabhishek) |
6 जुन 1674 रायगड |
वडीलांचे नाव (Father Name) |
शहाजीराजे मालोजी भोसले |
आईचे नाव (Mother Name) |
जिजाबाई शहाजी भोसले |
शिवाजी महाराजांच्या पत्नींची नावे |
सईबाई निंबाळकर |
(Wife Name) |
|
मुलांची नावे (Children Name) |
संभाजी, राजाराम, सखुबाई, रानुबाई, राजकुंवरबाई, दिपाबाई, कमलाबाई, अंबिकाबाई. |
महाराज म्हणजे निश्चयाचा महामेरू . . . बहुतजनांसी आधारू . . . .अखंडस्थितीचा निर्धारू असे श्रीमंत योगी रयतेचा हा राजा . . . . . जाणता राजा ज्या शतकात जन्माला आला त्या इ.सन 1627 दरम्यान संपुर्ण भारतावर मुगलाचे अधिपत्य होते. उत्तरेला शहाजहान, विजापुर ला मोहम्मद आदिल शहा आणि गोलकोंडयाला सुलतान अब्दुल्ला कुतुब शहा यांचे शासन होते. समुद्र किनारे पोर्तृगिजांच्या ताब्यात होते. आदिलशहाच्या सेनेत शहाजीराजे भोसले उच्च पदावर कार्यरत होते . . . . .1630 ला जुन्नर जवळ शिवनेरी गडावर जिजाबाईंच्या पोटी महाराज जन्माला आले, शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे ’’शिवाजी’’ असे नामकरण करण्यात आले.
पहिली गुरू आई आणि दुसरे गुरू दादोजी कोंडदेव यांच्या सानिध्यात आणि संस्कारांमधे महाराजांचे बालपण अतिशय उत्तम रितीने गेले. दादोजींनी त्यांना युध्दकौशल्यात आणि नितीशास्त्रात पारंगत केले. जिजाबाई महाराजांना राम कृष्णाच्या, शुरविरांच्या गोष्टी सांगुन त्यांच्यावर उत्तम संस्कार तर करतच होत्या त्या शिवाय तलवारबाजी, घोडयावर स्वार होणे यात त्यांना तरबेज करत होत्या. साम्राज्याला स्थापीत करण्याकरता किल्यांचे काय महत्व आहे याची महाराजांना नेमकी जाण असल्यामुळे वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांनी तोरणा, चाकण आणि कोंढाणा किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतले. आबाजी सोनदेवांच्या मदतीने मुल्ला अहमदच्या ताब्यात असलेले ठाणे, कल्याण आणि भिवंडीच्या किल्ल्यावर ताबा मिळवला.
यामुळे आदिलशाही साम्राज्याला हादरे बसु लागले . . . महाराजांवर लगाम लावण्याकरता त्यांच्या वडिलांना बंदी बनविण्यात आले . . . . पुढे जवळ जवळ 7 वर्ष महाराजांनी आदिलशहावर थेट आक्रमण केले नाही. तो काळ त्यांनी त्यांची सेना (संख्याबळ) वाढवण्यात आणि इतरांसोबत संबध दृढ करण्यावर खर्च केला.
शिवनेरी किल्ला, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड, विजयदुर्ग, राजगड, तोरणा, पन्हाळा, पुरंदर, लोहगड, सिंहगड, प्रबलगड, स्वर्णदुर्ग यां सारखे असंख्य किल्ले शिवाजी महाराजांनी स्वराज्याकरता जिंकले आहेत.
शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्याकरता अफजलखान विजापुर वरून 10000 सैन्य घेऊन निघाला. अफजलखान धाडधिप्पाड शरिरयष्टीचा होता, महाराजांना डिवचण्याकरता त्याने रस्त्यात अनेक मंदिरे उध्वस्त केली, अनेक निरपराध लोकांचा बळी घेतला. पण महाराजांनी आतातायी पणाने निर्णय न घेता त्याच्या सोबत छापामार पध्दतीने युध्द करत राहिले. कंटाळुन अखेरीस अफजलखानाने महाराजांना मारून टाकण्याच्या इराद्याने भेटीचे आमंत्रण पाठवले. प्रतापगडाच्या पायथ्याशी एका आलिशान शामियान्यात ही भेट ठरली. महाराजांना पाहाताच त्याने गळाभेटीकरता महाराजांना आमंत्रित केले आणि त्या क्षणी महाराजांना संपवुन टाकण्याची मनोमन योजना देखील आखली.
महाराज अफजलखानाला पुरते ओळखुन होते, गळाभेट होताच त्याने महाराजांना आपल्या काखेत धरले आणि वार करण्याच्या तयारीत असतांना महाराजांनी तत्क्षणीच त्याचा कावा ओळखुन वाघनखांच्या सहाय्याने अफजलखानाचा कोथळाच बाहेर काढला . . . . महाराजांपेक्षा दुप्पट शरीरयष्टीचा अफजलखान क्षणात जमिनीवर कोसळला.
औरंगजेबाच्या व्यवसायी केंद्रांवर आक्रमण
1664 साली शिवाजी महाराजांनी मुघलांचे व्यवसायी केंद्र सुरतेवर आक्रमण करून त्याला नेस्तनाबुत केले यामुळे औरंगजेब प्रचंड चिडला आणि सेना नायक मिर्जा राजा जयसिंग ला दिड लाख सैन्यासोबत महाराजांवर आक्रमण करण्याकरता पाठवले या युध्दात शिवाजी महाराजांना हार पत्करावी लागली आणि त्यांना आपले 23 किल्ले आणि 4 लाख मुद्रा नुकसान भरपाई म्हणुन द्यावी लागली.
9 वर्षीय संभाजी ला घेउन महाराजांना औरंगजेबाच्या दरबारी आग्य्राला जावे लागले. महाराजांवर नियंत्रण ठेवण्याकरता सुरूवातीला त्यांना औरंगजेबाच्या दरबारात मोठे पद देण्याचे कबुल करण्यात आले पण प्रत्यक्ष तेथे पोहोचल्यानंतर महाराजांना मोगलांच्या दरबारी नजरकैद करण्यात आले त्यावेळी औरंगजेबाला माहिती देखील नव्हते की त्याची ही चुक त्याला चांगलीच महागात पडणार आहे.
मिठाईच्या पेटा.यात बसुन त्यांनी आपली आणि बाळ संभाजीची सुटका करून घेतली मथुरा . . . काशी . . . गया. . . पुरी . . . गोलकोंडा . . . विजापुर मार्गे ते रायगडावर पोहोचले . . . . . पुढे महाराजांनी अनेक युध्द करत आपला बराच भाग मुघलांच्या ताब्यातुन परत मिळवला 1671 ते 1674 या काळात औरंगजेबाने शिवाजी महाराजांना परास्त करण्याचे बरेच प्रयत्ने केलेत पण तो पुर्णतः असफल ठरला.
अखेर तो दिवस उजाडला ज्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते . . . .6 जुन 1674 ला गागाभट्ठ यांनी हिंदु परंपरेनुसार अनेक ज्येष्ठांच्या आणि श्रेष्ठांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केला . . . संपुर्ण रायगड त्या दिवशी एखाद्या नवरीसारखा सजवण्यात आला होता.
महाराज केवळ शुर आणि युध्द निपुणच नव्हते तर ते एक उत्तम प्रशासक देखील होते.
धर्माच्या नावाखाली त्यांनी कधीही कुणासोबत पक्षपात केला नाही . . .त्यांच्या दरबारातील काही अधिकारी आणि अंगरक्षक मुस्लिम देखील होते . . . त्यांनी कधीही कुठल्याही स्त्रिचा अनादर केला नाही इतकेच नाही तर युध्दात हरलेल्या शत्रुच्या स्त्रियांना देखील सन्मानपुर्वक परत पाठवत असत.
आपल्या महाराष्ट्रात असाच एक शक्तीशाली, निष्ठावान, पराक्रमी राजा होउन गेला. त्याच्या जन्माला येण्यानं आणि त्याच्या जाज्वल्य पराक्रमानं इतिहास घडवला आणि त्याचे नाव त्या पानांमधे सुवर्णाक्षरांनी कोरले गेले ते आज पर्यंत तसेच आहे आणि येणा.या काळात देखील तसेच जीवंत राहाणार आहे.
ते आहेत प्रौढ प्रताप पुरंदर . . . क्षत्रीय कुलावंतस् . . . सिंहासनाधिश्वर . . . . महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज!!!